Join us  

मानलं! विधायक बनी निशानेबाज.. दुसरं गोल्ड मेडल जिंकत टार्गेट फत्ते, आमदार श्रेयशीची कमाल..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 5:05 PM

BJP mla shreyasi singh wins her second gold medal : श्रेयसी सिंग गिधौर बिहारच्या राजघराण्यातील आहे. त्यांचे वडील दिग्विजय सिंह आणि आई पुतुल कुमारी हे दोघेही खासदार राहिले आहेत.

भाजप आमदार आणि राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज श्रेयसी सिंहने (bjp mla shreyasi singh) पुन्हा एकदा बिहारसह संपूर्ण देशाचे नाव उज्जवल केलं आहे. श्रेयसी सिंगने पटियाला येथे झालेल्या ६४व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत दुसरे सुवर्णपदक जिंकले आहे. तिच्या या विजयाबद्दल बिहारसह देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एवढेच नाही तर श्रेयसीच्या या यशावर बिहारमधील विविध पक्षांच्या नेत्यांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

JDU नेते आणि बिहार सरकारमधील मंत्री अशोक चौधरी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज आणि जमुईच्या आमदार श्रेयसी सिंगने 64 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेच्या डबल ट्रॅप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून पुन्हा एकदा बिहारचे नाव गौरव केले आहे. या शानदार विजयाबद्दल श्रेयसी जीचे हार्दिक अभिनंदन आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा. याशिवाय बिहार सरकारमधील मंत्री संजय कुमार झा यांनीही या यशाबद्दल श्रेयसीचे अभिनंदन केले आहे.

जमुईचे खासदार चिराग पासवान यांनीही ट्विट करून श्रेयसी सिंगचे अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले, "जमुईच्या आमदार श्रेयसी सिंगचे, पटियाला, पंजाब येथे झालेल्या ६४व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत डबल ट्रॅप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा."

कोण आहे श्रेयसी सिंग

श्रेयसी सिंग गिधौर बिहारच्या राजघराण्यातील आहे. त्यांचे वडील दिग्विजय सिंह आणि आई पुतुल कुमारी हे दोघेही खासदार राहिले आहेत. याशिवाय त्यांचे वडील अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीही होते. श्रेयसीने दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून पदवी प्राप्त केली, त्यानंतर मानव रचना विद्यापीठ, फरीदाबाद येथून एमबीएची पदवी घेतली. तसंच क्रीडा विश्वातही ते मोठं नाव आहे.

प्रथम तिने ग्लासगो (स्कॉटलंड) राष्ट्रकुल क्रीडा 2014 मध्ये रौप्य पदक जिंकले. त्यानंतर कॉमनवेल्थ गेम्स 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले. 2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत जमुईमधून आमदार झाल्यानंतरही श्रेयसी सिंहने आपले क्रीडाप्रेम कायम ठेवले आहे.

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीभाजपाबिहार