काळ बदलला तशा सगळ्याच गोष्टी बदलत गेल्या. गेल्या काही दिवसांत महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असतानाच महिलांनी या सगळ्याबाबत काय भूमिका घ्यायला हवी याबाबत सगळीकडेच चर्चा सुरू आहे. नवरात्रीचे निमित्त साधत प्रसिद्ध गायक आणि संगीतकार रोहीत राऊत आणि जुईली जोगळेकर यांनी फ्यूजन स्वरुपातील एक गाणे नुकतेच रिलिज केले आहे. घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक मुलीने, महिलेने येत्या काळात अन्यायाविरुद्ध कालीचे रुप धारण करायला हवे असं हे गाणं सांगतं (Kali calls new rap song by rohit raut and juilee Joglekar).
येणारा काळ हा आव्हानांचा असणार आहे त्यामुळे प्रत्येक मुलीने, महिलेने स्वत:ची रक्षा स्वत: करण्याची वेळ आता आली आहे. हीच गोष्ट थोडी वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न प्रसिद्ध गायक रोहीत राऊत आणि त्याची पत्नी गायिका जुईली जोगळेकर यांनी केला आहे. काली कॉल्स या नवीन गाण्याच्या माध्यमातून रोहीतने येत्या काळात महिलेचे रुप कसे असायला हवे याबाबत अतिशय महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. नेहमीच्या देवीच्या गाण्यांपेक्षा थोड्या वेगळ्या स्वरुपाचे असलेले हे गाणे अतिशय उत्तम पद्धतीने लिहीण्यात, संगीतबद्ध करण्यात आणि चित्रकरण करण्यात आले आहे. रॅप प्रकारात मोडणारे हे गाणे स्वत: जुईलीनेच गायले असून यामध्ये तिने अभिनय आणि नृत्यही केले आहे. त्या गाण्याचे शब्द आहेत..
तेरे चरणों की धूल मुझे दे दे, मै फुल समज रख लुंगी
तेरे हातो से शूल मुझे दे दे, मै रक्षा अपनी कर लुंगी
इस संसार के जो सारे दानव है, दिखते मानव मै सबसेही तो लढ लुंगी
कोई तुझसे यहा बडा नही है मॉ, तेरे गोदी मै सर को अपने रख लुंगी
हिंदीमध्ये असलेल्या या गाण्याची चाल उडती असली तरी त्याचा अर्थ खोलवर आहे हे ऐकल्यावर आपल्या लक्षात येतेच. आजच्या काळात महिलेने कशाप्रकारे कठोर व्हायला हे यामध्ये सांगण्यात आले आहे. कुणीही आपल्याशी चुकीचे वागले तर त्याला गुडघ्यावर आणण्याची ताकद तिच्यात आहे. जगात सध्या सगळीकडे सुरू असलेल्या राक्षसीपणाला तोंड देण्यासाठी महिलेने आपल्यातील कृष्ण, काली यांना जागृत करायला हवे असेच या गाण्याच्या माध्यमातून सांगायचे आहे.
गाण्याचं नाव आहे, काली कॉल्स.
गायिका - जुईली जोगळेकर,
रॅप - रोहीत राऊत,
प्रकार - भारतीय फ्यूजन,
रचना - रोहीत राऊत,
संगीतकार - रोहीत राऊत,
संगीत निर्माता - रोहीत राऊत,
भाषा- हिंदी,
गाण्याचा प्रकार - बिट्स आणि पारंपरिक.
ऐकावं पुन्हा पुन्हा असं हे गाणं.