Lokmat Sakhi >Inspirational > चेहरा गोंदवण्याची विशिष्ट परंपरा असलेल्या आदिवासी तरुणीने दिल्या टीव्हीवर बातम्या! समाजाचे नियम तोडणाऱ्या ओरिनीची गोष्ट

चेहरा गोंदवण्याची विशिष्ट परंपरा असलेल्या आदिवासी तरुणीने दिल्या टीव्हीवर बातम्या! समाजाचे नियम तोडणाऱ्या ओरिनीची गोष्ट

आपण ठरवलं तर आपले मूळ-कूळ, परंपरा आणि संस्कृतीशी निगडित आपली ओळख ही आपण आपली ताकद बनवू शकतो. त्यासाठी स्वत:वर आणि आपल्या ताकदीवर विश्वास हवा. हा विश्वास ओरिनी कायपारा या न्यूझीलंडमधील 37 वर्षीय न्यूज ॲंकरने दाखवला आणि जगासाठी ओरिनी हीच बातम्यांचा आणि चर्चेचा विषय झाली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 03:40 PM2021-12-31T15:40:07+5:302021-12-31T17:17:08+5:30

आपण ठरवलं तर आपले मूळ-कूळ, परंपरा आणि संस्कृतीशी निगडित आपली ओळख ही आपण आपली ताकद बनवू शकतो. त्यासाठी स्वत:वर आणि आपल्या ताकदीवर विश्वास हवा. हा विश्वास ओरिनी कायपारा या न्यूझीलंडमधील 37 वर्षीय न्यूज ॲंकरने दाखवला आणि जगासाठी ओरिनी हीच बातम्यांचा आणि चर्चेचा विषय झाली.

Orini Kaipara beacome first news anchor women in world with Maori tattoo on her face | चेहरा गोंदवण्याची विशिष्ट परंपरा असलेल्या आदिवासी तरुणीने दिल्या टीव्हीवर बातम्या! समाजाचे नियम तोडणाऱ्या ओरिनीची गोष्ट

चेहरा गोंदवण्याची विशिष्ट परंपरा असलेल्या आदिवासी तरुणीने दिल्या टीव्हीवर बातम्या! समाजाचे नियम तोडणाऱ्या ओरिनीची गोष्ट

Highlightsओरिनी कायपारा ही न्यूझीलंडमधील माओरी या आदिवासी जमातीतील आहे.मुख्य प्रवाहातील प्रसार माध्यमात प्राइम टाइममधे बातम्या देणारी ओरिनी जगातील पहिली माओरी महिला ठरली. प्राइम टाइममधे आपल्याला बातम्या देण्याची संधी मिळाली पाहिजे असं स्वप्नं तिने प्रत्रकारितेत पाऊल ठेवताच पाहिलं होतं.

जगभरात आदिवासी जाती जमातीतील लोक, त्यांचे नेते  त्यांच्या मूळ हक्कांसाठी संघर्ष करत आहेत. खरंतर आदिवासी म्हणजे मूळचे रहिवासी. त्यांची भाषा, त्यांची संस्कृती, त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण राहाणीमान ही त्यांची खरी ओळख आणि ताकद. पण मुख्य प्रवाहात ही ताकद आणि ते बाळगणारे लोक यांच्याकडे मात्र दुर्लक्ष होतं, त्यांचे मुलभूत आणि न्याय्य अधिकारही डावलले जातात. ज्यासाठी त्यांना कठीण संघर्षातून् जावं लागतं. हे कटू असलं तरी वास्तव आहे. पण या वास्तवात आपण ठरवलं तर आपले मूळ-कूळ, परंपरा आणि संस्कृतीशी निगडित आपली ओळख ही आपण आपली ताकद बनवू शकतो. त्यासाठी स्वत:वर आणि आपल्या ताकदीवर विश्वास हवा. हा विश्वास ओरिनि कायपारा या न्यूझीलंडमधील 37 वर्षीय  न्यूज ॲंकरने दाखवला आणि जगासाठी ओरिनी हीच   बातम्यांचा आणि चर्चेचा विषय झाली. 

Image: Google

ओरिनी कायपारा ही न्यूझीलंडमधील पुरस्कारप्राप्त आणि अत्यंत हुशार पत्रकार आहे. पण जगात तिचं कौतुक होण्याचं कारण मात्र वेगळं आहे.  ओरिनी ही नग्टी अवा, नग्टी, टुव्हारेटोआ, नग्टी रांगिटिहि आणि नगाही टुहे या कुळातील आहे. हे कूळ न्यूझीलंडमधील माओरी आदिवासी जमातीत येतात. न्यूझीलंडमधे सत्तेत माओरी आदिवासी जमातीला पुरेसं प्रतिनिधित्त्व नाही , ते मिळावं यासाठी संघर्ष सुरु आहे. या पार्श्वभूमीवर ओरिनी कायपारा हिचं कर्तृत्त्व हे उठून् दिसतं.  ओरिनीने न्यूझीलंडमधील प्रसारमाध्यमांच्या  मुख्य प्रवाहात स्वत:ची मूळ आणि पारंपरिक ओळख आणि वैशिष्ट्यासह स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. ते निर्माण करताना तिनं स्वत:चं एक मोठं स्वप्नं देखील पूर्ण केलं आहे.

 गेल्या 20 वर्षांपासून माओरी प्रसारमाध्यामात काम करते. ती रिपोर्टर, ट्रान्सलेटर आणि न्यूज ॲंकर म्हणून काम करते.आतापर्यंत ती फक्त दुपारच्या बातम्या द्यायची. पण मागच्या आठवड्यात पहिल्यांदा तिने वृत्तवाहिनीवर संध्याकाळी 6 म्हणजे प्राइम टाइममधे न्यूज ॲंकर म्हणून  तिने बातम्या दिल्या आणि ओरिनीने केवळ न्यूझीलंडमधील प्रेक्षकांचंच नाही  तर संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं. आज ती न्यूझीलंडमधील प्रसारमाध्यमात प्राइम टाइममधे बातम्या देणारी  माओरी या आदिवासी जमातीतील महिला वृत्त निवेदक अर्थात न्यूज ॲंकर ठरली. हनुवटीवर माओरी जमातीचा ठसठशीत टॅटू असलेल्या ओरिनीने प्राइम टाइममधे केलेला प्रवेश तिच्या पध्दतीने साजराही केला. बातम्या दिल्यानंतर तिने हा व्हिडीओ '6 पीएम डेब्यू' या शिर्षकासह पोस्ट केला. तिने हा व्हिडीओ पोस्ट केल्याबरोबर जगभरातल्या नेटिझन्सने तिचे कौतुक केले. तिने आणखी पुढे जावं यासाठी शुभेच्छाही दिल्या. आपली माओरी जमात जगापुढे आणण्यासाठी ओरिनीने मोठं काम केलं आहे. आज तुझ्याकडे बघून माओरी जमातीतील तरुण मुलींना मुख्य प्रवाहात येण्याची प्रेरणा मिळेल अशा कौतुक करणाऱ्या हजारो प्रतिक्रिया तिच्या पोस्टला मिळाल्या. तसेच आपल्या हनुवटीवर माओरी जमातीतल्या महिलांची ओळख असलेला टॅटू  गोंदवून प्राइम टाइममधे झळकून तिने माओरी जमातीच्या भोवती असलेल्या सीमा ओलांडल्या आहे. 

Image: Google

ओरिनीच्या हनुवटीवर असलेला टॅटू म्हणजे मोको काऔ या महिलांची ओळख आहे. मोको काऔ म्हणजे माओरी जमातील महिला.  या महिला विस्तारित कुटुंबातल्या असतात. या कुटुंबात एकाच  वंशापासून अनेक पिढ्या तयार होतात. या जमातीत एकाच रक्ताची माणसं एकमेकांशी लग्न करतात. एकमेकांसोबत राहाणं, एकमेकांचा आधार बनणं हे या जमातीचं वैशिष्ट्य. तर मोको काऔ म्हणजे त्यांच्या जमातीत नेता असलेल्या महिला. आपली विशिष्ट ओळख जपण्यासाठी  त्यांच्या हनुवटीवर् एक विशिष्ट पध्दतीनं गोंदलेलं असतं. 

Image: Google

ओरिनी गेल्या वीस वर्षांपासून न्यूझीलंडमधे प्रसार माध्यमात काम करत असली तरी 2017 मध्ये  तिने पहिल्यांदा आपण माओरी जमातीतील मोको काऔ आहोत म्हणजे माओरी जमातीतील महिला आहोत ही ओळख उघड केली आणि तेव्हापासून तिने आपल्या हनुवटीवर हा मोको काऔचा टॅटू गोंदवला .  2018मधे तिला ' व्होयेजर बेस्ट माओरी अफेअर्स रिपोर्टर' म्हणून पुरस्कार मिळाला. 2019 मध्ये पहिल्यांदा ओरिनी कायपारा ही मुख्य प्रवाहातील टीव्ही प्रोगाम होस्ट करणारी जगातील पहिली मोको काऔ महिला ठरली.  पण दोन वर्ष ती दुपारच्याच बातम्या द्यायची. प्राइम टाइममधे आपल्याला बातम्या देण्याची संधी मिळाली पाहिजे असं स्वप्नं तिने प्रत्रकारितेत पाऊल ठेवताच पाहिलं होतं. ते आता साकार झाल्यामुळे ओरिनीला खूप आनंद झाला आहे. 'आपल्या काय वाटतंय हे सांगताना माझ्याकडे शब्द नाही असं नाही पण मी गोंधळून गेले आहे. मुख्य प्र्वाहातील बातमीदारीत प्राइम टाइम ॲंकरिंगपर्यंत पोहोचायला मला इतका वेळ लागला. पण आज माओरी जमातीतील मोको काऔ म्हणून एक पाऊल पुढेच नाहीच तर वरही ठेवलं आहे याचा आनंद खूप मोठा आहे!' या शब्दात ओरिनीने आपला आनंद व्यक्त केला.  चार मुलांची आई असलेली ओरिनी मोठ्या आत्मविश्वासाने आपल्या क्षेत्रात वावरते आणि तीही आपली पारंपरिक आणि सांस्कृतिक ओळख घेऊन. 

मोको काऔ हा टॅटू गोंदवण्याची पध्दत आधुनिक काळात इतिहासाच्या पुस्तकापुरतीच सीमित होती. पण आपण माओरी आहोत  हे दाखवणारी ओळख गोंदवण्याची पध्दत पुन्हा 1990 पासून सुरु झाली. ही पध्दत प्रामुख्याने सरकार बनवताना आपल्याला पुरेसं प्रतिनिधित्त्व मिळावं यासाठी म्हणून होती. पण ओरिनीने हा टॅटू गोंदवला तो अभिमानानं. आपण आपली ओळख लपवून , सांस्कृतिक खूणा दडपून ठेवण्याचं कारण नाही. ही पारंपरिक ओळख आणि आपल्या सांस्कृतिक खुणांमधे आपली जगात ओळख निर्माण करण्याची, आपली जागा बनवण्याची ताकद आहे. या शब्दात ओरिनीने आपल्या जमातीतील इतर मुलींनाही प्रेरणा दिली आहे. नाताळाच्या सुट्या म्हणून ओरिनी काम करत असलेल्या वृत्त वाहिनीतले बातमीदार सुटीवर होते.  या निमित्तने ओरिनीला प्राइम टाइममधे झळकण्याची संधी मिळाली आणि तिने मोठ्या आत्मविश्वासानं कृतीत आणली.

Web Title: Orini Kaipara beacome first news anchor women in world with Maori tattoo on her face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.