Join us  

चंद्रपूर जिल्ह्यातील लहानसं कोरपना गाव -कोहिमा ते दिल्ली! - चंद्रपूरच्या दीपाली मासीरकर राष्ट्रपती निवडणुकीच्या निरीक्षक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 4:14 PM

मूळच्या महाराष्ट्राच्या (Maharashtra) असलेल्या दीपाली रविचंद्र मासीरकर (Deepali Masirkar) यांची राष्ट्रपती निवडणूक (presidential election) निरिक्षकपदी झालेली निवड हा अवघ्या महाराष्ट्रासाठीच एक आनंदाचा, अभिमानाचा क्षण आहे.

ठळक मुद्देचंद्रपूरमधील कोरपना या तालुक्यातील आवाळपूर या छोट्याशा गावच्या मूळ रहिवाशी असलेल्या दीपाली आज दिल्ली गाजवत आहेत, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही.

राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत असणारी नाव, त्यांना मिळणारा पाठिंबा आणि विरोध, राष्ट्रपती पदासाठी होणारी निवडणूक (election for president of India) असे विषय सध्या देशभरात गाजत आहेत. कारण हा प्रत्येकाच्याच दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आणि औत्सुक्याचा विषय आहे. अशातच जेव्हा भारताच्या या सर्वोच्च पदाच्या निवडणूकीसाठी निरीक्षक (President Election Observer) म्हणून महाराष्ट्राच्या लेकीची निवड होते, तेव्हा तो क्षण महाराष्ट्रासोबतच (Maharashtra) जगभरातल्या मराठी लोकांसाठी कौतूकाचा, आनंदाचा आणि अभिमानाचा विषय ठरतो. केंद्रिय निवडणूक आयोगाने चंद्रपूरच्या दीपाली मासीरकर (Deepali Masirkar from Chandrapur) यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

 

पाहूया त्यांचा आजवरचा प्रवास..चंद्रपूरमधील कोरपना या तालुक्यातील आवाळपूर या छोट्याशा गावच्या मूळ रहिवाशी असलेल्या दीपाली आज दिल्ली गाजवत आहेत, असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. २००८ च्या नागालँड बॅचच्या त्या आयपीएस अधिकारी असून आजवर त्यांनी अनेक धडाडीची कामे केली आहेत. याआधी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पाच वर्षांसाठी निवडणूक आयोगात संचालक म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळेच राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीतही आपसूकच त्यांच्यावर अतिशय महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली.

 

यापुर्वी दीपाली यांनी मुंबई येथे सहायक महानिरीक्षक या पदावरही उल्लेखनिय कार्य केले आहे. तसेच नागपूर येथे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तपदी असताना त्यांनी केलेले कार्य आजही नागपूरकरांच्या लक्षात आहे. त्यानंतर त्या नागालँडमधील कोहिमा येथेही काही काळ पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर तिथून त्यांची नियुक्ती निवडणूक आयोगाच्या संचालकपदी झाली. काही वर्षांपुर्वी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या आई-वडिलांना दिले होते.

सकाळी लवकर उठण्यासाठी 5 उपाय, जाग येईल लवकर- झोपही होईल पूर्ण-वाटेल फ्रेश 

त्या म्हणाल्या होत्या की, आई- वडिलांनी मला आणि माझ्या भावाला बरोबरीने वाढवले. मुलगी म्हणून मला कधीच काही कमी केले नाही. एक स्त्री म्हणून समाजाला मी काय केलेलं आवडेल, यापेक्षा मी मला काय आवडतं आणि मला काय पाहिजे आहे, तेच करते. लोक जेव्हा मला 'महिला पोलीस अधिकारी' म्हणतात, तेव्हा ते मला आवडत नाही. मी एक 'पोलीस अधिकारी' आहे, आणि मला तसंच म्हणावं अशी माझी अपेक्षा आहे. उगाच त्यामागे 'महिला' हा शब्द का लावला जातो, हे अजूनही मला कळलेलं नाही. 

 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीराष्ट्राध्यक्षराष्ट्रपती निवडणूक 2022चंद्रपूरमहाराष्ट्र