Join us  

कमाल! २ आठवड्याच्या लेकीला घेऊन मिसेस वर्ल्ड स्पर्धेत उतरली हन्ना, ८ मुलांच्या आईची जिद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2024 11:29 AM

Mrs America 2023 Winner Hanna Neeleman: अवघ्या २ आठवड्याच्या मुलीला घेऊन हन्ना नीलमैन लास वेगास येथे होत असलेल्या मिसेस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी झाली होती... बघा तिची कहानी...

ठळक मुद्देस्पर्धेदरम्यान जसा वेळ मिळेल तशी आपल्या चिमुकलीला घेऊन फिडिंग करणाऱ्या, तिचे लाड करणाऱ्या हन्नाने तिथल्या प्रत्येकाचेच लक्ष वेधून घेतले होते.

जिद्द, हिंमत आणि आत्मविश्वास असावा तर हन्ना नीलमैनसारखा अशा शब्दांत सध्या सोशल मिडियावर हन्नाचं जबरदस्त कौतूक होत आहे. तिने जे काही केलं आहे ते खरोखरंच हिंमतीचं आणि आत्मविश्वासाचं आहे. हल्ली बाळाच्या जन्मानंतर काही महिने डिप्रेशनमध्ये गेलेल्या अनेक जणींचे किस्से आपण ऐकतो, वाचतो किंवा स्वत:ही अनुभवतो. पण इथे मात्र मिसेस अमेरिका ठरलेली हन्ना नीलमैन मात्र तिच्या अवघ्या २ आठवड्याच्या लेकीला घेऊन मिसेस वर्ल्ड स्पर्धेत सहभागी झाली. स्पर्धेदरम्यान जसा वेळ मिळेल तशी आपल्या चिमुकलीला घेऊन फिडिंग करणाऱ्या, तिचे लाड करणाऱ्या हन्नाने तिथल्या प्रत्येकाचेच लक्ष वेधून घेतले होते. (hanna neeleman entered in a mrs world beauty contest with her new born daughter)

 

दि न्यूयॉर्क टाईम्स यांनी हन्नाची ही गोष्ट जगासमोर आणली. हन्ना नीलमैन ही अमेरिकेतली एक प्रसिद्ध सोशल मिडिया स्टार आहे. अमेरिकेतल्या ग्रामीण भागात राहणारी हन्ना ग्रामीण जीवनावर आधारित अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत असते. तिचे अनेक फूड व्लॉगही प्रसिद्ध आहेत.

मखंडी हलवा नावाचा पदार्थ खाल्ला आहे कधी? सीमापार पाकिस्तानातही त्याची चर्चा, पाहा रेसिपी

ग्रामीण भागातलीच असल्याने वेळ प्रसंगी शेतीची अवजारं घेऊन नवऱ्यासोबत ती शेतातही रग्गड काम करते आणि सौंदर्य स्पर्धांची आवड असल्याने तेवढ्याच हिमतीने, आत्मविश्वासाने सौंदर्य स्पर्धांचे रॅम्पवॉकही गाजवते. शेती, ब्लॉग, सौंदर्यस्पर्धा असा तिच्या कामांचा कॅनव्हास भलामोठा असून एवढं सगळं करून ८ मुलांची जबाबदारीही तिने सक्षमपणे पेलली आहे.

 

मातृत्व हा माझ्यासाठी सगळ्यात मोठ आनंद आहे. जेव्हा मी माझ्या सगळ्या बाळांना कुशीत घेते, तेव्हा मी कोणत्यातरी वेगळ्याच जगात जाते, असं हन्ना नेहमीच सांगते.

घरातली धूळ- दुर्गंधी कमी करणारी ३ रोपं, घर नेहमीच वाटेल फ्रेश- पॉझिटिव्ह, लावून तर पाहा

तिच्या या उत्तरानेच परिक्षकांची मने जिंकून घेतली आणि मिसेस अमेरिकेचा किताब तिच्या नावे झाला. मिसेस वर्ल्ड ही स्पर्धा ती जिंकली किंवा हरली तरी आमच्यासाठी तीच मिसेस वर्ल्ड आहे आणि तिच्या कुटूंबासाठी तीच सुपरमाॅम आहेत, असे तिचे चाहते म्हणत आहेत.  

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीअमेरिका