Lokmat Sakhi >Inspirational > लेगिन्स पहनके नहीं खेल सकते थे क्या? चॅम्पिअनशिप जिंकणाऱ्या पाकिस्तानी महिला संघाला विचारले अपमानास्पद प्रश्न..

लेगिन्स पहनके नहीं खेल सकते थे क्या? चॅम्पिअनशिप जिंकणाऱ्या पाकिस्तानी महिला संघाला विचारले अपमानास्पद प्रश्न..

SAFF Championship : पाकिस्तानी महिला फुटबॉल संघ चॅम्पिअनशिप जिंकून परतला पण त्याचं कुणाला कौतुक नव्हतं, उलट त्यांना धारेवर धरत जाब विचारण्यात आला. (South Asian Football Federation Championship.)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2022 03:19 PM2022-09-21T15:19:59+5:302022-09-21T15:24:28+5:30

SAFF Championship : पाकिस्तानी महिला फुटबॉल संघ चॅम्पिअनशिप जिंकून परतला पण त्याचं कुणाला कौतुक नव्हतं, उलट त्यांना धारेवर धरत जाब विचारण्यात आला. (South Asian Football Federation Championship.)

national women's football team players wearing shorts during a tournament, South Asian Football Federation Championship.) | लेगिन्स पहनके नहीं खेल सकते थे क्या? चॅम्पिअनशिप जिंकणाऱ्या पाकिस्तानी महिला संघाला विचारले अपमानास्पद प्रश्न..

लेगिन्स पहनके नहीं खेल सकते थे क्या? चॅम्पिअनशिप जिंकणाऱ्या पाकिस्तानी महिला संघाला विचारले अपमानास्पद प्रश्न..

Highlightsपुरुष संघ हरला म्हणून मातम करणाऱ्या देशात महिला संघ चॅम्पिअन होऊन परतला याचं काही सोयरसुतक होतं?

पाकिस्तानी महिलांचा संघ फुटबॉल चॅम्पिअनशिप जिंकून आला आणि घरी आल्यावर त्यांच्या वाट्याला काय आलं तर निव्वळ अपमान? गेल्या दोन आठवड्यात पाकिस्तान क्रीडा विश्वाला खरं तर आनंद वाटावा असे दिवस होते. पुरुष क्रिकेट संघ आशिया कपच्या फायनलपर्यंत पोहोचला, हरला पण मजल मोठी मारली. विजयाचा दावेदार होता. आणि महिला फुटबॉल संघ. त्यांच्याकडून कुणाला अपेक्षाही नव्हत्या. आजवर त्यांनी काही खास कामगिरीही केली नव्हती. पण यंदा मात्र लिग सामन्यापासून सुसाट मुसंडी मारत हा संघ थेट फायनलपर्यंत पोहचला. (South Asian Football Federation Championship.) अंतिम सामन्यात मालदिवला ७-० ने हरवून त्यांनी पहिल्यांदा साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन चॅम्पिअनशिप जिंकली. (SAFF Championship) आणि घरी परतल्या.. पण परत आल्यावर कौतुक सोडाच त्यांना प्रश्न विचारण्यात आला, शॉर्ट घालून का खेळल्या?


विश्वास बसणार नाही पण हे खरंय. आणि वास्तव आहे पाकिस्तानी पत्रकारितेतल्या बुरसट विचारांचे आणि मुलींच्या वाट्याला येणाऱ्या मुस्कटदाबीचे. तर मुलींचा हा संघ फुटबॉल चॅम्पिअन होऊन परतला, त्यांची पत्रकारपरिषद सुरु होती. तर कोच असलेल्या आदिल रिझवींना लाहोरस्थित पत्रकार रफिक खान यांनी प्रश्न केला की आपल्या देशातल्या मुलींनी असं निक्कर घालून खेळणं बरं दिसतं का? लेगिन्स नसत्या का घालता आल्या? ( निक्कर पहनके खेलने की क्या जरुर है? लेगिन्स पहनके नहीं खेल सकते थे क्या?’
हा अप्रस्तूत प्रश्न ऐकून मुली तर गप्प बसला. प्रशिक्षकांनी वेळ मारुन नेत सांगितलं की, कपड्यांचं ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे खेळातही वगैरे.
त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. अनेकांनी त्यावर टीका केली, आपल्या देशात महिला खेळाडूंचं काय दर्जाचं स्वागत होतं हे पाहून अनेकजण चिडले. पण ते समाजमाध्यमात. प्रत्यक्षात काही कुणाला ना त्या प्रश्नाचं फार काही गैर वाटलं ना कुणाला काही खटकलं.
पुरुष संघ हरला म्हणून मातम करणाऱ्या देशात महिला संघ चॅम्पिअन होऊन परतला याचं काही सोयरसुतक होतं.
प्रश्न असेल तर एकच होता, शॉर्ट का घातल्या?


खेळाडू महिलांना अजून किती संघर्ष करायचा आहे याची झलक आहे हे प्रकरण म्हणजे..
एकीकडे पाकिस्तानचा संघ जिंकून त्यांचा हा अपमान.
दुसरीकडे आजवर पाचवेळा चॅम्पिअन असलेला भारतीय महिला फुटबॉल संघ यावेळी लिगमध्येच बाद झाला, त्याचीही ना चर्चा ना दु:ख.
भारतीय उपखंडात महिला आणि खेळ याविषयीची ही आहे खरी अवस्था!

Web Title: national women's football team players wearing shorts during a tournament, South Asian Football Federation Championship.)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.