Join us

कमाल! प्राचीन भारतीय परंपरेने प्रेरित होऊन सुरू केला हेयर ऑईल ब्रँड; कमावले ४ मिलियन डॉलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 16:45 IST

एरिम कौर असं या महिलेचं नाव असून ती बायएरिम या प्रसिद्ध ब्रँडची प्रमुख आहे.

प्राचीन भारतीय परंपरेने प्रेरित झालेल्या लंडनच्या एका महिलेने केसांसाठी खास तेल तयार केलं. विशेष म्हणजे या हेयर ऑईल ब्रँडमधून तिने तब्बल चार मिलियन डॉलरहून अधिक कमाई केली आहे. एरिम कौर असं या महिलेचं नाव असून ती बायएरिम या प्रसिद्ध ब्रँडची प्रमुख आहे. ती एक यशस्वी उद्योजिका आहे. हा लक्झरी ब्रँड केसांची निगा राखण्यासाठी विविध उत्पादनं विकतो.  

बायएरिमचं सर्वात लोकप्रिय उत्पादन म्हणजे केसांची वाढ होण्यासाठीचं तेल, जे १००% नैसर्गिक आणि आयुर्वेदिक घटकांनी बनवलं आहे. बायएरिम वेबसाइटनुसार, यामध्ये आवळा तेल, नारळाचं तेल, बदाम तेल आणि एरंडेल तेल यासह ८ तेलांचे मिश्रण आहे. ३० वर्षीय एरिम कौरच्या आईचं एरिम फक्त ८ वर्षांच्या असताना कॅन्सरने निधन झालं. 

“मला नेहमीच मिळालेला सर्वात स्ट्रँग मेसेज म्हणजे आई आणि बहिणींशिवाय वाढलेल्या मुली किंवा मुलांसाठी काहीतरी करायचं आहे" असं एरिम कौरने सीएनबीसी मेक इटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. तिच्या आईची खासियत म्हणजे आईचे मोठे केस होते. 

'असा' रचला हेयर ऑईल ब्रँडचा पाया 

"मला नेहमीच माझ्या आईसारखं दिसायचं होतं. पण तिच्या सौंदर्यात इतकं मोठं योगदान देणारी गोष्ट असलेले केस जेव्हा जात होते तेव्हा ते पाहणं भीतीदायक होतं. आईच्या मृत्यूनंतर आजी माझ्या केसांना वेगवेगळं तेल लावायची. याच अनुभवातून हेयर ऑईल ब्रँडचा पाया रचला.

 ४.२ मिलियन डॉलर कमावले

"मी आईशिवाय वाढलेल्या कोणत्याही मुली किंवा मुलांसाठी एक शॉर्टकट तयार करू इच्छित होते, म्हणूनच मी माझ्या पेजवर त्या अनुभवाबद्दल बोलू लागले" असं एरिम कौरने म्हटलं आहे. २०१९ मध्ये बायएरिम लाँच केले. या ब्रँडने विक्रीतून ४.२ मिलियन डॉलर कमावले आहेत.

इन्स्टाग्रामवर ३.९ लाख फॉलोअर्स

“लोक प्रामाणिकपणा ओळखू शकतात. ते काय खरं आणि काय खोटं खूप लवकर ओळखतात. जेव्हा मी हे लाँच केलं तेव्हा कोणतीच पर्वा न करता लोक ते खरेदी करत होते कारण त्यांना या प्रवासाचा भाग व्हायचं होतं” असं एरिमने म्हटलं आहे. एरिम सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून इन्स्टाग्रामवर तिचे ३.९ लाख फॉलोअर्स आहेत. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीकेसांची काळजी