(Image Credit - The Better India)
शेणापासून खत तयार होतं, घर सारवण्यासाठी शेण वापरतात हे तुम्ही ऐकलं असेल पण या शेणाचा वापर करून तुम्ही छान पैसे कमावू शकता आणि इतरांनाही रोजगार मिळवून देऊ शकता असं सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. शेणापासून तयार झालेली उत्पादनं, चप्पल, लोगा, नेमप्लेट, दिवे अशा अनेक वस्तू बाजारात दिसत आहेत.
द बेटर इंडियाच्या रिपोर्टनुसार उत्तराखंडच्या काशीपूर येथिल रहिवासी असलेल्या नीरज चौधरी नावाच्या शेतकऱ्यानं शेणापासून वेगवेगळ्या इको फ्रेंडली, डोकोरेटिव्ह वस्तू तयार केल्या आहेत. नीरज मागच्या ६ वर्षांपासून श्री 'बंसी गौ धाम’ या नावानं आपला व्यवसाय चालवत आहेत आणि शेणाचा वापर करून अनेक उत्पादनं तयार करत आहेत.
शेण सुकवून त्यापासून पावडर तयार केली जाते आणि पपईचे दूध किंवा आळशीच्या तेलानं पॉलिश केलं जातं. द बेटर इंडियाशी बोलताना त्यांनी सांगितले की, ''गाईचं शेण असा पदार्थ आहे जो बाराही महिने आपल्याला सहज बाजारात मिळतो. म्हणूनच काम सुरू करण्यासाठी कच्च्या मालाच्या स्वरूपात शेणाचा वापर केला. आम्ही प्रथम शेणावर प्रक्रिया करतो, नंतर ते वाळवले जाते आणि गिरणीत बारीक केले जाते. यानंतर, विविध साच्यांमध्ये टाकून (त्यात सुमारे 10% किंवा 15% नैसर्गिक पदार्थांचे मिश्रण असते, जसे की लाकूड) आम्ही विविध प्रकारची उत्पादने बनवतो.
ही कल्पना सुचली कशी?
जेव्हा त्यांनी रस्त्यावर फिरत असलेल्या निराधार गाईंना पाहिलं. त्यावेळी त्यांच्या शेणाचा वापर करून वस्तू तयार करण्याची कल्पना सुचली. गाईच्या शेणपासून सर्व प्रकारच्य सजावटीच्या वस्तू तयार केल्या जातात. यासाठी ते प्रथम कॉम्पुटराईज्ड प्रिंट तयार करतात. त्यानंतर साचे त्या आकाराचे बनवून डिझाईनुसार शेणाची पेस्ट तयार केली जाते. या व्यवसायानं अनेक महिला आणि मजूरांना रोजगार दिला आहे. नीरज या व्यवसायातून लाखो रुपये कमावतात आणि वर्कशॉपच्या माध्यमातून अशी उत्पादने बनवण्याचे प्रशिक्षणही देतात.