मिसेस इंडिया वर्ल्डचे लॉस (Mrs india world 2022) वेगास येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेची विजेती अमेरिकेचा शिलिन फोर्ड ही ठरली. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नवदीप कौरने टॉप 15 मध्ये स्थान मिळवले आहे. यासोबतच नवदीप कौरला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय वेशभूषा पुरस्कार मिळाला आहे. (Navdeep kaur wins best national costume for kundalini chakra)
सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय वेशभूषा स्पर्धेतून नवदीप कौरची छायाचित्रे आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या चित्रांमध्ये, नवदीपने "कुंडलिनी चक्र" द्वारे प्रेरित होऊन तिनं सोनेरी पोशाख परिधान केला."मिसेस वर्ल्ड 2022" च्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर नवदीपचे फोटो शेअर करून ही माहिती देण्यात आली आहे. आणि कॅप्शन लिहिले - "मिस इंडियाचा राष्ट्रीय ड्रेस सादर करत आहे.
नवदीप कौरने "कुंडलिनी चक्र" द्वारे प्रेरित होऊन हा ड्रेस परिधान केला. नवदीपचा हा हटके ड्रेस Eggie Jamin ने डिजाईन केला. भारताचं वेगळेपण आंतरराष्ट्रीय मंचावर दाखवणं हे असा ड्रेस डिजाईन करण्यामागचं उद्दिष्ट होतं. तिनं आपल्या वेशभूषेतून युनिक स्टाईल आणि आत्मविश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला.
नवदीपचा परिचय
नवदीप ओडीसाच्या राऊरकेला शहरातील कांसबहलची रहिवासी आहे. कंप्यूटर सायंसमध्ये डिग्री आणि एमबीए पूर्ण केलेली नवदीप ब्यूटी पेजेंटमध्ये प्रवेश करण्याआधी एका प्रायव्हेट बँकमध्ये नोकरी करत होती. ती एक असिस्टंट प्रोफेसरसुद्धा होती. ऑक्टोबर २०२० मध्ये नवदीप मिसेस इंडिया वर्ल्डची विजेती ठरली. त्यानंतर तिला मिसेस वर्ल्ड २०२२ च्या पेजेंटमध्ये भारताचं प्रतिनिधत्व करण्यासाठी निवडण्यात आलं.
२०१४ मध्ये नवदीपचं लग्न कमलदीप सिंह यांच्याशी झालं. त्यांना ५ वर्षांची जसलीन नावाची मुलगीसुद्धा आहे. इंडिया टु डे शी बोलताना कमलदिप सिंहांनी पत्नीच्या या कामगिरीवर गर्व असल्याचं सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार नवदीपनं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतली. याच कारणामुळे तिनं नोकरीसुद्धा सोडली.