Lokmat Sakhi >Inspirational > नुपूर आणि अश्विन यांचा इको-फ्रेंडली विवाह सोहळा, बघा नेमकं काय आहे हे...

नुपूर आणि अश्विन यांचा इको-फ्रेंडली विवाह सोहळा, बघा नेमकं काय आहे हे...

Meet the couple who plan eco-friendly weddings for sustainable future : अश्विन, नूपुरच्या एका लग्नाची दुसरी गोष्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2023 10:11 PM2023-04-01T22:11:38+5:302023-04-01T22:18:03+5:30

Meet the couple who plan eco-friendly weddings for sustainable future : अश्विन, नूपुरच्या एका लग्नाची दुसरी गोष्ट...

Meet the couple who plan eco-friendly weddings for sustainable future | नुपूर आणि अश्विन यांचा इको-फ्रेंडली विवाह सोहळा, बघा नेमकं काय आहे हे...

नुपूर आणि अश्विन यांचा इको-फ्रेंडली विवाह सोहळा, बघा नेमकं काय आहे हे...

लग्न म्हटलं की आजकाल आपण खूप मोठा खर्च करतो. मोठंमोठ्या जेवणाच्या पंगती, रोषणाई, सजावट, मोठे दिखावे असे अनेक प्रकार सर्रास केले जातात. आपलं लग्न छान आणि मोठं व्हावं असं प्रत्येक जोडप्याचं स्वप्न असत. लग्न अगदी थाटामाटात करण्यासाठी भरपूर लोक पाण्यासारखा पैसा खर्च करतात. शाही सजावटीपासून ते शाही जेवणापर्यंत सगळं अगदी शाही अंदाजात असत. याउलट काही लोक अगदी साध्या पद्धतीने लग्न करणे पसंत करतात. लग्नाविषयीच्या अनेक हटके घटना, फोटोज, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. अशातच एका हटके लग्नाची घटना समोर आली आहे. 

केटरिंग असो, डेकोरेशन असो किंवा भेटवस्तू असो, अगदी साध्या भारतीय विवाहसोहळ्यांमुळे शेकडो वर्षे पर्यावरणाचा ऱ्हास होत आला आहे. विवाहामध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे पर्यावरणीय परिस्थिती खूपच खालावत जात आहे. याचा विचार करुन पर्यावरणाचे संरक्षण व्हावे या हेतूने कलकत्ताच्या   नुपूर अग्रवाल आणि महाराष्ट्राच्या अश्विन माळवाडे यांनी एका अनोख्या विवाह सोहळ्याचे नियोजन आखत, समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केला आहे. वधू - वरांची लग्नाबाबत अनेक स्वप्ने असतात. काहींना पैश्याच्या जोरावर तर काहीजणांना साधेपणाने लग्न करुन तो क्षण संस्मरणीय बनवायचा असतो(Meet the couple who plan eco-friendly weddings for sustainable future).

इको-फ्रेंडली विवाह म्हणजे नेमकं काय ?

सध्या सोशल मीडियावर पुण्यातील एका जोडप्याच्या लग्नाची फार चर्चा रंगत आहे. पुण्यातील एक जोडपे त्यांच्या पर्यावरणपूरक आणि शाश्वत उपक्रमाद्वारे भारतीय विवाहसोहळ्याची कल्पना नव्याने मांडत आहे. कलकत्ता येथील नुपूर अग्रवाल आणि महाराष्ट्रातील अश्विन माळवाडे यांची मुंबईतील स्वच्छता मोहिमेदरम्यान समुद्रकिनाऱ्यावर भेट झाली. त्यानंतर यांनी इको-फ्रेंडली विवाह करण्याचा निर्णय घेतला. जेव्हा त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा या जोडप्याने अनेक वेडिंग प्लॅनर्सशी संपर्क साधला परंतु या जोडप्याला जे हवे होते ते कोणत्याच वेडिंग प्लॅनर्सकडे उपलब्ध नव्हते. अखेरीस, नुपूर आणि अश्विनने स्वतःच एकत्र येऊन स्वतःच्या इको-फ्रेंडली विवाहाचे नियोजन करण्याचे ठरवले. 

या विवाहाबद्दल सांगताना नुपूर म्हणाली की, लग्नासाठी येणाऱ्या आमंत्रितांचे स्वागत आम्ही फळांचे ज्यूस आणि वेगवेगळ्या प्रकारचे मॉकटेल्स देऊन केले. त्याचप्रमाणे त्यांच्या लग्नाच्या हॉलची सजावट त्यांनी त्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या स्थानिक फुलांनी केली होती. या सजावटी दरम्यान जी फुल वापरली गेली ती नंतर कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापरली जाणार आहेत, यामुळे ही फुले वापरुन झाल्यानंतर कचऱ्यात न फेकता त्यांचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर या दोघांनी आपल्या लग्नाच्या शाही जोड्यांवर देखील वेगळ्या प्रकारचे हॅशटॅग खास बनवून घेतले होते. त्यांच्या या पोशाखांवर #Beat Plastic Pollution (#बीट प्लास्टिक पोल्युशन) आणि  #Save The Planet (#सेव्ह द प्लॅनेट) असे दोन हॅशटॅग पहायला मिळाले. त्याचबरोबर या लग्नांमध्ये नवऱ्याची वरात घोड्यावरुन न येता इलेकट्रीक वाहनावरून आली होती. लग्नातील उरलेल्या अन्नाचे वाटप करण्यात आले, त्यामुळे लग्नानंतर अन्नाची नासाडी झाली नाही . 

गरोदरपणात ‘तिने’ केला १४ देशांचा प्रवास, वर्षाच्या बाळाला घेऊनही फिरतेय एकटी जगभर, कारण...

या जोडप्याने त्यांच्या लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांना विमान प्रवास करण्याऐवजी ट्रेनने प्रवास करण्याची विनंती केली. तसेच्या जोडप्याने येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांच्या नावाने एक - एक छोटे रोपटे लावले. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या लग्नाचे रिटर्न गिफ्ट देताना ते प्लस्टिकच्या गिफ्ट पेपरमध्ये रॅप न करता वर्तमानपत्रात गुंडाळून दिले. यासोबतच लग्नाची मिठाई देण्यासाठी त्यांनी बॉक्सचा वापर न करता त्या जागी स्टीलच्या छोट्या डब्यांवर आपल्या लग्नाची तारीख कोरुन त्यातून लग्नाची मिठाई वाटली. जेणेकरुन या प्लास्टिक बॉक्सचा कचरा निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी ही सुंदर कल्पना आखली. 

त्यांच्या इको-फ्रेंडली लग्नाचे नियोजन केल्यानंतर, या जोडप्याने इको-फ्रेंडली विवाहाची कल्पना पुढे नेण्याचा निर्णय घेतला आणि ग्रीनमिना (Greenmyna.com) नावाची स्वतःची इव्हेंट प्लॅनिंग कंपनी सुरू केली. आता ते इको-फ्रेंडली विवाह कसे आयोजित करावे याबद्दल सल्ला व सुंदर प्लॅनिंग करुन देतात. नुपूर आणि अश्विन आता वाढदिवस, छोट्या - छोट्या घरगुती पार्ट्या, छोटेखानी इव्हेंट्स, कॉर्पोरेट इव्हेंट आणि बरेच काही सण, समारंभ, उत्सव इको-फ्रेंडली कसे साजरे करायचे यासाठी लोकांना प्रोत्साहित करत आहेत. त्यांनी त्यांच्या इव्हेंट प्लॅनिंग कंपनी ग्रीनमिना (Greenmyna.com) अंतर्गत आत्तापर्यंत २०० पेक्षा जास्त झाडे लावली आहेत. याचबरोबर ८,८०० किलो कंपोस्ट खताची निर्मिती केली आहे. 

मर्चंट नेव्ही ऑफिसर आणि ग्रीनमिनाचे सह-संस्थापक अश्विन माळवाडे आता स्थानिक विक्रेत्यांना प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करायचा लावून इको-फ्रेंडली पद्धतींशी जुळवून घेण्यास सक्षम करण्यासाठी स्थानिक गटांसोबत संपूर्ण भारतातील कार्यक्रमांची आखणी करण्यात मदत करतात.

Web Title: Meet the couple who plan eco-friendly weddings for sustainable future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.