Lokmat Sakhi >Inspirational > बाळाला कडेवर घेऊन आईचा रॅम्प वॉक, पाहा मॉडेल अलिशा ओरावचा व्हायरल व्हिडिओ

बाळाला कडेवर घेऊन आईचा रॅम्प वॉक, पाहा मॉडेल अलिशा ओरावचा व्हायरल व्हिडिओ

Viral Video of Model Alisha Uraaon: मॉडेल अलिशा ओराव हिने केलेल्या या अनोख्या रॅम्प वॉकची चर्चा सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.. पाहा नक्की आहे काय ही गंमत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2022 04:42 PM2022-11-26T16:42:29+5:302022-11-26T16:43:13+5:30

Viral Video of Model Alisha Uraaon: मॉडेल अलिशा ओराव हिने केलेल्या या अनोख्या रॅम्प वॉकची चर्चा सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.. पाहा नक्की आहे काय ही गंमत.

Ramp walk of model Alisha Gautam Uraaon with her 10 months daughter, Must see her viral video | बाळाला कडेवर घेऊन आईचा रॅम्प वॉक, पाहा मॉडेल अलिशा ओरावचा व्हायरल व्हिडिओ

बाळाला कडेवर घेऊन आईचा रॅम्प वॉक, पाहा मॉडेल अलिशा ओरावचा व्हायरल व्हिडिओ

Highlightsमुलं झाल्यानंतरही मॉडेलिंगमध्ये करिअर करता येते, करिअर आणि संसार दोन्हीही व्यवस्थित सांभाळता येते, हे दाखवून देण्यासाठी तिने बाळासकट रॅम्प वाॅक केल्याचे सांगितले. 

लग्न झालं की पुर्वी मॉडेल, अभिनेत्री यांचं करिअर जवळपास संपल्यासारखं मानलं जायचं. त्यात एखादं बाळ झाल्यानंतर तर तिच्या करिअरला पुर्णपणे पुर्णविराम लागायचा. पण आता काळ बदलला. आता लग्न, मुलं झाल्यानंतरही अभिनेत्रींचे करिअर जोमात सुरू आहे. तसंच काहीसं फॅशन जगताचंही आहे. आई झालेल्या अनेक मॉडेलही आज आत्मविश्वासाने मॉडेलिंग करतात. पण आजवर कुणीही आपल्या बाळाला कडेवर घेऊन (Ramp walk of model with her 10 months) रॅम्पवॉक केला नव्हता. तो आता करून दाखवला आहे मॉडेल अलिशा ओराव (Alisha Uraaon) हिने. 

 

कुठे झाला फॅशन शो?
हा प्रामुख्याने एक आदिवासी फॅशन शो होता. तो नुकताच झारखंडमधील रांची येथे पार पडला. त्यात अलिशा उराव ही मॉडेल तिच्या १० महिन्यांच्या लेकीला कडेवर घेऊन रॅम्प वॉक करताना दिसली. नायरा हे तिच्या लेकीचं नाव.

वजन कमी करण्याचा खास फॉर्म्युला... १५ दिवसांत जाणवेल फरक, बघा नेमकं काय करायचं

नायराला घेऊन ती जेव्हा स्टेजवर आली तेव्हा उपस्थित सगळ्यांनाच तो अनुभव एकदम वेगळा होता. टाळ्यांचा कडकडाट करत सगळ्यांनीच तिचे स्वागत केले. या शो साठी अलिशाने फॅशन डिझायनर मंगल नाग यांनी डिझाईन केलेली पडिया साडी नेसली होती आणि खास आदिवासी धाटणीचे पारंपरिक दागिने घातले होते. आदिवासी महिला आपल्या बाळांना ज्या कपड्याने पोटाशी बांधतात, त्याला बेतरा म्हणतात. अलिशानेही बेतरा वापरून तिच्या लेकीला पोटाशी बांधले होते.  

 

कोण आहे अलिशा?
शालेय जीवनात असताना अलिशा उत्तम फुटबॉलपटू होती. तसेच ती व्हॉलीबॉलची राष्ट्रीय खेळाडू म्हणूनही अनेक स्पर्धांमध्ये खेळली आहे. २०२१ साली तिने पहिल्यांना एका आदिवासी सौंदर्य स्पर्धेत सहभाग घेतला.

ऐन तारुण्यात का वाढते ॲक्ने- पिंपल्सची समस्या? तज्ज्ञ सांगतात, कारणं आणि ३ सोपे उपाय

ज्यात तिने मिसेस फर्स्ट रनरअप हा पुरस्कार पटकावला. आतापर्यंत तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला आहे. मुलं झाल्यानंतरही मॉडेलिंगमध्ये करिअर करता येते, करिअर आणि संसार दोन्हीही व्यवस्थित सांभाळता येते, हे दाखवून देण्यासाठी तिने बाळासकट रॅम्प वाॅक केल्याचे सांगितले. 

 

Web Title: Ramp walk of model Alisha Gautam Uraaon with her 10 months daughter, Must see her viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.