Lokmat Sakhi >Inspirational > झेपावे सुर्याकडे! आदित्य एल- १ लॉंचिंगच्या प्रोजेक्ट डायरेक्टर निगार शाजी, म्हणाल्या.. स्वप्न खरीही होतात कारण..

झेपावे सुर्याकडे! आदित्य एल- १ लॉंचिंगच्या प्रोजेक्ट डायरेक्टर निगार शाजी, म्हणाल्या.. स्वप्न खरीही होतात कारण..

Nigar Shaji: आदित्य एल १ (Aditya L1) सोबत इस्त्रोच्या नारीशक्तीनेही गगन भरारी घेतली आहे.... तामिळनाडूच्या निगार शाजी आदित्य एल- १ लाँचिंग प्रोजेक्टच्या डायरेक्टर (project director) आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2023 05:31 PM2023-09-02T17:31:54+5:302023-09-02T17:32:40+5:30

Nigar Shaji: आदित्य एल १ (Aditya L1) सोबत इस्त्रोच्या नारीशक्तीनेही गगन भरारी घेतली आहे.... तामिळनाडूच्या निगार शाजी आदित्य एल- १ लाँचिंग प्रोजेक्टच्या डायरेक्टर (project director) आहेत.

Nigar Shaji ISRO aditya l1 mission project director | झेपावे सुर्याकडे! आदित्य एल- १ लॉंचिंगच्या प्रोजेक्ट डायरेक्टर निगार शाजी, म्हणाल्या.. स्वप्न खरीही होतात कारण..

झेपावे सुर्याकडे! आदित्य एल- १ लॉंचिंगच्या प्रोजेक्ट डायरेक्टर निगार शाजी, म्हणाल्या.. स्वप्न खरीही होतात कारण..

Highlightsनिगार शाजी अगदी सर्वसामान्य घरातल्या आहेत. पण अभ्यासात लहानपणापासून अतिशय हुशार. त्यांचे वडील शेती करायचे तर आई गृहिणी होती.

चंद्रयानाचं यशस्वी उड्डाण झाल्यानंतर आता भारताच्या आदित्यने (Aditya L1) सुर्याकडे यशस्वी झेप घेतली आहे. भारताची ही गगनभरारी सगळ्या जगालाच अचंबित करणारी आहे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे यामध्ये महिला शास्त्रज्ञांनी अतिशय भरीव योगदान  दिले आहे. नुकतंच काही तासांपुर्वी आदिल्य एन- १ ने सुर्याकडे झेप घेतली असून त्या प्रोजेक्टच्या डायरेक्टर होत्या तामिळनाडूच्या शास्त्रज्ञ निगार शाजी. आदित्यच्या यशस्वी उड्डाणानंतर आता ५९ वर्षीय निगार यांनी भारताचेच नाही तर सगळ्या जगाचेच लक्ष वेधून घेतले आहे. (Nigar Shaji ISRO Aditya l1 mission project director)

 

निगार शाजी अगदी सर्वसामान्य घरातल्या आहेत. पण अभ्यासात लहानपणापासून अतिशय हुशार. त्यांचे वडील शेती करायचे तर आई गृहिणी होती. तामिळनाडूतील शेंगोट्टई सरकारी शाळेत त्यांचं इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालं.

जान्हवी कपूरच्या २४ हजारांच्या लिनन साडीचा व्हायरल फोटो, तिची साडी नेसण्याची पद्धतही वेगळीच..

त्यानंतर त्यांनी तिरुनेलवेली येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतली आणि शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर त्यांनी झारखंड येथील एका महाविद्यालयातून एमई चे शिक्षण घेतले. ते शिक्षण पुर्ण झाल्यानंतर १९८७ साली त्या इस्त्रोमध्ये रुजू झाल्या. तेव्हापासून ते आजपर्यंत जिथे कुठे संधी मिळेल, तिथे त्यांनी उल्लेखनिय कामगिरी केली आहे. चंद्रयान आणि मंगळयान प्रक्षेपणातही त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. 

 

शास्त्रज्ञ म्हणून कामाचा अनुभव याविषयी मागे त्यांची एक मुलाखत झाली होती.

कंबरेवरचे चरबीचे टायर झरझर उतरतील, १५ मिनिटांचे ३ व्यायाम- विसरा सुटलेले पोट-कंबर

त्यावेळी बाेलताना त्या म्हणाल्या होत्या की इस्त्रोच्या कोणत्याही शाखेत स्त्री आणि पुरुष यांच्यात कोणताच भेदभाव केला जात नाही. प्रत्येकजण आपल्या कामावरून ओळखला जातो. प्रत्येकाला आपलं लक्ष्य गाठण्यासाठी समान संधी आणि प्रोत्साहन दिलं जातं. 

 

Web Title: Nigar Shaji ISRO aditya l1 mission project director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.