Join us  

Pilot Monika Khanna : १९१ प्रवाशांचे जीव वाचवणारी कॅप्टन मोनिका; 'ती'ची कामगिरी पाहून तुम्हीही कौतुक कराल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 7:03 PM

Pilot Monika Khanna : प्रतिकूल परिस्थितीतही तिने घाबरून न जाता एकाच इंजिनवर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करून विमानातील सर्व प्रवाशांना पाटणा विमानतळावर सुखरूप उतरवून स्वतःला सिद्ध केले.

बिहारमधील पटना(Patna) विमानतळावर रविवारी मोठी दुर्घटना टळली. हवेत पक्षी आदळल्यानंतर स्पाइसजेटच्या विमानाला आग लागली, त्यामुळे त्याचे एक इंजिन बंद झाले. यानंतर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आणि अनेक कर्मचाऱ्यांसह १९१ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. (Pilot monika khanna who saved 191 lives by emergency landing)

या घटनेनंतर पायलट मोनिकाचे (Monika Khanna) देशभरातून जोरदार कौतुक होत आहे. खरे तर हे विमान दुसरे कोणी नसून पायलट मोनिका उडवत होती. स्पाईसजेटची पायलट मोनिका खन्ना फ्लाइट SG 723 ची पायलट-इन-कमांड (PIC) होती. प्रतिकूल परिस्थितीतही तिने घाबरून न जाता एकाच इंजिनवर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करून विमानातील सर्व प्रवाशांना पाटणा विमानतळावर सुखरूप उतरवून स्वतःला सिद्ध केले.

मोनिका खन्ना हिला प्रवास करणे आणि फोटो काढणे आवडते. तिच्या इंस्टाग्राम आयडीवर असे अनेक फोटो आहेत, ज्यामध्ये ती प्रवास करताना दिसत आहे. तरुण वैमानिक जितकी शूर आहेत तितकीच ती सुंदर आहे. ती एखाद्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. विमान विमानतळावर उतरल्यानंतर लोकांनी बनवलेल्या व्हिडिओमध्ये एका इंजिनमधून ठिणग्या बाहेर पडताना दिसत आहेत.

विमानतळ प्राधिकरणाला इमर्जन्सी लँडिंगची माहिती मिळाल्याने अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका तेथे तैनात करण्यात आल्या होत्या. आग तातडीने आटोक्यात आणण्यात आली. स्पाईसजेटनेही कॅप्टन मोनिका खन्ना यांचे कौतुक केले आहे. स्पाईसजेटचे फ्लाइट ऑपरेशन्सचे प्रमुख गुरचरण अरोरा यांनी सांगितले की, ''मोनिकाने विमानाचे सह-वैमानिक बलप्रीत सिंग भाटिया यांच्यासोबत आत्मविश्वासाने विमान धावपट्टीवर उतरवले. तिनं  शांत राहून विमान चांगल्या प्रकारे हाताळले. मोनिकाचा आम्हाला  अभिमान आहे.'' 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीवैमानिक