Lokmat Sakhi >Inspirational > सायना सिंधुला जमलं नाही, ते 16 वर्षांच्या तसनीम मीरने करुन दाखवलं.. पाहा नंबर वन कमाल  

सायना सिंधुला जमलं नाही, ते 16 वर्षांच्या तसनीम मीरने करुन दाखवलं.. पाहा नंबर वन कमाल  

आज महिला बॅडमिंटन म्हटलं , की सायना, सिंधू यांची नावं आधी घेतली जातात. पण सायना, सिंधूलाही 19 वर्षांखालील वयोगटात खेळताना जे जमलं नाही ते तसनीम हिने करुन दाखवलं आहे. 19 वर्षांखालील जागतिक बॅडमिंटन खेळाडुंच्या क्रमवारीत प्रथम स्थान मिळवणारी तसनीम ही भारतातील पहिली महिला खेळाडू बनली आहे. खेळाडू म्हणून यशस्वी होतांना तसनीमला आपलं बालपण गमवावं लागलं. आपल्या ध्येयासाठी अजूनही त्याग करण्याची तिची तयारी आहे. तिची बॅडमिंटनसोबत असलेल्या मैत्रीची गोष्ट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 02:57 PM2022-01-18T14:57:18+5:302022-01-18T15:10:31+5:30

आज महिला बॅडमिंटन म्हटलं , की सायना, सिंधू यांची नावं आधी घेतली जातात. पण सायना, सिंधूलाही 19 वर्षांखालील वयोगटात खेळताना जे जमलं नाही ते तसनीम हिने करुन दाखवलं आहे. 19 वर्षांखालील जागतिक बॅडमिंटन खेळाडुंच्या क्रमवारीत प्रथम स्थान मिळवणारी तसनीम ही भारतातील पहिली महिला खेळाडू बनली आहे. खेळाडू म्हणून यशस्वी होतांना तसनीमला आपलं बालपण गमवावं लागलं. आपल्या ध्येयासाठी अजूनही त्याग करण्याची तिची तयारी आहे. तिची बॅडमिंटनसोबत असलेल्या मैत्रीची गोष्ट..

Saina Sindhu didn't get along, 16 year old Tasneem Mir did it .. see number one max | सायना सिंधुला जमलं नाही, ते 16 वर्षांच्या तसनीम मीरने करुन दाखवलं.. पाहा नंबर वन कमाल  

सायना सिंधुला जमलं नाही, ते 16 वर्षांच्या तसनीम मीरने करुन दाखवलं.. पाहा नंबर वन कमाल  

Highlightsवयाच्या 7 व्या वर्षांपासून तसनीम बॅडमिंटन खेळतेय.करिअरमधलं ध्येयं अवघड आहे, पण आपण कधीही माघार घेणार नसल्याचा तसनीमचा निग्रह आहे. सिनियर लेव्हलवर रॅकिंग सुधारुन ऑलिम्पिकसाठी  पात्र होण्याचं ध्येय तसनीमनं स्वत:समोर ठेवलं आहे. 

' मी 19 वर्षांखालील जगातली प्रथम क्रमांकाची बॅडमिंटनपटू होईल' असं मला वाटतच नव्हतं.. पण माझी आई म्हणाली होती तसं..' बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने 19 वर्षांखालील खेळाडूंची क्रमवारी नुकतीच जाहीर केली. माध्यमांना आपली पहिली प्रतिक्रिया देताना तसनीम मीरचे हे आनंदोद्गार आहेत.  2020 पासून बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने क्रमवारी जाहीर केली नव्हती आणि मागच्या वर्षीपासून  सिनिअर कॅटेगिरीत खेळायला सुरुवात केली होती. पण 2021मधे  पहिल्या सहा महिन्यात फ्रान्स, बल्गेरिया, बेल्जियम येथे झालेल्या 19 वर्षाखालील आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसनीम हिने जिंकल्या. 2022मधे जेव्हा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने 19 वर्षांखालील जागतिक क्रमवारी जाहीर केली तेव्हा तसनीमच्या या तीन विजयांचे गुण धरले आणि तसनीम  आज 19 वर्षांखालील जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाची बॅडमिंटनपटू झाली. तिच्या या कामगिरीनं भारताला मोठा सन्मान प्राप्त झाला आहे.  

Image: Google

आज महिला बॅडमिंटन म्हटलं की सायना, सिंधू यांची नावं आधी घेतली जातात. पण सायना, सिंधूलाही 19 वर्षांखालील वयोगटात खेळताना जे जमलं नाही ते तसनीम हिने करुन दाखवलं आहे. 19 वर्षांखालील जागतिक बॅडमिंटन  खेळाडुंच्या क्रमवारीत प्रथम स्थान मिळवणारी तसनीम ही भारतातील पहिली महिला खेळाडू बनली आहे. 

16 वर्षांच्या तसनीमचा जन्म गुजरातमधील मेहसणातला. वडील इरफान मीर हे मेहसणा येथील  पोलिस खात्यात असिस्टण्ट सब इन्स्पेक्टर आहेत. तसनीमची मूळ प्रेरणाही तिचे वडिलच आहेत. कारण पोलिस खात्यातील नोकरीसोबतच इरफान मीर हे बॅडमिंटन कोच असून ते मेहसणा येथे मुला मुलींना बॅडमिंटनचं प्रशिक्षण देतात.  तसनीम 7 वर्षांची असल्यापासून आपल्या वडिलांसोबत बॅडमिंटन कोर्टवर जायची. आधी ती नुसतीच वडील कसे शिकवतात हे बघायची. पण नंतर तिला या खेळात रस निर्माण झाला. ती खेळायला लागली. नुसतीच खेळायची नाही तर तिची दखल घेण्याइतपत छान ती खेळू लागली. सुरुवातीला वडिलांनी तिला बॅडमिंटन शिकवलं. तिचे वडीलच तिचे खेळातले पहिले पार्टनर बनले  आणि वडिलांसोबतच तिने पहिली मॅच जिंकली.  तिच्यातलं खेळण्याचं कौशल्य बघून तसनीमच्या वडिलांनी तिला गोपीचंद अकादमी येथे प्रशिक्षणासाठी पाठवलं. तिथे तिने 2 वर्षं प्रशिक्षण घेतलं. नंतर गेल्या 4 वर्षांपासून तसनीम गुवाहाटी येथे 'आसाम बॅडमिंटन अकादमी' येथे एडविन इरिअवन यांच्याकडून् प्रशिक्षण घेत आहे.  इथल्या प्रशिक्षणाच्या पध्दतीबद्दल तसनीम म्हणते की, प्रशिक्षक आपल्या मुलांसोबत खेळायला सांगतात. त्यामुळे कामगिरीत खूप सुधारणा  झाली. 2021 च्या सप्टेंबरनंतर तसनीम सिनिअर लेव्हलच्या स्पर्धांसाठी तयारी करत आहे. आताही तसनीमला आपल्या  वयापेक्षा मोठ्या खेळाडुंसमवेत सराव करावा लागत आहे.

Image: Google

आपण आता 19 वर्षांखालील स्पर्धेत खेळणं सोडलं त्यामुळे आपण 19 वर्षांखालील जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर येऊ असं तसनीमला वाटलंही नव्हतं. म्हणूनच जेव्हा ही क्रमवारी जाहीर झाली तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसला. जेव्हापासून ही घोषणा झाली तेव्हापासून तसनीमला अखंड शुभेच्छा आणि अभिनंदनाचे फोन येत आहेत.  तसनीमकडे साधा मोबाइल आहे. स्मार्ट फोन हाताळत नाही. तिचं सोशल मीडियावरील अकाउंट ती स्वत: हाताळत नाही. ते पाहाण्यासाठी एका व्यक्तीची नेमणूक केली आहे. त्यामुळे  सचिन तेंडुलकर, सिंधू, करीना कपूर, हुमा कुरेशी यासारख्या सेलिब्रेटींनी तिच्या या यशाचं अभिनंदन करणारे मेसेज तिला सोशल मीडियावर केले आहेत याचा तिला विश्वासच बसेना.  पण हे होतं आहे, हे तिला  समजलं आणि आधीच 'डाऊन टू अर्थ' असलेल्या तसनीमला वास्तवाची आणि यापुढील संघर्षाची जाणीव अधिकच तीव्रतेने झाली. अभिनंदन वगैरे ठीक आहे, पण माझं लक्ष आता पुढची ऑलिम्पिक स्पर्धा आहे. त्यामुळे 2022 मधे सिनिअर लेव्हलवर जास्तीत जास्त स्पर्धा जिंकून  आपल्याला येथील क्रमवारी सुधरायची आहे, या ध्येयाची तसनीमला चांगली जाणीव आहे. त्यामुळे या यशासोबतच माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे, माझ्याकडच्या लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आपल्याला त्या पूर्ण करायच्या आहेत असं तसनीम म्हणते.

Image: Google

'पण तुझ्या या यशाचं सेलिब्रेशन तू कसं करणार ? ' असं माध्यमांनी तिला विचारल्यावर आपल्या कुटुंबासोबत काही दिवस राहाणं हेच आपलं मोठं सेलिब्रेशन असल्याचं तसनीम म्हणते, ' 7 वर्षांची असल्यापासून आपण बॅडमिंटन खेळत असणारी तसनीम म्हणते, की ' बालपण काय असतं हे मला माहितच नाही. बालपणात करण्याच्या गोष्टी मी त्या वेळी करु शकले नाही. कारण तेव्हा मी बॅडमिंटनचं प्रशिक्षण घेत होते. मला कधी मैत्रिणी करता आल्या नाही. त्यांच्यासोबत खेळायला, हिंडा फिरायला भेटलं नाही. मला माझ्या खेळासाठी माझ्या बालपणाचा त्याग करावा लागला. आता माझं करिअर , माझं ध्येय पक्कं आहे. त्यामुळे ते कितीही अवघड असलं, त्यासाठी मला कितीही त्याग करावे लागणार असतील तरी मी आता माघार घेणार नाहीये. मी आणखी जिद्दीने कष्ट करणार आहे. मला माझ्या शाॅटवर विश्वास आहे, त्यावर माझी पकड आहे. पण मला माझ्या मनावर लक्ष केंद्रित करायचं आहे, मला माझं मन जास्त खंबीर करायचं आहे! ' असं म्हणणारी तसनीम त्यासाठी मानसशास्त्रज्ञांकडून समुपदेशनही घेत आहे.  सुरुवातीला हरल्यावर खूप रडणाऱ्या तसनीमला हरणं जिंकणं हे जगण्याचे जसे महत्त्वाचे भाग आहेत तसेच खेळण्याचेही आहे हे समजलं आहे. . तिच्या समुपदेशकांनी तसनीमला हरणं जिकंणं मनाला लावून न घेता त्यातून खेळाच्या बाबतीत काय शिकलो, हे बघण्याची नजर दिली आहे.  आपल्या यश- अपयशाकडे या नजरेनं बघणारी तसनीम म्हणूनच यश मिळाल्यावर आपण आपले पाय पटकन जमिनीवर टेकवतो असं सांगते. 

Image: Google

तसनीम आणि तिचा भाऊ दोघेही सध्या गुवाहाटी येथे बॅडमिंटन प्रशिक्षण घेत आहे. तिचा भाऊ देखील ज्युनिअर लेव्हलचा राष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू आहे. भाऊ बहिण एकमेकांशी भांडत, एकमेकांच्या तक्रारी करत, खोड्या करत मोठी होतात, पण तसनीम आणि तिचा लहान भाऊ मात्र एकमेकांशी बॅडमिंटन खेळत लहानाचे मोठे झाले. आताही बॅडमिंटनच्या पातळीवर दोघांचं जबरदस्त बाॅण्डिंग आहे. 

आपल्या खेळासाठी आपल्या आईने, वडिलांनी आणि भावानेही खूप योगदान दिल्याचं तसनीम म्हणते. मी जेव्हा राज्यस्तरावर खेळायला जायचे तेव्हा आईमाझ्यासोबत यायची. भाऊ तर अगदी लहान होता. तेव्हा तो वडिलांसोबत राहायचा. आम्ही प्रत्येकानं आपआपल्या पातळीवर त्याग केला आहे तेव्हा कुठे हे यश मिळालं आहे. कित्येक वर्षांपासून आपल्याला  खेळासाठी लागणाऱ्या फिटनेससाठी विशिष्ट डाएटिंगवर राहावं लागतंय. पण त्याबाबत आपली तक्रार नाही असं सांगणारी तसनीम मोठ्या स्पर्धा जिंकल्यावर त्यादिवशी 'चीट डे' म्हणून चाॅकलेट खाते. 

तसनीम सांगते, ' मी कधी माझ्या कुटुंबासोबत एकत्र फिरायला गेले नाही. मी खेळायच्या निमित्ताने जगभर फिरते. पण ते स्ट्रेस फ्री फिरणं नसतं. डोक्यात सतत मॅचेसचे विचार असतात.' स्ट्रेस फ्री होण्यासाठी तसनीमला आपल्या कुटुंबाबरोबर काश्मिर, लेह, लडाख येथे फिरायला जायचे आहे!' तसनीम म्हणते ,की कुटुंबासोबत फिरायला जाणं हे माझं स्वप्न आहे, पण ध्येय माझं करिअर आहे.  ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र होवून भारतासाठी पदक मिळवणं हेच तसनीमचं लक्ष आहे.  आपल्या कामगिरीनं जगात उंचावलेली भारताची मान यापुढेही अशीच कामगिरी करुन ऊंच ठेवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणारी तसनीम म्हणते, ' अभी तो सिर्फ मेरे करिअरकी शुरुआत है!'

Web Title: Saina Sindhu didn't get along, 16 year old Tasneem Mir did it .. see number one max

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.