(Image Credit - Economictimes.indiatimes.com)
माणसाने एखादी गोष्ट मिळवण्याचा ध्यास घेतला तर आभाळही कमी पडतं, असं अनेकदा म्हटलं जातं. भारतातील सर्वात मोठ्या खाजगी जेट कंपनीची मालकीण असलेल्या कनिका टेकरीवालचीही (Kanika Tekriwal) अशीच कहाणी आहे. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी त्यांच्याकडे 10 प्रायव्हेट जेट आहेत आणि विशेष म्हणजे वयाच्या 22 व्या वर्षी स्टार्टअप सुरू केले. त्यांची कंपनी JetSetGo ला 'उबेर ऑफ द स्काय म्हटले जाते. (Kanika Tekriwal, A Woman Who Owns 10 Private Jets At The Age Of 32)
दिल्लीची रहिवासी असलेल्या कनिकानं विमान वाहतूक उद्योगात नवे स्थान प्राप्त केले आहे. वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी तिला कॅन्सरसारख्या गंभीर आजाराने ग्रासले होते, पण त्यानंतर तिने जे केले ते आश्चर्यकारक आहे. या आजारावर मात केल्यानंतर कनिकाने जेटसेटगो नावाचा स्टार्टअप सुरू केला आणि आज ती इंडस्ट्रीत एक मोठे नाव म्हणून उदयास आली आहे.
दहा वर्षांत, कनिकाने तिच्या स्टार्टअपला एक उंच उड्डाण दिले आहे आणि आज ती JetsetGo ची संस्थापक सीईओ म्हणून नियुक्त झाली आहे. त्यांची कंपनी विमान चालवते आणि देखभाल करते. तसेच जेटसेटगो हेलिकॉप्टर, जेट, विमान भाड्याने देते. त्यांची कंपनी मॅनेजमेंट, पार्टस आणि विमानांची सेवा देखील करते.
2011 मध्ये कनिकाला तिच्या आजाराची माहिती मिळाली यानंतर तिचा उपचार सुमारे एक वर्ष चालला आणि यादरम्यान तिनं आपल्या ध्येयाचा विचार केला. कॅन्सरने तिला एक वर्ष मागे नेले, पण चांगली गोष्ट म्हणजे तोपर्यंत देशात असे काही करण्याचा विचार कोणीही केला नव्हता, असे ती म्हणते. ती बरी होताच कामात गुंतली आणि स्टार्टअप सुरू केले.
मेट्रोमध्ये बसायला जागा दिली नाही; बाळाला घेऊन खाली बसली माऊली, IAS अधिकारी भडकून म्हणाले...
एमबीए ग्रॅज्युएट असलेल्या कनिकाकडे आज स्वतःची 10 खाजगी विमाने आहेत आणि भारतातील 100 श्रीमंत महिलांच्या यादीत तिचा समावेश आहे. आज त्यांच्याकडे सुमारे 280 कोटींची मालमत्ता आहे, जी तिनं तिच्या कंपनीच्या कामातून मिळवली आहे. कनिकाच्या कामाची फोर्ब्स मॅगझिनमध्येही प्रशंसा करण्यात आली आहे आणि 2016 मध्ये रिटेल आणि ईकॉमर्सच्या बाबतीत आशियातील टॉप-30 बिझनेस वुमनमध्ये तिचा समावेश करण्यात आला आहे.
नादच खुळा! सुपरबाईक घेऊन रस्त्यावर उतरल्या आजी; व्हायरल होतोय 'कूल आजीं'चा फोटो
कनिकाचे वडील रिअल इस्टेट आणि केमिकल व्यवसाय करायचे. तिचे सुरुवातीचे शिक्षण दक्षिण भारतात झाले आणि कनिका पुढील शिक्षणासाठी मुंबईला गेली. कनिकाने सांगितले की, तिला वयाच्या १६ व्या वर्षापासून प्रायव्हेट जेट कंपनी उघडण्याची आवड होती. तिनं आपलं हे स्वप्न जिद्दीने पूर्ण केलं.