Lokmat Sakhi >Inspirational > प्रियांका चोप्रा ठरली ब्रिटिश वोग मासिकावर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री...

प्रियांका चोप्रा ठरली ब्रिटिश वोग मासिकावर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री...

Priyanka Chopra Is The First Indian Actor To Feature On British Vogue Magazine Cover : प्रियंका ही ब्रिटिश वोग मासिकाच्या कव्हरपेजवर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री  ठरली आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2023 12:21 PM2023-01-20T12:21:47+5:302023-01-20T12:23:06+5:30

Priyanka Chopra Is The First Indian Actor To Feature On British Vogue Magazine Cover : प्रियंका ही ब्रिटिश वोग मासिकाच्या कव्हरपेजवर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री  ठरली आहे. 

Priyanka Chopra Is The First Indian Actor To Feature On British Vogue Magazine Cover | प्रियांका चोप्रा ठरली ब्रिटिश वोग मासिकावर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री...

प्रियांका चोप्रा ठरली ब्रिटिश वोग मासिकावर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री...

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा हीने बॉलिवूड सोबतच हॉलिवूडमध्येही आपले विशेष स्थान निर्माण केले आहे. प्रियंकाने आपल्या अभिनयाने  जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. केवळ अभिनेत्री म्हणूनच नाही तर प्रख्यात गायिका, युनिसेफ भारताची ब्राण्ड एम्बेसेडर आणि आता मालतीची आई अशा विविध भुमिका पार पडत असणाऱ्या प्रियंकाने देशाच्या शेरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. प्रियंकाला 'ग्लोबल स्टार', असंही म्हटलं जातं. प्रियंका ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एकमेव अभिनेत्री आहे जी ४० हून अधिक आंतरराष्ट्रीय मासिकांवर झळकली आहे. आता प्रियांका ही ब्रिटिश वोग मासिकावर (British Vogue Magazine)  झळकली आहे. प्रियंका ही या मासिकाच्या कव्हरपेजवर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री  ठरली आहे(Priyanka Chopra Is The First Indian Actor To Feature On British Vogue Magazine Cover).

एवढचं नाही तर प्रियंकाची लेक मालती मारी चोप्रा जोनस देखील प्रियंका सोबत वोग मासिकात झळकणार आहे. ब्रिटीश वोगने आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर या संबंधित फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. ब्रिटिश वोगच्या इंस्टाग्राम पेजवर प्रियंकाचे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोमध्ये प्रियंका हटके लूकमध्ये दिसत आहे. प्रियंकाच्या या लूकने अनेकांचे लक्ष वेधले असून या पेजवर इतर शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रियंकाने विविध लूक केले आहेत. त्यातील एका फोटोमध्ये प्रियंका तिच्या मुलीसोबत पोज देताना दिसत आहे. या फोटोंनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोशूट सोबतच प्रियंकाने एका खास मुलाखतीमध्ये आई होण्याचा आणि सरोगसी पर्याय निवडण्याबाबत मोकळेपणाने बातचीत केली आहे. 

 

प्रियंका ही भारतीय चित्रपटसृष्टीतील एकमेव अभिनेत्री आहे जी ४० हून अधिक आंतरराष्ट्रीय मासिकांवर झळकली आहे. प्रियंकाच्या बाजीराव मस्तानी,दिल धडकने दो, डॉन- २, मेरी कोम, बर्फी, द स्काय इज पिंक या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. २०१५ मध्ये प्रियंका चोपडाला अमेरिकन गायक निक जोनस याने प्रपोज केले होते, त्यानंतर हे दोघे तीन वर्ष एकमेकांना डेट करत होते. २०१८ मध्ये जोधपूर येथे दोघांनी मोठ्या धूमधडाक्यात लग्न केलं. २०२१ जानेवारीमध्ये प्रियंका आणि निक जोनस एका मुलीचे आई-वडील झाले आहेत.

Web Title: Priyanka Chopra Is The First Indian Actor To Feature On British Vogue Magazine Cover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.