Lokmat Sakhi >Inspirational > 'असे जिव्हारी लागणारे प्रसंगच तर..' सई ताम्हणकर सांगतेय, अपमान सहन करुनही झगडत राहण्याची ताकद..

'असे जिव्हारी लागणारे प्रसंगच तर..' सई ताम्हणकर सांगतेय, अपमान सहन करुनही झगडत राहण्याची ताकद..

Motivational story of Sai Tamhankar: आयुष्यात आलेल्या या वाईट अनुभवांमुळे (bad experiences) मी जरुर काही वेळासाठी उदास झाले होते. खूप वाईट वाटले होते. पण आज तेच प्रसंग मला काम करण्यासाठी बळ देतात, असं सांगतेय मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2022 02:25 PM2022-11-09T14:25:48+5:302022-11-09T14:26:35+5:30

Motivational story of Sai Tamhankar: आयुष्यात आलेल्या या वाईट अनुभवांमुळे (bad experiences) मी जरुर काही वेळासाठी उदास झाले होते. खूप वाईट वाटले होते. पण आज तेच प्रसंग मला काम करण्यासाठी बळ देतात, असं सांगतेय मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर. 

Marathi actress Sai Tamhankar telling about the bad experiences when she get neglected from others | 'असे जिव्हारी लागणारे प्रसंगच तर..' सई ताम्हणकर सांगतेय, अपमान सहन करुनही झगडत राहण्याची ताकद..

'असे जिव्हारी लागणारे प्रसंगच तर..' सई ताम्हणकर सांगतेय, अपमान सहन करुनही झगडत राहण्याची ताकद..

Highlightsमाझ्या कामातून मी त्या लोकांना उत्तर देते आणि स्वत:लाच समजावते की आज तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केलं. पण ........

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर (Marathi actress Sai Tamhankar) आज बॉलीवूड चित्रपटांमधूनही तिचं स्थान निर्माण करताना दिसते आहे. मराठीमध्ये तर आजच्या आघाडीच्या नायिकांमध्ये सईचे नाव अग्रक्रमाने घेतले जातेच. पण महाराष्ट्राबाहेरही तिने तिचे अनेक चाहते निर्माण केले आहेत. सईसारखी अभिनेत्री समोर आल्यावर कोण तिच्याकडे पाठ फिरवणार (ignore), सगळीकडे तिच्यासाठी रेड कार्पेटच टाकलेले असणार, असा सर्वसामान्यांचा विचार असतो. पण तिच्यासारख्या चतुरस्त्र अभिनेत्रीकडेही अनेकांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले होते. तेव्हा तिच्या नेमक्या काय भावना होत्या, याविषयीचा तिचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल (viral video of Sai Tamhankar) झाला आहे.

 

sid_kannan या इन्स्टाग्राम पेजवरुन सईच्या मुलाखतीचा एक छोटासा पार्ट असणारा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. मुलाखतीदरम्यान सईला विचारण्यात आले की मोठमोठाल्या ॲवॉर्ड कार्यक्रमांमधून किंवा काही समारंभांमधून तुझ्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं, तुला टाळण्यात आलं, असे काही अनुभव तुला आले आहेत का?

सततच्या कंबरदुखीने वैतागलात? सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानीने सांगितलेले ३ व्यायाम करा, रहा फिट

यावर सईने हो असं उत्तर दिलं. असे अनुभव अनेकदा आले असून नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यातही हाच अनुभव आल्याचं तिनं सांगितलं. पण तिच्यासोबत नेमका कुणी असा प्रकार केला, त्यांची नाव जाहिर करायला मात्र तिने नकार दिला.

 

या अनुभवांविषयी सांगताना सई म्हणते की खरंतर असे अनुभव जेव्हा आले तेव्हा त्याक्षणी खूप वाईट वाटतं. आतून काहीतरी तुटल्यासारखं, अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं. त्याप्रसंगी आपल्याला जे काही वाटत असतं, ते शब्दांत सांगू शकत नाही.

पास्ता, नूडल्स मोकळ्या  हाेण्यासाठी सेलिब्रिटी शेफ संजीव कपूर सांगतात २ टिप्स, चिकट - लगदा होणारच नाही

पण एक मात्र नक्की की असे अनुभवच मला आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा देतात. माझ्या कामातून मी त्या लोकांना उत्तर देते आणि स्वत:लाच समजावते की आज तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केलं. पण उद्या चांगल्या कामामुळे तुम्ही माझ्याकडे स्वत:हून याल, पण तेव्हा मी तुम्हाला टाळेल. 

 

Web Title: Marathi actress Sai Tamhankar telling about the bad experiences when she get neglected from others

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.