(Image Credit- New Indian Express)
स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी मुलं वर्षानुवर्ष मेहनत करतात. तेव्हा एखाद्या वर्षी यश मिळतं. तर काहीजण निराशेमुळे मार्ग बदलतात. पण बिकट परिस्थितीतून मार्ग काढत मेहनत करणाऱ्यांना फळ मिळाल्याशिवाय राहत नाही हेच खरं. ज्यांचं संपूर्ण लक्ष अभ्यासाकडे असतं त्यांच्यासाठी हे खूप सोपं आहे.
शेतकाम करणाऱ्या मजूर तरूणीसाठी काम सांभाळून अभ्यास करणं हे किती कठीण असेल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. केरळच्या इडुक्की येथे कामासाठी राहत असलेली सेल्वाकुमारी शेतात मजूरीचं काम करते. पीएससीची परिक्षा या तरूणीनं पहिल्याचवेळी क्लिअर केली आहे.
वेलचीच्या बागांमध्ये काम करताना अभ्यास केला
न्यू इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या माहितीनुसार ही तरूणी छोटूपुरान गावातील वांडीपोरियारची रहिवासी आहे. आपल्या आईसह ती अनेक वर्षांपासून वेलचीच्या शेतात काम करते. काही वर्षांपूर्वी तिचे वडील त्यांना सोडून गावातून निघून गेले होते. सेल्वाच्या दोन्ही बहिणींचे लग्न झाले आहे.
जेव्हाही गरज पडते तेव्हा त्या सेल्वा आणि आईची मदत करतात. शेतीच्या कामातून वेळ काढून सेल्वा आईला भेटण्यासाठी घरी यायची. तर कधी शेतीच्या कामात मदत करायला यायची. आजही सेल्वाची आई आणि आजी एका लहानश्या घरात राहते. शेतीचं काम सांभाळून सेल्वाकुमारी फर्स्ट रँकनं पास झाली.
मिळाली सरकारी नोकरी
ही परिक्षा पास झाल्यानंतर सेल्वाकुमारीला सरकारी नोकरी मिळाली आहे. तामिळनाडूच्या एका सरकारी महाविद्यालयात १२ वी पास केल्यानंतर तिनं गणित विषयासह गॅज्यूएशन पूर्ण केलं आहे. यावेळी तिचे महाविद्यालय तिरुवनंतपुरम येथे होते.
तेव्हा तिच्यासोबतचे विद्यार्थी ग्रामीण भाषा बोलू नकोस असं म्हणायचे पण आता तिच सेल्वा सगळ्यांसाठीच एक आदर्श ठरली आहे. सेल्वाची कामगिरी आयुष्यात काहीतरी करू पाहत असलेल्यांसाठी चांगला आदर्श आहे. सेल्वावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.