इस्त्रो म्हणजेच इंडीयन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनची चांद्रयान ३ मोहिम यशस्वी होण्यासाठी देशभरातून प्रार्थना करण्यात येत आहे. चांद्रयानाचे प्रक्षेपणही यशस्वी झाले. या मोहिमेच्या डिरेक्टर आहेत डॉ. रितू करीधाल या महिला शास्त्रज्ञ. रॉकेट वूमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रितू यांनी एकेकाळी इस्त्रोत काम करण्याचे स्वप्न पाहिले होते. २००७ मध्ये महान शास्त्रज्ञ आणि राष्ट्रपती एपीजे अब्दूल कलाम यांच्या हस्ते यंग सायंटिस्ट पुरस्कारही मिळाला होता. आणि आज देशाचं चंद्रावर जाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचं काम त्या करत आहेत (ISRO Chandrayaan 3 Director Dr Ritu karidhal).
या भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. डॉ. रितू करिधल श्रीवास्तव चांद्रयान २ मोहिमेतही त्यांनी मिशन डायरेक्टर म्हणजेच संचालक पदाची धुरा सांभाळली होती. डॉ. रितू यांनी बेंगळुरुच्या आयआयएससी या संस्थेतून एरोस्पेस इंडिनिअरींगची पदवी घेतली आहे. त्यांच्या जन्म १३ एप्रिल १९७५ रोजी लखनऊ (उत्तर प्रदेश) मध्ये झाला. त्यांच्या पतीचे नाव अविनाश श्रीवास्तव असून त्यांना आदित्य आणि अनिशा अशी मुले आहेत. डॉ. रितू यांना २००७मध्ये राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते इस्रो यंग सायंटिस्ट पुरस्कार मिळाला आहे. भारताच्या मंगळा परिभ्रमण मोहिमेमध्ये मंगळयानाच्या उपऑपरेशन डायरेक्टर म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.
डॉ. रितू करिधल श्रीवास्तव यांना भारतातील अनेक रॉकेट वुमन पैकी एक म्हणून संबोधले जाते. आतापर्यंत त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये २० हून अधिक पेपर प्रसिद्ध केले आहेत. आताच्या मनुष्यविरहित यानाच्या साह्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याचा प्रयत्न करणारा भारत हा पहिलाच देश असल्याने संपूर्ण जगाचे या मोहिमेकडे विशेष लक्ष आहे. तर चंद्रावर यशस्वीपणे लँडींग झाल्यास अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत हा चौथ्या क्रमांकाचा देश ठरेल. एम टेक केल्यानंतर डॉ. रितू यांनी पीएचडीसाठी प्रवेश घेतला. एकीकडे अभ्यास करत असतानाच त्या एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. १९९७ मध्ये त्यांनी इस्त्रो नोकरीसाठी अर्ज केला आणि लगेचच त्यांची नियुक्ती झाली. त्यावेळी त्यांची पीएचडी काही काळ मागे पडली.