Join us  

आधी वडील कॅडबरी कंपनीत कामाला होते; आता मी त्याच कंपनीच्या... प्राजक्ताचे डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 7:27 PM

Prajakta koli posted an emotional post : आधी युट्यूबवर व्हिडिओ बनवायची नंतर बॉलिवूडपर्यंत पोहोचलेली प्राजक्ता कोळी. आपल्या क्रिएटिव्हीटीमुळे ती कायम चर्चेत असते.

कमी वयात आणि कमी वेळात भरपूर यश मिळवलेली मराळमोळी मुलगी सध्या तरूणाईंमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. प्रत्येकाला हेवा वाटेल असं काम तिनं करत लोकांसाठी मोठं उदाहरण निर्माण केलं आहे. (Prajakta koli posted an emotional post) आधी युट्यूबवर व्हिडिओ बनवायची नंतर बॉलिवूडपर्यंत पोहोचलेली प्राजक्ता कोळी. आपल्या क्रिएटिव्हीटीमुळे ती कायम चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर प्राजक्ता कोळीनं शेअर केलेली एक भावनिक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. (Prajakta koli posted an emotional post for her parents after spotting on cadbury ad)

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये  सुनिल शेट्टी, नेहा कक्कर, अनन्या पांडे अशा अनेक सेलिब्रिटीजनी कमेंट्स केल्या आहेत. या फोटोत  प्राजक्ता कॅडबरीच्या एक होर्डींगकडे पाहत आहे. सुरूवातीला प्राजक्ताचे बाबा कॅडबरी कंपनीत शिफ्टमध्ये काम करायचे आता प्राजक्तानं ही जाहिरात केली त्यामुळे ती खूपच भावूक झाली आहे.  तिनं जाहिरातीचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात तिचे आई बाबा दिसत आहेत. 

प्राजक्तानं या पोस्टमध्ये म्हटलं, ''ज्यावेळी मी ५ वर्षांची होती तेव्हा बाबा कॅडबरी कंपनीत डबल शिफ्टमध्ये काम करायचे. आजही बाबा किचनमध्ये असताना वेगात काम करतात. त्यावर मी  एक कॅन्टीन कामगार असल्याचं उत्तर त्यांच्याकडून मिळतं.  माझ्याकडे वेळ नाही खूप जणांना खायला द्यायचं आहे. असं ते म्हणतात. मला शिक्षण, शिष्टाचार आणि प्रेरणा देण्यासाठी माझ्या पालकांना काम करताना मी पाहिलं आहे.  त्यांनी माझ्यासाठी अनेक विचित्र नोकऱ्या केल्या.

बाबांचा कॅडबरीतील कार्यकाळ माझ्यासाठी खास  होता. दिवाळीला बोनसह घरी येणारा चॉकलेट्सचा ट्रे माझ्यासाठी खास असेल.काल रात्री आईवडीलांच्या चेहऱ्याचं हास्य पाहिलं. त्यांनी मला कॅडबरीच्या जाहिराच्या पोस्टवर पाहिले. हे माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. त्यांनी मला या जीवनात जे काही दिलं त्याबद्दल मी काय कृतज्ञ असेन. तुमचे खूप खूप आभार ''

तुमच्या यशाचा आनंद आणि कौतुक तुमच्या पालकांपेक्षा जास्त कोणालाही होत नाही. तुम्हालाही नाही, तुझ्या आईवडिलांना खूप प्रेम. अशी कमेंट अभिनेत्री अनुष्का शर्मानं केली आहे. प्राजकाच्या या पोस्टवर अभिमानास्पद कमेंट्स चाहते करत आहेत.

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी