Join us  

कर्तव्यपथावर चेतनाची आकाश भरारी, लहानपणी पाहिलेले स्वप्न केले पूर्ण, देशाला अभिमान आहे लेकीचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2023 6:32 PM

Republic Day Parade: Focus On ‘Make In India’, ‘Nari Shakti : Lieutenant Chetna Sharma : वायु रक्षा रेजिमेंटच्या अधिकारी लेफ्टनंट चेतना शर्मा यांनी 'मेड इन इंडिया' 'आकाश' क्षेपणास्त्राचे नेतृत्व केले.

यंदा आपण भारतवासीय ७४ व्या प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. ७४ व्या प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कर्तव्य पथवर भारतीय दलातील नौजवानांनी परेड करत विविधतेतून एकतेचे दर्शन घडविले. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे महिलांनी देखील या परेड मध्ये सहभागी होऊन देशाची मान गर्वाने अजून उंचावली आहे. राजस्थानातील खाटू श्याम या छोट्याश्या गावात राहणारी, लहानपणापासूनच भारतीय सेना दलात काम करण्याची ईच्छा उराशी बाळगणारी लेफ्टनंट चेतना शर्मा (lieutenant Chetna Sharma) हीच्यावर परेड दरम्यान एक मोठी जबाबदारी सोपविली होती आणि तिने ती यशस्वीरीत्या पार पाडली. भारतात बनलेल्या 'मेड इन इंडिया' आकाश क्षेपणास्त्र सिस्टमचे तिने नेतृत्व केले. परेड दरम्यान जेव्हा चेतना शर्माला आकाश क्षेपणास्त्र सिस्टमचे नेतृत्व करताना लोकांनी पाहिले तेव्हा संपूर्ण कर्तव्य पथ टाळ्यांच्या कडकडाटांनी भरून गेला(Republic Day Parade: Focus On ‘Make In India’, ‘Nari Shakti : Lieutenant Chetna Sharma).

कोण आहे चेतना शर्मा ? 

चेतना शर्मा ही राजस्थानातील खाटू श्याम या छोट्याश्या गावची रहिवासी आहे. बालपणापासूनच आपल्याला भारतीय सेनेत सामील होऊ देशाची रक्षा करायची आहे,अशी खूणगाठ तिने मनाशी बांधली होती. चेतना शर्मा हीने एनआयटी भोपाळमधून (NIT Bhopal) मधून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने नागरी सेवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला. या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता करता तिने ५ वेळा परीक्षा दिली परंतु तिला या परीक्षांमध्ये अपयश आले. परंतु ६ व्या वेळेस तिच्या या प्रयत्नांना यश मिळाले. येणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या अपयशाला न जुमानता लेफ्टनंट चेतना शर्मा (lieutenant Chetna Sharma) आज वायु रक्षा रेजिमेंटमध्ये (Air Defense Regiment) अधिकारी पदावर कार्यरत आहे.  

ही माझ्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे... 

दिल्लीतील कर्तव्य पथवर 'मेड इन इंडिया' आकाश क्षेपणास्त्र सिस्टमचे नेतृत्व करण्याची संधी जेव्हा चेतना शर्मा हिला मिळाली तेव्हा तिच्यासाठी ते स्वप्नवत होत. बालपणापासून ती जे स्वप्न पाहत होती ते स्वप्न सत्यात उतरले होते. प्रजासत्ताक दिनी आपल्या युनिटचे नेतृत्व करणे हा तिच्यासाठी अतिशय अभिमानाचा क्षण असल्याचे तिने म्हटले आहे. जेव्हा ती लहान असताना टीव्हीवर प्रजासत्ताक दिनाची परेड बघायची तेव्हा आपण या परेड मध्ये कधी सहभागी होऊ शकू असा विचार तिच्या मनात यायचा, परंतु तीच हेच स्वप्न आज खरं झालं आहे व याचा तिला खूप अभिमान आहे. 

सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव... 

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी चेतना शर्माचे अभिनंदन करत तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. "चेतना शर्मा बॉलिवूड मधील अभिनेत्रींपेक्षा अधिक आत्मविश्वासू आणि सुंदर दिसत आहे" अशी कमेंट एका नेटकाऱ्याने करत तिचे कौतुक केले आहे.

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टी