Lokmat Sakhi >Inspirational > सात महिने गरोदर असलेली खेळाडू जेव्हा ऑलिम्पिक खेळते, आई खरंच काहीही करु शकते!

सात महिने गरोदर असलेली खेळाडू जेव्हा ऑलिम्पिक खेळते, आई खरंच काहीही करु शकते!

Olympic fencer reveals she was 7 months pregnant while competing : ऑलिम्पिकमध्ये इजिप्तची सात महिने गरोदर खेळाडू जेव्हा पदकाची दावेदारी सांगते, तेव्हा दिसते आईसह खेळाडूची हिंमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2024 02:32 PM2024-07-31T14:32:37+5:302024-07-31T16:20:41+5:30

Olympic fencer reveals she was 7 months pregnant while competing : ऑलिम्पिकमध्ये इजिप्तची सात महिने गरोदर खेळाडू जेव्हा पदकाची दावेदारी सांगते, तेव्हा दिसते आईसह खेळाडूची हिंमत

Olympic fencer reveals she was 7 months pregnant while competing | सात महिने गरोदर असलेली खेळाडू जेव्हा ऑलिम्पिक खेळते, आई खरंच काहीही करु शकते!

सात महिने गरोदर असलेली खेळाडू जेव्हा ऑलिम्पिक खेळते, आई खरंच काहीही करु शकते!

गरोदरपण म्हणजे आजारपण नव्हे, आपली तब्येत सांभाळून पोटातल्या बाळासह महिला किती उत्तम काम करतात हे आपण अवतीभोवती पाहतोच (Olympic 2024). पण ऑलिम्पिक स्पर्धेत कुणी आपल्या पोटातल्या बाळासह उतरतं का? विश्वास नसेल बसत तर या तलवारबाजीत निपूण खेळाडूला भेटा (Pregnant Olympian).


सात महिने गरोदर असताना आपण पोटातल्या बाळासह तलवारबाजी स्पर्धेला उतरलो, लोकांना आम्ही दोनच स्पर्धक दिसत असलो तरी प्रत्यक्षात तीन होतो असं तिने स्वत:च स्पर्धेनंतर तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमधून सांगितलं. इजिप्तची महिला तलवारबाज नादा हफिझ असं तिचं नाव. वय २६, ७ महिने गरोदर आणि पहिला राऊण्ड जिंकत तिने ऑलिम्पिक दावेदारी कायम ठेवली(Olympic fencer reveals she was 7 months pregnant while competing).

जागतिक क्रमवारीत १० व्या स्थानावर असलेल्या एलिझाबेथ तार्ताकोवस्कीला नादाने पहिल्या फेरीत १५-१६ फरकाने पराभूत केलं. त्यानंतर तिचा  सामना दक्षिण कोरियाच्या जीऑन हायोंगविरूद्ध झाला. ज्यात तिला पराभवाचा सामना करावा लागला.

तैवानची ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेती म्हणते, ‘दंगल’ हा तर माझ्या आयुष्याचा सिनेमा, कारण..

त्यानंतर नादाने सोशल मीडियात एक पोस्ट शेअर केली. ती म्हणते, '७ महिन्यांची प्रेग्नंट ऑलिम्पियन! पोडीयमवर तुम्हाला दोन खेळाडू दिसले. पण प्रत्यक्षात तीन होते. एक मी, एक माझी प्रतीस्पर्धी आणि अजून या जगात न आलेलं माझं पोटातलं बाळ!‘गरोदरपण सोपं नाही. चढउतारांचा सामना करावा लागतो. जीवन आणि खेळ यांचा समतोल राखत संघर्ष चुकलेला नाही.


हा खेळ जरी कठीण असला तरी खेळणं मोलाचं आहे. मी राऊंड ऑफ १६ मध्ये माझं स्थान निश्चित करू शकले, याचा मला अभिमान आहे. मी भाग्यवान आहे, माझ्या नवऱ्याचा माझ्यावर विश्वास आहे, आणि माझ्या कुटुंबाच्या पाठींब्यानेच मी इथवर पोहचले. मी तीनवेळची ऑलिम्पियन जरी असले तरी, यंदाचे ऑलिम्पिक माझ्यासाठी खास ठरले.माझ्याबरोबर छोटा ऑलिम्पियन देखील होता.'

‘ही’ गोष्ट फक्त मनू भाकरच्या ‘त्या’ टॅटूची नाही, नैराश्याच्या खोल गर्तेतून उभं राहण्याची जिद्दही आहे!

नादा ही मुळची इजिप्तची राजधानी कैरोतील रहिवासी आहे. हे तिचे तिसरे ऑलिम्पिक आहे. यापूर्वी तिने इजिप्तकडून २०१६ साली रिओ ऑलिम्पिक आणि २०२१ साली टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. नादाची ही गोष्ट जगभरातल्या बायकांना आईपणाचा प्रवास सोपा आणि अवघड यापलिकडे जाणारा आनंदाचा प्रवास आहे हेच सांगतेय.

Web Title: Olympic fencer reveals she was 7 months pregnant while competing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.