Lokmat Sakhi >Inspirational > पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला लढवणार सार्वत्रिक निवडणूक; कोण ती, जिंकेल ती?

पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला लढवणार सार्वत्रिक निवडणूक; कोण ती, जिंकेल ती?

Know who is Dr. Saveera Prakash Hindu Women file nomination in Pakistan general election : निवडणूक जिंकल्यानंतर आपण प्रामुख्याने महिलांच्या प्रश्नांवर काम करणार असल्याचे सवेरा यांनी सांगितले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2023 04:38 PM2023-12-26T16:38:46+5:302023-12-26T16:57:31+5:30

Know who is Dr. Saveera Prakash Hindu Women file nomination in Pakistan general election : निवडणूक जिंकल्यानंतर आपण प्रामुख्याने महिलांच्या प्रश्नांवर काम करणार असल्याचे सवेरा यांनी सांगितले आहे.

Know who is Dr. Saveera Prakash Hindu Women file nomination in Pakistan general election : For the first time in Pakistan, Hindu women will contest general elections; Who will win? | पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला लढवणार सार्वत्रिक निवडणूक; कोण ती, जिंकेल ती?

पाकिस्तानात पहिल्यांदाच हिंदू महिला लढवणार सार्वत्रिक निवडणूक; कोण ती, जिंकेल ती?

पाकिस्तानात एक हिंदू महिला निवडणूकीला उभं राहणार म्हणते तर त्याची अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा होणं, बातमी होणं यात काहीच अजब वाटू नये असं वास्तव आहेच. अल्पसंख्य महिलेनं पाकिस्तानात आपली राजकीय दावेदारी सांगणं हे तसं सोपं नाहीच. मात्र  पाकिस्तानमध्ये पुढील वर्षी म्हणजेच २०२४ च्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. आणि त्यात एक दावेदारी सांगणारं नाव सध्या चर्चेत आहे.डॉ. सवेरा प्रकाश. खैबर पख्तूनख्वा या भागातल्या बुनेर जिल्ह्याती सर्वसाधारण जागेसाठी डॉ. प्रकाश यांनी अर्ज दाखल केला असून त्या धर्माने हिंदू आहेत. पाकिस्तानमध्ये हिंदू महिलेने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची ही पहिलीच वेळ त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा असणं साहजिक आहे. मात्र चर्चा त्यांचं काम म्हणून कमी आणि हिंदू असून, महिला असून निवडणूक लढणार म्हणतात म्हणूनच खरंतर जोरदार आहे.(Know who is Dr. Saveera Prakash Hindu Women file nomination in Pakistan general election).

बुनेर जिल्ह्यातील PK-25 च्या सर्वसाधारण जागेसाठी प्रकाश यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. सवेरा प्रकाश यांचे वडील ओमप्रकाश निवृत्त डॉक्टर असून ते पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) सदस्यही होते. साधारण मागील ३५ वर्षांपासून ते पार्टीचे काम करत होते. सवेरा यांनी २०२२ मध्ये अबोटाबाद इंटरनॅशनल मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेतले आहे. तर याआधी  पीपीपीच्या महिला मोर्चाच्या सरचिटणीसही होत्या, डॉक्टर आहेत. शासकीय इस्पितळात त्यांनी काम केलं आहे. 

(Image : Google)
(Image : Google)

निवडणूक जिंकल्यानंतर आपण प्रामुख्याने महिलांच्या प्रश्नांवर काम करणार असल्याचे सवेरा यांनी सांगितले आहे. याशिवाय समाजातील वंचित घटकांसाठी काम करण्याची आपली इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले.  पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या (ECP) अलीकडील सुधारणांमध्ये सर्वसाधारण जागांवर पाच टक्के महिला उमेदवारांचा समावेश करणे बंधनकारक आहे. म्हणूनही कदाचित त्यांना संधी मिळेल.

मात्र डॉन या प्रतिथयश पाकिस्तानी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणतात, बायकांना एकूणच सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेत काय स्थान आहे? हक्कांचं तर सोडाच पण पण त्यांना काही आवाज, काही मत तरी आहे का? दाबून टाकलेल्या, दुर्लक्षित आवाजांसाठी काम करावंसं वाटणं यात चूक काय आहे? मला संधी मिळाली तर मी ते काम करीनही.. सोपं तर काहीच नसेल याची मला जाणीव आहे.

बघायचं डॉ. प्रकाश यांचं भवितव्य काय आहे?

Web Title: Know who is Dr. Saveera Prakash Hindu Women file nomination in Pakistan general election : For the first time in Pakistan, Hindu women will contest general elections; Who will win?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.