Lokmat Sakhi >Inspirational > International Women’s Day 2022 : महिलांनी महिलांसाठी सांगितलेली ‘ती’ची गोष्ट; ‘लोकमत सखी’वर ‘वुमन पॉवर’LIVE

International Women’s Day 2022 : महिलांनी महिलांसाठी सांगितलेली ‘ती’ची गोष्ट; ‘लोकमत सखी’वर ‘वुमन पॉवर’LIVE

International Women’s Day 2022 : गोष्ट हिमतीची, जिद्दीची, जगण्याची आणि नव्या स्वप्नांचीही, विविध क्षेत्रातील १० नामवंत महिला तुमच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2022 12:17 PM2022-03-08T12:17:17+5:302022-03-08T12:25:22+5:30

International Women’s Day 2022 : गोष्ट हिमतीची, जिद्दीची, जगण्याची आणि नव्या स्वप्नांचीही, विविध क्षेत्रातील १० नामवंत महिला तुमच्या भेटीला

International Women's Day 2022: The story of 'she' told by women; ‘Woman Power’ LIVE on ‘Lokmat Sakhi’ | International Women’s Day 2022 : महिलांनी महिलांसाठी सांगितलेली ‘ती’ची गोष्ट; ‘लोकमत सखी’वर ‘वुमन पॉवर’LIVE

International Women’s Day 2022 : महिलांनी महिलांसाठी सांगितलेली ‘ती’ची गोष्ट; ‘लोकमत सखी’वर ‘वुमन पॉवर’LIVE

Highlights #BeTheChange या उपक्रमात नक्की सहभागी व्हा आणि आजचा महिला दिन तुम्हीही स्पेशल बनवा.  दिवसभरात प्रत्येक तासाला विशिष्ट क्षेत्रातील नामवंत महिला आपल्याशी संवाद साधणार आहेत.

जागतिक महिला दिन (International Women’s Day 2022) म्हणजे ‘ती’चा जागर करण्याचा दिवस. अहोरात्र आपल्या कुटुंबाला, मुलाबाळांना सांभाळत असताना स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी झगडणाऱ्या तिला लोकमत परिवाराकडून मानाचा मुजरा. याच महिला दिनाचे (8th March) औचित्य साधत लोकमत सखीतर्फे (Lokmat Sakhi) #BeTheChange हा खास उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये दिवसभरात प्रत्येक तासाला विशिष्ट क्षेत्रातील नामवंत महिला आपल्याशी संवाद साधणार आहेत. यानिमित्ताने लहान मुलींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंतचे प्रश्न, विविध क्षेत्रात महिलांनी घेतलेली भरारी आणि तिचा लढा अशा सगळ्याचा आढावा घेतला जाणार आहे. 

लोकमत आणि लोकमत सखी अशा दोन्ही फेसबुक पेजवरुन हे लाईव्ह आपल्याला आज दिवसभर ऐकता येणार आहेत. याबरोबरच लोकमतच्या युट्यूबचॅनेलवरही या मुलाखती ऐकता येणार आहेत. सकाळी १० वाजल्यापासून सुरु होणारा हा ‘ती’च्या जागरात आपण सगळ्यांनी सहभागी होऊया आणि तिच्या जिद्दीची, लढ्याची गोष्ट ऐकूया. माहित नाही हिच गोष्ट कदाचित आपल्याला नवीन माहिती देणारी, प्रेरणा देणारी ठरु शकेल. तेव्हा लोकमतच्या #BeTheChange या उपक्रमात नक्की सहभागी व्हा आणि आजचा महिला दिन तुम्हीही स्पेशल बनवा. 

लाईव्हमध्ये सहभागी होणारे तज्ज्ञ आणि त्यांचे विषय 

१. सकाळी १० - विषय : वयात येणाऱ्या मुलींच्या सिक्रेट जगात.
डॉ. शिल्पा चिटणीस जोशी, स्त्रीरोगतज्ज्ञ वंध्य़त्वतज्ज्ञ 

२. सकाळी ११ - विषय- ' गोष्ट मनाच्या तुरुंगाची '
स्वाती साठे, विदर्भ कारागृहात उपमहानिरीक्षक 

३. दुपारी १२ - विषय़ - स्वयंपाकघर, फेसबुक आणि पोषण.
भक्ती चपळगावकर, मुक्त पत्रकार 

४. दुपारी १ - विषय - ' आपल्या घरात मोबाईलवर तसलं काही...' 
मुक्ता चैतन्य, समाजमाध्यम अभ्यासक 

५. दुपारी २ - विषय - सुख दुःखाची 'सिरीअल' गोष्ट.
अनिता दाते, अभिनेत्री

६. दुपारी ३ - विषय - ' त्या ' चार दिवसांबद्दल...
नम्रता भिंगार्डे, पानी फाऊंडेशन

७. दुपारी ४ - विषय - ' यूट्यूबर आजी ' सोबत गप्पा..
 सुमन धामणे, अहमदनगर

८. सायंकाळी ५ - विषय - चिडलेल्या आईच्या ऑनलाईन भिरभिऱ्या मुलांबद्दल...
श्रुती पानसे, मेंदूअभ्यास तज्ञ 

९. सायंकाळी ६ - विषय - कायद्यावर बोट, कामाचं बोला.
दिपाली गोगटे, कार्यकर्ती, वयम् सामाजिक संस्था

१०. सायंकाळी ७ - विषय - 'कॅन्सर जगणं शिकवतो तेव्हा...'
वंदना अत्रे, पत्रकार

Web Title: International Women's Day 2022: The story of 'she' told by women; ‘Woman Power’ LIVE on ‘Lokmat Sakhi’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.