Lokmat Sakhi >Inspirational > १४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी २ मुलं - जिद्दीने बनली आयपीएस, पतीने साथ दिली आणि..

१४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी २ मुलं - जिद्दीने बनली आयपीएस, पतीने साथ दिली आणि..

Meet IPS officer who got married at 14, became mother at 18, later cracked UPSC exam, she is posted at... : एका IPS अधिकारी महिलेची व्हायरल स्टोरी, जिद्दीची प्रेरणादायी गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2024 12:31 PM2024-10-27T12:31:38+5:302024-10-27T12:45:42+5:30

Meet IPS officer who got married at 14, became mother at 18, later cracked UPSC exam, she is posted at... : एका IPS अधिकारी महिलेची व्हायरल स्टोरी, जिद्दीची प्रेरणादायी गोष्ट

Meet IPS officer who got married at 14, became mother at 18, later cracked UPSC exam, she is posted at... | १४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी २ मुलं - जिद्दीने बनली आयपीएस, पतीने साथ दिली आणि..

१४ व्या वर्षी लग्न, १८ व्या वर्षी २ मुलं - जिद्दीने बनली आयपीएस, पतीने साथ दिली आणि..

प्रबळ इच्छाशक्ती असली की सगळं काही साध्य करता येतं (Inspirational Story). फक्त ध्येय गाठताना डगमगून न जाता, समस्यांना सामना करता यायला हवं. अशा अनेक जिद्दीच्या गोष्टी आपल्या समोर येतात (IPS). ज्यामुळे आपल्याला ध्येय गाठण्यासाठी हुरूप मिळतो. अशाच एका आयपीएस महिला अधिकाऱ्याची गोष्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. १४ व्या वर्षी लग्न झालं. १८ व्या वर्षात पदरी २ मुलं. पण तरीही शिकण्याची ओढ त्यांना शांत बसू देत नव्हती.

खूप शिकायचं आणि मोठं अधिकारी व्हायचं हे त्यांचं स्वप्न होतं. आणि हेच स्वप्न त्यांनी अथक प्रयत्न करून पूर्ण केलं. ही खडतर गोष्ट आहे, आयपीएस अधिकारी एन. अंबिका यांची, त्यांनी घेतलेल्या संघर्षाची. त्यांनी अहोरात्र घेतलेली मेहनत पाहून, आपल्याला नक्कीच यातून प्रेरणा मिळेल(Meet IPS officer who got married at 14, became mother at 18, later cracked UPSC exam, she is posted at...).

स्वप्न शांत बसू देत नव्हती

मोठं अधिकारी बनण्याची प्रेरणा त्यांना आपल्या पतीकडूनचं मिळाली. प्रजासत्ताक दिनी एका परेडमध्ये आयपीएस अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. अंबिका यांचे पती परेडमध्ये सहभागी झाले होते. परेड करताना पोलिसांनी आयपीएएस अधिकाऱ्याला सॅल्यूट केला. हाच क्षण अंबिका यांना नवी उर्जा देणारा ठरला, आणि त्यांनी आयपीएएस अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगलं.

हातापायांच्या काड्या पण पोट मात्र खूप सुटलंय? ५ सोप्या टिप्स, शरीर सुडौल -पोट होईल कमी

शिक्षण पूर्ण करून स्वप्नांची वाट धरली

अंबिका यांनी दहावी आणि बारावीचं शिक्षण एका खासगी संस्थेतून पूर्ण केलं. पहिल्याच प्रयत्नात पदवीचं शिक्षणही पूर्ण केलं. यूपीएससीचं शिक्षण घेण्यासाठी त्या चेन्नईला रवाना झाल्या. यात अंबिकाच्या पतीची त्यांना मोठी साथ लाभली. त्यांनी नौकरीबरोबर दोन मुलींचाही सांभाळ केला.

वाट्याला अपयश आलं तरीही..

आयपीएएस बनण्याचं स्वप्न पूर्ण उराशी बाळगून बरेच जण मैदानात उतरतात. पण यश मिळेलच असे नाही. यूपीएससी परीक्षेत त्यांना तीनवेळा अपयश आलं. पण त्यांनी हार नाही मानली. त्यांच्या पतीनेही घरी परतण्याचा सल्ला दिला. पण आपल्याला निश्चयावर अढळ राहिल्या.

दिवाळीत फोटो सुंदर यायला हवेत? आजपासून फॉलो करा ७ गोष्टी- १० दिवसांत घटेल वजन

२००८ साली त्यांनी चौथ्यांदा परीक्षा दिली, आणि यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. आणि त्यांनी आयपीएस अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं. त्यामुळे मनाशी निश्चय केला तर, अश्यकही गोष्ट सत्यात उतरतात. याचं उत्तम उदाहरण अंबिका यांनी दिलं आहे. 

Web Title: Meet IPS officer who got married at 14, became mother at 18, later cracked UPSC exam, she is posted at...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.