भारतात कृषी क्षेत्र हे स्त्रियांसाठी उपजीविकेचा निर्णायक स्रोत म्हणून उदयाला आले आहे. ग्रामीण भागातील ८५ टक्के स्त्रिया शेती आणि शेती सलग्न कामं करतात. हे प्रमाण लक्षणीय असूनही ह्यांतील केवळ १३ टक्के स्त्रियांकडे जमिनीची मालकी आहे.
तंत्रज्ञान व नवोन्मेषाच्या क्षेत्रात वेगाने होत असलेल्या प्रगतीमुळे कृषी ४.० हे नवीन युग लवकरच येणार आहे. या रूपांतरणाच्या प्रक्रियेत केवळ शेती करण्याच्या पद्धतींमध्येच क्रांती होत आहे असे नाही, तर पारंपरिक लिंगाधारित भूमिकांमध्येही बदल होत आहे आणि स्त्रियांसाठी कामाच्या नवीन संधी खुल्या होत आहेत.
आपल्या ‘जेंडर-स्मार्ट’ उपक्रमांच्या माध्यमातून बेयर्स बेटर लाइफ फार्मिंग (बीएलएफ) समूह भारतातील अल्पभूधारक स्त्रियांना आवश्यक ती मदत पुरवत आहे. बीएलएफ अल्पभूधारक स्त्रियांना उपजीविकेच्या साधनांमध्ये सुधारणा घडवून आणण्यात मदत करत आहे. या कार्यक्रमाद्वारे प्रशिक्षण व क्षमता बांधणी देऊ केली जाते, सहाय्य पुरवले जाते तसेच कौशल्य विकासात मदत केली जाते. त्यामुळे स्त्रियांना बीएलएफ केंद्र घेण्याची व ती चालवण्याची क्षमता प्राप्त होते.
२०२२ मध्ये, भारतभरात १०००हून अधिक बेटर लाइफ फार्मिंग केंद्रे सुरू करण्यात आली. सुचिता भोसले ह्या अशाच कृषीउद्योजकांपैकी एक आहेत. २६ वर्षीय सुचिता सातारा जिल्ह्यातील ५,०००हून अधिक शेतकऱ्यांना सक्षम करत आहेत.
सातारा भागात ३० टक्के प्रमाण अल्पभूधारक स्त्रियांचे आहे. सोया, गहू, हरबरा आणि भाज्या ह्यांसारख्या अनेकविध पिकांची बियाणीही त्या पुरवतात. कृषीउद्योजक म्हणून ‘मॅनेज इंडिया अवॉर्ड’ही त्यांना मिळाले आहे. सुचिता सांगतात, “ या कार्यक्रमामुळे या प्रदेशातील अल्पभूधारकांमधील शेतीची पूर्ण क्षमता खुली होत आहे, त्यांना अधिक यश व समृद्धी प्राप्त करण्यासाठी सक्षम करत आहे.