Join us  

८१ व्या वर्षी आजींनी केलं स्विमसूट मॉडेलिंग, फिटनेसचं रहस्य काय मॉडेल आजी सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2023 6:28 PM

Martha Stewart Fitness Secret Who Featured in Sports Illustrated 2023 swimsuit issue as cover girl at the age of 81 : मॉडेलिंग क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना या वयात अशाप्रकारचे धाडस करणे हे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे.

मॉडेलिंग करणे हे अनेक तरुणींचे स्वप्न असते. त्यानुसार बऱ्याच जणी या क्षेत्रात येतात. काही जणी नाव कमावतात तर काही जणी कमी कालावधीतच थांबण्याचा निर्णय घेतात. हे क्षेत्र आपल्याला खूप प्रसिद्धी देणारे आणि आकर्षक वाटत असले तरी त्यातही मोठ्या प्रमाणात कष्ट असतातच याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. फिगर, फिटनेस, सौंदर्य या बाबतीत सतत स्वत:ला अपडेट ठेवणे आणि त्यासाठी तन-मन-धनाने समर्पण करणे आवश्यक असते. विशिष्ट वय झाले की या क्षेत्रातून आपल्याला बाहेर पडावे लागते असे अनेकांना वाटते. पण वयाच्या ८१ व्या वर्षीही मॉडेलिंग करणाऱ्या आणि स्वत:ला फिट ठेवणाऱ्या मर्था स्टीवर्ट यांची दखल घेणे महत्त्वाचे आहे. मॉडेलिंग क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना या वयात अशाप्रकारचे धाडस करणे हे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे (Martha Stewart fitness secret who featured in sports illustrated 2023 swimsuit issue as cover girl at the age of 81). 

(Image : Google)

कोण आहेत मर्था स्टीवर्ट

मार्था स्टीवर्ट ह्या एक प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक असून त्यांनी आपल्या वयाच्या 81 वर्षी एका क्रिडा मासिकासाठी स्विमिंग सूटमध्ये फोटोसेशन केले आहे. स्पोर्ट्स इलस्ट्रेटेड असे त्या मासिकाचे नाव असून त्यासाठी त्यांनी फोटोशूट केले आहे. त्या क्वीन ऑफ डोमेस्टिक आर्ट्स म्हणून ओळखल्या जातात. या मासिकासाठी इतर ४ मॉडेल्ससोबत फोटोशूट करणाऱ्या त्या सर्वात वयस्कर महिला ठरल्या आहेत. त्यांनी लिखाण, अन्नशास्त्र, स्टॉकब्रोकर यांसारख्या क्षेत्रामध्ये नाव कमावले आहे. त्यांच्या marthastewart.com हया वेबसाइट ने त्यांना अमेरिकेतील पहिली सेल्फ-मेड बिलेनिअर अशी ओळख मिळवून दिली आहे. 

योग्य प्रमाणात वेळेवर खाणे आणि व्यायाम या २ गोष्टींमुळे त्यांच्यातील चार्म कायम असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच उत्तम झोप घेणेही अतिशय महत्त्वाचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांची लाईफस्टाईल या विषयावर ९९ हून जास्त पुस्तके आहेत. त्यातील बहुतांश पुस्तके ही बेस्ट सेलिंग आहेत. त्यांची मॅरेज इव्हेंटची कंपनी आहे. आपल्यासाठी अशाप्रकारे मॉडेल म्हणून एका स्पोर्ट मासिकावरील कव्हरवर आपला फोटो येणे हे आपल्यासाठी आव्हानात्मक होते. मात्र आपण हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले असे त्या म्हणाल्या. लहानपणी मार्था यांनी युनिलिव्हरच्या जाहिरातीत काम केले होते. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी