सचिन तेंडुलकरही तिची बॅटिंग पाहून कमाल खुश झाला. साक्षात त्यानं तिचा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला. ती अनवाणी पायानं क्रिकेट खेळत दणकून शॉट मारणारी मुलगी कोण असा प्रश्न व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकांना पडला होता. तिचं नाव मूमल मेहर. राजस्थानातल्या बाडमेरा जिल्ह्यातल्या शेरपुरा कानासरची ही मुलगी. १४ वर्षांची क्रिकेटवेडी पोर. तिच्या पायात ना बूट, ना खेळायला व्यवस्थित ग्राऊंड, ना काही खास ट्रेनिंग. पण हातात बॅट आली की अत्यंत दणकून बॅटिंग करते, लंबे लंबे शॉट्स दणक्यात मारते. (Mumal mehar played such good cricket barefoot Sachin tendulkar praised)
Kal hi toh auction hua.. aur aaj match bhi shuru? Kya baat hai. Really enjoyed your batting. 🏏👧🏼#CricketTwitter#WPL@wplt20
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 14, 2023
(Via Whatsapp) pic.twitter.com/pxWcj1I6t6
तिचा व्हायरल व्हिडिओ शेअर करण्याचा मोह साक्षात सचिन तेंडुलकरलाही आवरला नव्हता. व्हायरल व्हिडिओत मूमल तुफान फटकेबाजी करताना दिसते. बेटर इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार ही मूमल एका गरीब शेतकऱ्याची लेक. शेती करुन पोट भरणाऱ्या मेहर खान यांची ही मुलगी. आर्थिक स्थिती अत्यंत हालाखीची आहे. खेळण्यासाठी तिच्याकडे चांगले शूजही नाहीत की वडिलांची ऐपतही नाही की मुलीला बूट देतील किंवा क्लास लावतील..
मूमलला ६ बहिणी आणि २ भाऊ आहेत. सध्या ती ज्या शाळेत शिकते त्याच शाळेतील शिक्षक रोशन खान तिला प्रशिक्षण देत आहेत. रोज तीन-चार तास सराव. मग ती आईला घरकामात मदत करते. बकऱ्या चारायला नेते. शाळाही घरापासून ३ किलोमीटर लांब. ती पायी जाते-येते. तिच्या डोळ्यात स्वप्न आहेत क्रिकेट खेळण्याची पण तरी खरी कशी होणार याचं मात्र काहीही उत्तर नाही.