Join us  

‘मी जशी आहे तशी परफेक्ट आहे’ म्हणत ‘मदर्स डे’च्या निमित्ताने समीरा रेड्डीचं फोटोशूट..पाहा काय म्हणाली...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2023 6:53 PM

Mothers Day Special Sameera Reddy Instagram Post : आई झाल्यावर आपण जाड असू तर त्यात लाज वाटण्याचे कारण नाही हे सांगताना समीरा नेमकी काय म्हणते पाहा...

प्रसिद्ध अभिनेत्री समीरा रेड्डी कायमच तिच्या सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते, तसेच तिच्या बोल्ड वक्तव्यांमुळे ती चर्चेत असते. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना चाहत्यांशी शेअर करण्याबरोबरच ती नेहमी काही ना काही सल्ले देत असते. कोणत्या ना कोणत्या निमित्ताने ती वास्तववादी पोस्ट करणारी म्हणून गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. अभिनेत्री म्हणून नाही तर एक आई म्हणून, स्त्री म्हणून तिच्या आयुष्यात जे काही बदल होतात, ते स्पष्टपणे आणि अगदी खरेपणाने मांडते. म्हणूनच तर अनेकजणींना तिचे प्रॉब्लेम स्वत:चेच असावेत, इतके जवळचे वाटतात. स्त्रियांना साधारणपणे मूल झाल्यावर किंवा इतरही कोणत्या कारणाने आपण जाड झालो तर प्रॉब्लेम वाटतो. वाढलेल्या जाडीमुळे अनेकदा महिलांन न्यूनगंडही येतो. मात्र असा न्यूनगंड येण्याचे काहीच कारण नाही तर आपण जेस आहोत तसेच परफेक्ट आहोत असे समीरा अतिशय ठामपणे सांगते (Mothers Day Special Sameera Reddy Instagram Post). 

(Image : Google)

सेलिब्रेटींग ऑल द ब्युटीफूल ममाज असा मेसेज देत मदर्स डे च्या निमित्ताने समीराने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये निळ्या रंगाची जीन्स आणि पांढरा बनियन स्टाईल टॉप घालत समीराने तिचे फोटोशूट केल्याचे दिसते. माझ्या शरीरात बदल झाले आहेत आणि त्यामुळे माझ्या अॅटीट्यूडमध्येही बदल झाला आहे. माझी साईज, स्टाईल आणि वाईब्ज हे माझ्या मालकीचे आहेत. मी आता जशी आहे, तशी मी स्वत:ला सेक्सी फिल करते असे समीराने या व्हिडिओला कॅप्शन देताना म्हटले आहे. २ दिवसांत तिच्या या इन्स्टाग्रामवरील व्हिडिओला हजारो लाईक्स आले असून अनेकांनी त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. तू नेहमी महिलांना आत्मविश्वास देतेस, तू आमच्यासाठी प्रेरणा आहेस असे म्हणत अनेकींनी समीराचे कौतुक केले आहे. याआधीही समीराने प्रेग्नन्सीमध्ये अंडर वॉटर फोटोशूट केले होते. याशिवाय प्रेग्नन्सीमधील स्ट्रेचमार्क्सविषयीही तिने पोस्ट करत अतिशय मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. बाळंतपणानंतर आलेल्या नैराश्याबद्दलही तिने एक पोस्ट केली होती. 

बॉलीवूडमध्ये ब्रेक घेतल्याने ती बरीच चर्चेत आली होती. तसेच ती तिच्या सासू सोबतचेही काही मजेशीर व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर समीराचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स असून तिच्या सगळ्या पोस्टला चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळतो. समीरा स्पष्टवक्ती असल्याने आणि आपले मत ठामपणे व्यक्त करत असल्याने महिला वर्गाला ती आपली मैत्रीण असल्यासारखी वाटते. फिटनेस आणि डाएटबाबत जागृती करण्याचे काम सध्या समीरा करत आहे. समीरा रेड्डीने अक्षय वर्देसोबत लग्न केले आहे. या जोडप्याला नायरा वर्दे आणि हंस वर्दे नावाची दोन मुले आहेत. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीसमीरा रेड्डी