Lokmat Sakhi >Inspirational > सगळं जग ड्रायव्हिंग करताना ‘तिचं’च ऐकतं, त्या जीपीएस बाईंचा आवाज कुणाचा? भेटा तिला..

सगळं जग ड्रायव्हिंग करताना ‘तिचं’च ऐकतं, त्या जीपीएस बाईंचा आवाज कुणाचा? भेटा तिला..

Meet The Voice Behind Your GPS Karen Jacobsen : पाहा नेमकी कशी दिसते जीपीएसवर बोलणारी महिला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2023 04:52 PM2023-02-24T16:52:03+5:302023-02-24T17:29:09+5:30

Meet The Voice Behind Your GPS Karen Jacobsen : पाहा नेमकी कशी दिसते जीपीएसवर बोलणारी महिला...

Meet The Voice Behind Your GPS Karen Jacobsen : The whole world listens to 'her' while driving, whose voice is that GPS lady? meet her.. | सगळं जग ड्रायव्हिंग करताना ‘तिचं’च ऐकतं, त्या जीपीएस बाईंचा आवाज कुणाचा? भेटा तिला..

सगळं जग ड्रायव्हिंग करताना ‘तिचं’च ऐकतं, त्या जीपीएस बाईंचा आवाज कुणाचा? भेटा तिला..

Highlightsपाहा जीपीएसवर सुचना देणारी बाई नेमकी आहे तरी कोण..जीपीएसवरचा आवाज ऐकू तेव्हा आपल्याला कॅरेनचा स्मार्ट चेहरा डोळ्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही. 

एरवी आपण ड्रायव्हिंग करताना कोणाचंच ऐकत नसलो तरी एका बाईंचं मात्र आपण सगळं ऐकतो. त्या बाई म्हणजे दुसऱ्या-तिसऱ्या कोणी नसून गुगल मॅपवरच्या बाई असतात. टर्न लेफ्ट, यु आर अॅट युअर डेस्टीनेशन हा आवाज आपल्या अनेकांच्या कानात अगदी फिट असतो. आपल्या शहरातील एखादं ठिकाण शोधायचं असो किंवा दुसऱ्या राज्यात जाऊन एखादं हॉटेल शोधायचं असो आपण अगदी सहज गुगल मॅप लावतो. या मॅपवर आपल्याला रस्ता शोधायला मदत केली जातेच. पण त्याशिवायही आपण ड्रायव्हिंगमध्ये किंवा इतर कोणत्या गोष्टीत बिझी असलो तर आपला रस्ता चुकू नये यासाठी एक महिला आपल्याला तिच्या अतिशय गोड आवाजात डावीकडे वळा, उजवीकडे वळा अशा सूचना देऊन मार्गदर्शन करत असते (Meet The Voice Behind Your GPS Karen Jacobsen). 

(Image : Google)
(Image : Google)

आपल्यापैकी असंख्य जण कायम गुगलकडून ही गुगल मॅपची सर्व्हिस वापरत असतात. मात्र हा आवाज देणारी महिला नेमकी कोण आहे असा प्रश्न आपल्याला पडला असण्याची शक्यता आहे. तर या महिलेचे नाव कॅरेन जॅकोबसन (Karen Jacobsen) असून तिला जीपीएस गर्ल असंही म्हटलं जातं. कॅरेन हिला अशाप्रकारचे काम करण्यासाठी स्टुडीओमध्ये बोलवण्यात आले. तिच्याकडून हजारो फ्रेजेसचे रेकॉर्डींगही करुन घेण्यात आले. मात्र तिला शेवटपर्यंत हे रेकॉर्डींग कशासाठी करत आहेत याबाबत माहिती नव्हती. कॅरेन हिचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला असून ती न्यूयॉर्कमध्ये राहते. ती प्रसिद्ध गायिका, मोटीव्हेशनल स्पीकर आणि व्हॉईस ओव्हर आर्टीस्ट आहे. कॅरेन हिला व्हॅईस ऑफ सिरी म्हणूनही ओळखले जाते. 

गुगल मॅपवरचा किंवा सिरीचा आवाज आपल्या इतक्या ओळखीचा असतो की हा आवाज आपण सहज ओळखू शकतो. आवाजाची ओळख असली तरी त्यामागच्या व्यक्तीबाबत मात्र आपल्याला काहीच माहित नसते. ‘ग्रेट बिग स्टोरी’कडून नुकताच कॅरेनचा एक व्हिडिओ यु ट्यूबवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडिओ काही सेकंदांचा असून यामध्ये कॅरेन आपली अतिशय छान पद्धतीने ओळख करुन देताना दिसत आहे. मी अशी स्त्री आहे जिच्याकडून पुरुष डीरेक्शन्स घेतात असं ती यामध्ये म्हणते. जगभरातील विविध प्रकारच्या जीपीएस आणि स्मार्टफोनवर डीरेक्शन्स देण्यासाठी माझा आवाज वापरण्यात आल्याचे कॅरेन यामध्ये सांगते. त्यामुळे इथून पुढे आपण जेव्हा जीपीएसवरचा आवाज ऐकू तेव्हा आपल्याला कॅरेनचा स्मार्ट चेहरा डोळ्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही. 


 

Web Title: Meet The Voice Behind Your GPS Karen Jacobsen : The whole world listens to 'her' while driving, whose voice is that GPS lady? meet her..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.