Lokmat Sakhi >Inspirational > उत्तर प्रदेशची धाकड गर्ल बनली भारतातील पहिली महिला बाउन्सर, धीट मुलीचा प्रेरणादायी प्रवास...

उत्तर प्रदेशची धाकड गर्ल बनली भारतातील पहिली महिला बाउन्सर, धीट मुलीचा प्रेरणादायी प्रवास...

Female Bouncer Mehrunissa Shaukat Tosses Gender Bias Out Of Bars : लोकांची, विशेषत: क्लबमधील महिलांची काळजी घेणे ही एक मोठी जबाबदारी तिने अतिशय सहजरित्या आपल्या खांद्यांवर घेतली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2023 12:31 PM2023-03-15T12:31:38+5:302023-03-15T12:37:29+5:30

Female Bouncer Mehrunissa Shaukat Tosses Gender Bias Out Of Bars : लोकांची, विशेषत: क्लबमधील महिलांची काळजी घेणे ही एक मोठी जबाबदारी तिने अतिशय सहजरित्या आपल्या खांद्यांवर घेतली आहे.

Mehrunnisa Shaukat Ali, India’s First Woman Bouncer : Breaking The Gender Bias | उत्तर प्रदेशची धाकड गर्ल बनली भारतातील पहिली महिला बाउन्सर, धीट मुलीचा प्रेरणादायी प्रवास...

उत्तर प्रदेशची धाकड गर्ल बनली भारतातील पहिली महिला बाउन्सर, धीट मुलीचा प्रेरणादायी प्रवास...

सध्याच्या जमान्यात असे कोणतेही क्षेत्र नाही ज्यात महिला आघाडीवर नाहीत. प्रत्येक क्षेत्रांत महिलेने आपले पाऊल ठेवून स्वतःच्या विकासासोबत त्या क्षेत्राचीदेखील प्रगती केलेली पहायला मिळते. आजच्या सतत बदलत्या युगात महिलांना सक्षम होणं किती महत्वाचं आहे हे आजच्या पिढीला समजणं खूप  महत्वाचं आहे.

उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील मेहरुन्निसा शौकत अली या ३५ वर्षीय महिलेला भारतातील पहिली महिला बाउन्सर म्हटले जाते. हा असा व्यवसाय आहे ज्यात आजवर फक्त पुरुषांचाच पगडा होता. दिल्लीच्या हौज खास व्हिलेजमधील एका लोकप्रिय रेस्टॉरंटमध्ये काम करणारी मेहरुन्निसा, बारमधील भांडणं सोडवणे, बेकायदेशीर ड्रग्स उघड करणे आणि महिला ग्राहकांचे संरक्षण करणे यासाठी ती कार्यरत असते. लोकांची, विशेषत: क्लबमधील महिलांची काळजी घेणे ही एक मोठी जबाबदारी तिने अतिशय सहजरित्या आपल्या खांद्यांवर घेतली आहे(Mehrunnisa Shaukat Ali, India’s First Woman Bouncer : Breaking The Gender Bias).

फायटर  मेहरुन्निसा... 

मेहरुन्निसा ही भारतातील पहिली महिला बाउन्सर असली तरी तिला भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचे होते किंवा पोलीस अधिकारी व्हायचे होते. पण तिच्या वडिलांनी तिच्या शिक्षणाला व कामाला विरोध करत तिच्या स्वप्नांना साथ दिली नाही. तिचे कुटुंब इतके रूढीवादी होते की तिने पाचवीच्या पुढे शिक्षण घ्यावे असे त्यांना वाटत नव्हते. परंतु तिच्या आईच्या पाठिंब्यामुळेच तिला शाळेत जाता आलं. परंतु मेहरुन्निसा आपल्या निश्चयांशी ठाम होती. त्यामुळे मेहरुन्निसाने  गुपचूप एनसीसी (NCC) जॉईन करत त्याचा अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. 

भारतातील पहिली महिला बाउन्सर म्हणून ओळख मिळाली... 
 
लोकांना सुरक्षित ठेवणे, त्यांचे संरक्षण करणे हे मुळातच मेहरुन्निसाला बालपणापासून आवडत होते. मेहरुन्निसाने पोलिस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहिले होते. आज, ती हे स्वप्ने जगत आहे – पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. ३५ वर्षीय मेहरुन्निसा शौकत अली दिल्लीत बाऊन्सर म्हणून काम करते. मेहरुन्निसा अकरावीत असताना तिने या क्षेत्रांत प्रवेश केला. एकदा ती सुप्रसिद्ध टिव्ही शो इंडियन आयडॉलच्या ऑडिशनसाठी दिल्लीला आली तेव्हाच तिने पहिल्यांदा बाउन्सर कसे असते ते पाहिले. त्याचवेळी बाउन्सरचे काम पाहून ती प्रभावित झाली आणि आज ती एक उत्कृष्ट महिला बाउन्सर आहे.

 

मेहरुन्निसा सांगते की, पूर्वी महिलांना सुरक्षा रक्षक म्हटले जायचे आणि फक्त पुरुषांनाच बाउन्सर म्हटले जायचे. पण मेहरुन्निसाने त्याविरोधात आवाज उठवला आणि बाउन्सर नेमण्याची मागणी केली. त्यानंतर तिला बाउन्सरचे पद मिळाले. त्याचवेळी सुप्रसिद्ध गायक सोनू निगमच्या एका कॉन्सर्टदरम्यान ती स्टेजजवळ पोहोचली, जिथे मेल बाउन्सर काम करत होते. तिने आपल्या हुशारीने गर्दीचे नियोजन केले, त्यानंतर तिच्या मालकाच्या लक्षात आले की सर्व मुली मेहरुन्निसाच्या असण्याने कंफर्ट फिल करत होत्या. आणखी काही कार्यक्रम हाताळल्यानंतर, मेहरुन्निसाला बाउन्सर म्हणून नियुक्त केले गेले आणि यापुढे तिला सुरक्षा रक्षक म्हटले जाणार नाही असे जाहीर केले. त्यानंतर तिला दिल्लीतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंट कम नाईट क्लबमध्ये बाउन्सर म्हणून नोकरी मिळाली, आणि ती भारतातील पहिली महिला बाउन्सर बनली. मेहरुन्निसाला आतापर्यंत अनेक पुरस्कारानेदेखील गौरविण्यात आले आहे. 

 

अनेक मोठ्या इव्हेंट्समध्ये महिला बाउन्सर म्हणून काम पाहिले... 

बाउन्सर म्हणून दहा वर्षांच्या काळात, तिने आयपीएल सामने, रिअ‍ॅलिटी शो, ऑडिशन, चित्रपट प्रमोशन, कॉर्पोरेट लॉन्च इत्यादी विविध कार्यक्रमांसाठी फ्रीलान्स सुरक्षा कार्य देखील केले आहे. तिने दिल्लीतील कार्यक्रमांमध्ये शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा, विद्या बालन आणि दीपिका पदुकोण यांच्यासह अनेक सेलिब्रिटींसाठी काम केले. मेहरुन्निसा हिने तिच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष केला होता. मेहरुन्निसाची धाकटी बहीण, २७ वर्षांची तरन्नुम ही देखील बाउन्सर म्हणून काम करते. आज, त्या दोघी मिळून त्यांच्या ८ लोकांच्या कुटुंबाची काळजी घेण्याइतपत कमाई करत आहेत. महिला सक्षमीकरणाचे उदाहरण असलेली मेहरुन्निसा मर्दानी बाउन्सर आणि डॉल्फिन सिक्युरिटी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्या पार्टनरशिपमध्ये चालवत आहे. २५०० हून अधिक मुला-मुलींना मेहरुन्निसाच्या सुरक्षा सेवेतून काम मिळाले आहे.

Web Title: Mehrunnisa Shaukat Ali, India’s First Woman Bouncer : Breaking The Gender Bias

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.