पॉर्न पाहण्याचे व्यसन आणि त्याबद्दलचे बरेच गैरसमज लोकांच्या मनात असतात. आपली मुलं तसलं काही पाहातच नाहीत. या गैरसमजात अनेक घरातील पालक असतात. ‘लोकमत सखी’तर्फे (Lokmat Sakhi) जागतिक महिला दिनाचे (International Women’s Day 2022) औचित्य साधत #BeTheChange हा खास उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये मुक्त पत्रकार आणि समाज माध्यमांच्या अभ्यासक मुक्ता चैतन्य यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी पालकांना या नाजूक, गुप्तता बाळगल्या जाणाऱ्या विषयावर मोलाचा सल्ला दिला आहे.
आमच्या घरातल्या मोबाईल्समध्ये तसलं काही नसतंच....
मुक्ता चैतन्य सांगतात ,'' आमच्या घरातील लोकांच्या मोबाईल्समध्ये तसलं काही नसतं हा एक मोठा भ्रम आहे. मुलांच्या मोबाईलमध्येच नाही तर मोठ्यांच्या मोबाईलमध्येही न्यूड कटेंट, पॉर्नेग्राफी कटेंट असतो. अनेकदा मोठ्यांच्याच मोबाईलमधून हा कंटेट लहान मुलांपर्यंत पोहोचतो. पालकांकडून फिल्टर,फोल्डरचा वापर योग्यप्रकारे केला जात नाही. त्यामुळे अवेळी मुलांच्या हाती चुकीच्या गोष्टी लागतात.
मोठ्यांचा मोबाईल उघडल्यानंतर मीम्, न्यूड व्हिडीओ, फोटो अवेळी मुलांच्या समोर येतात. आपल्या सगळ्यांचाच घरात हे घडतं. इंस्टारिल्समधूनही सॉफ्ट पॉर्न व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलंही रोमॅन्टीक, एरोटीक गाण्यांवर लहान मुलं नाचतात. हे सगळंच मुलांना अशा अनोळखी झोनमध्ये घेऊन जातं ज्याचं आपण शिक्षण मुलांना दिलेलं नाही. हा चिंताजनक विषय आहे.
सोळा, सतरा वर्षांच्या मुलांनी वारंवार पॉर्न पाहिल्यानंतर मुलांमध्ये शरीरसंबंधांबद्दल कन्फ्यूजन तर कधी प्रचंड घृणा निर्माण होते. सहा ते सात वर्ष जेव्हा तुम्ही हार्ड कोअर कंटेट पाहता त्यावेळी मेंदूवर परिणाम होऊन तशी इमेज तयार होत असते. उदा. एका १८ वर्षांच्या मुलाला पॉर्न कंटेंटमध्ये पाहिलेली प्रत्येक गोष्ट करून पाहायची तीव्र इच्छा व्हायची. इंटरटेंटमेंट किंवा रिलॅक्सेशन, प्लेजर यासाठी पॉर्न कंटेंट पाहिला जातो. पण टिनेजरमध्ये पॉर्न पाहण्याचं प्रमाण वाढतं त्यावेळी घृणा, अतिकुतूहल वाटणं असे प्रकार उद्भवतात. ''
पालकांनी कसं रिएक्ट करायला हवं....
पालकांच्या मानसिकतेबाबत मुक्ता सांगतात ,''आमच्यासारख्या घरांमध्ये असं काही चालत नाही असं पालक गृहित धरतात. आपल्या मुलांन त्याच्या आजूबाजूच्या वातावरणातून, मित्रमैत्रिणींकडून या गोष्टी कळू शकतात हे मान्य करायला पालक नसतात. समजा फोनमध्ये असा कंटेट दिसला तर मुलांना मारणे, त्यांचा फोन काढून घेणे, टोमणे मारणे या पद्धतीनं वचक ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. याउलट काही पालक मुलांना अडवलं तरी ते पाहणारच या विचारात बिंधास्तपणे असा कंटेट पाहण्याची मुभा देतात. या दोन्ही पद्धती चुकीच्या असून पालकांनी स्पष्टपणे बोलणं गरजेचं आहे.
मुलं पोर्न पाहताना दिसल्यानंतर आराडाओरडा, मारणे, टोमणे न मारता स्पष्टपणे सांगायला हवं की एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्टप्रमाणए पॉर्न बनवले जातात. त्या सगळ्या सीन्समध्ये कुठेही प्रेम, सहवास, कसेंट, कम्पॅशन अशा गोष्टी ज्यांच्या आधारावर माणसाचं लैगिंक आयुष्य फुलतं या गोष्टी असतं. या गोष्टी मिसिंग असतात. याशिवाय पॉर्नोग्राफी कटेंट चित्रित होत असताना मुलांचं शोषणही होतं. त्यामुळे मुलांना स्पष्टपणे याच्या दोन्ही बाजू सांगायला हव्यात. माध्यम शिक्षण म्हणजेच काय पोस्ट करावे, काय पोस्ट करू नये. आपण कोणत्या अफवांवर विश्वास ठेवतोय का? याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. सोशल मीडियाच्या वापराचा आपल्यावर होणारा परिणाम समजून घेऊन माध्यमं वापरायला हवीत. ''