आपला व्यवसाय लहान असो किंवा मोठा आपण भरभरून यश मिळवावं. आपला व्यवयास आणि संपत्ती दिवसेंदिवस वाढत जावी असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं. गेल्या काही वर्षांत जागतिक पातळीवर महिलांनीही आर्थिकदृष्या बळकट बनत जगभरातील श्रीमंतांच्या यादीत आपलं स्थान निर्माण केलं आहे. HCL Technologies च्या चेअरपर्सन (Roshni Nadar) रोशनी नादर मल्होत्रा 84,330 कोटी रुपयांच्या संपत्तीसह भारतातील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत. 31 डिसेंबर 2021 रोजी महिलांच्या संपत्तीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या 'कोटक प्रायव्हेट बँकिंग हुरून - लीडिंग वेल्थ वूमन लिस्ट'च्या तिसऱ्या आवृत्तीनुसार, त्यांनी सलग दुसऱ्या वर्षी हे स्थान कायम ठेवले आहे. (Who is roshni nadar malhotra became richest woman of country)
कोण आहेत रोशनी नादर
१) रोशनी नादर मल्होत्रा या HCL कॉर्पोरेशनच्या सीईओ आणि कार्यकारी संचालक आहेत. तसेच HCL तंत्रज्ञान आणि CSR बोर्ड समितीच्या अध्यक्षा आहेत. याशिवाय त्यांनी शिव नादर फाउंडेशनच्या विश्वस्तपदाची जबाबदारीही सांभाळली आहे.
२) HCAL चे संस्थापक शिव नादर यांची एकुलती एक कन्या रोशनी नादर या IT कंपनीचे नेतृत्व करत असलेल्या पहिल्या महिला आहे. 2019 मध्ये फोर्ब्सने जाहीर केलेल्या 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत रोशनी नादर 54 व्या स्थानावर होत्या.
३) रोशनी नादर यांचे शिखर मल्होत्रासोबत लग्न झाले असून त्यांना दोन मुले आहेत.
४) दिल्लीतील वसंत व्हॅली स्कूलमधून सुरुवातीच्या शिक्षणानंतर, रोशनी यांनी नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमधून कम्युनिकेशन्समध्ये पदवी मिळवली आणि नंतर केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए पदवी मिळवली.
५) एचसीएलमध्ये येण्यापूर्वी रोशनी नादर यांनी इतर अनेक कंपन्यांमध्ये निर्माता म्हणून काम केले. एचसीएलमध्ये रुजू झाल्यानंतर एका वर्षाच्या आत त्यांना एचसीएल कॉर्पोरेशनच्या सीईओ आणि कार्यकारी संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली.
या यादीत आणखी कोणत्या महिलांचा समावेश आहे
देशातील 100 श्रीमंत महिलांच्या या यादीत USV चेअरपर्सन लीना गांधी तिवारी 21,340 कोटींच्या संपत्तीसह किरण मुझुमदार शॉ यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दिवीजच्या लॅबोरेटरोरिजच्या संचालिका निलिमा या चौथ्या क्रमांकाच्या श्रीमंत महिला आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती 18620 कोटी रुपये आहे. झोहोच्या राधा वेंबू 11590 कोटींच्या मालमत्तेसह पाचव्या स्थानावर आहेत आणि अरिस्ता नेटवर्क्सच्या जयश्री उल्लाल 10220 कोटींच्या संपत्तीसह सहाव्या स्थानावर आहेत.
लाइव्ह मिंटमधील एका अहवालानुसार, प्रेस रिलीजमध्ये असे म्हटले आहे की भारतातील सर्वात श्रीमंत महिलांच्या 2021 च्या आवृत्तीत कॉर्पोरेट जगतात उच्च पदांवर प्रस्थापित झालेल्या महिलांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. 25 नवीन चेहऱ्यांनी या यादीत स्थान मिळवले आहे.