Join us

शाब्बास पोरी! वडील मेकॅनिक, पण मेहतनीच्या जोरावर मुलीने मिळवला एनडीएमध्ये प्रवेश, जिद्द असावी तर अशी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2022 10:15 IST

Saina Mirza Daughter of Tv Mechanic Become First Muslim Women Fighter Pilot Form NDA : अवनी चतुर्वेदी ही भारताची पहिली महिला पायलट असून आता सानिया भारताची दुसरी महिला पायलट होणार आहे.

ठळक मुद्देअवनी चतुर्वेदी तिची आदर्श आहे आणि तिच्यासारखेच फायटर पायलट होण्याचे सानियाचे स्वप्न आहे. तिच्या या कामगिरीमुळे तिचे राज्यात आणि तिच्या गावात खूप मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

बरेचदा आपण परिस्थितीला दोष देतो आणि एखादी गोष्ट साध्य होत नसेल तर काही ना काही कारणं देतो. पण तुमच्याकडे जिद्द असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टीही तुम्हाला साध्य करता येतात. उत्तर प्रदेशमधील सानिया मिर्झा ही याचेच एक उत्तम उदाहरण आहे. एका अतिशय लहान गावात राहणारी सानिया हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नॅशनल डिफेन्स अकादमीमध्ये प्रवेश मिळवला आहे. एप्रिल २०२२ मध्ये एनडीएच्या झालेल्या प्रवेश परीक्षेत सानियाने यश मिळवत १४९ वी रँक मिळवली आहे (Saina Mirza Daughter of Tv Mechanic Become First Muslim Women Fighter Pilot Form NDA). 

(Image : Google)

सानियाचे वडील व्यवसायाने टीव्ही मेकॅनिक आहेत, त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसतानाही सानियाने एनडीएमध्ये प्रवेश मिळवत वडिलांच्या कष्टाचे चीज केले आहे. सानियाचे शिक्षण हिंदी माध्यमातून झाले असून १२ वी मध्येही सानिया उत्तर प्रदेश बोर्डात तिच्या जिल्ह्यात टॉपर आली आ हे. पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर सानियाने दुसऱ्यांना एनडीएची परीक्षा दिली आणि आपल्या पालकांना आणि संपूर्ण गावाला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली. अवनी चतुर्वेदी ही भारताची पहिली महिला पायलट असून आता सानिया भारताची दुसरी महिला पायलट होणार आहे. त्यामुळे अशाप्रकारची कामगिरी ती उत्तर प्रदेशमधील आणि मुस्लिम समाजातील पहिलीच तरुणी आहे. 

(Image : Google)

२०२२ मध्ये झालेल्या एनडीएच्या प्रवेश परीक्षेत १९ जागा या महिलांसाठी राखीव होत्या. त्यापैकी २ जागा या फायटर पायलट पदासाठी होत्या, त्यातील एका जागा सानियाने पटकावली आहे. तिच्या या कामगिरीमुळे तिचे राज्यात आणि तिच्या गावात खूप मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. आपल्या या यशाविषयी बोलताना सानियाचे वडील शाहिद अली म्हणाले, सुरुवातीपासूनच तिला डिफेन्समध्ये जायचे होते. अवनी चतुर्वेदी तिची आदर्श आहे आणि तिच्यासारखेच फायटर पायलट होण्याचे सानियाचे स्वप्न आहे. जिद्द, मेहनत या जोरावर सानियाने तिचे स्वप्न पूर्ण केले असून तिने मिळवलेल्या यशामुळे आम्हाला तिचा अभिमान वाटत आहे. 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीएनडीए पुणे