एकदा निश्चय केला की कितीही संकट येऊ दे कधीच मागे वळून पाहायचे नाही... आपल्या स्वप्नांसाठी दिवसरात्र एक करून मेहनत करणारे खूप कमी लोक असतात. दिल्लीची रहिवासी असलेल्या अमिता प्रजापतीने हे खरं करून दाखवलं आहे. इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वीच सीएच्या परिक्षेचे निकाल जाहीर केले. (Tea Seller Daughter Slum Girl Cracks CA Exam) अमिता प्रजापती १० वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर सीए परिक्षेत सफल झाली आहे. आयुष्यात काही करू पाहणाऱ्या लाखो विद्यार्थांसाठी अमिता प्रेरणा बनली आहे. (Motivational Story)
काही लोक आयुष्यात यशस्वी होण्यासाठी गरिबीला हत्यार बनवतात आणि मन लावून मेहनत करतात. अमिता प्रजापती ही दिल्लीतील एका झोपडपट्टी परिसरात राहणारी मुलगी असून तिचे वडील चहा विक्रेते आहेत. आर्थिक स्थिती खूपच कमकुवत असल्यामुळे अमितासाठी हा प्रवास सोपा नव्हता. अनेक संकटांचा सामना करती ती इथपर्यंत पोहोचली.
लोक म्हणायचे, चहा विकून तू मुलीला कसं शिकवणार....
या मुलीच्या वडीलांना नेहमी लोकांकडून असं बोललं जायचं की, 'चहा विकून तू तिला कसं शिकवणार, पैसे वाचवून घर घेऊन टाक, कधीपर्यंत मुलीसोबत रस्त्यावर राहणार. एक दिवस मुलगी लग्न करून सासरी जाईल तुझ्याकडे काहीच राहणार नाही.' यावर अमिता म्हणते की,'मी झोपडीत राहते याची मला लाज वाटत नाही, आज मी अशा स्टेजवर पोहोचले आहे की मी आपल्या आई-वडीलांना चांगले घर घेऊन देऊ शकते. मला आपल्या वडीलांचे स्वप्न पूर्ण करायचे होते.'
अमिता प्रजापतीने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, पहिल्यांदा मी वडीलांना मिठी मारून रडले. या क्षणाची मी खूप वाट पाहिली. मी जे स्वप्न पाहिले होते ते आज खरे झाले, मी आज जे काही आहे ते माझ्या आई वडिलांची देण आहे. त्यांनी माझ्यावर खूप विश्वास दाखवला, मुलीला शिकवून काय करणार ती एक दिवस सोडूनच जाणार असा विचार त्यांनी कधीच केला नाही.