प्रत्येकवेळी योगाचा प्रचार करून चाहत्यांना नेहमीच फिटनेसविषयी जागरुक ठेवणारी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. व्यायामाचे महत्त्व, योगाचे महत्त्व याविषयी शिल्पा नेहमीच बोलत असते. पण यावेळी मात्र ती स्त्रियांविषयी बोलली असून तिने प्रत्येकीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे मुद्दे मांडले आहेत. शिल्पा शेट्टी म्हणते की तुम्ही वर्किंग वुमन असू द्या किंवा मग तुम्ही गृहिणी असू द्या.. पण तुम्हाला जर आनंदी राहायचं असेल तर तुमच्याकाही २ खास गोष्टी असायलाच पाहिजेत. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आणि ती कशाबद्दल सांगते आहे हे एकदा बघाच...(Shilpa Shetty says each and every woman needs 2 things for her happiness)
शिल्पा शेट्टी सांगते....
शिल्पा शेट्टीच्या मुलाखतीचा एक छोटासा भाग winwithmansi या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. यामध्ये शिल्पा सांगते की लग्नापुर्वी प्रत्येक मुलगी एकदम बिंधास्त, बेधडक असते. तिच्या मनाप्रमाणे, मुक्तपणे वावरत असते. पण जसं लग्न होतं, मुलं- बाळं होतात तसा तसा तिच्यातला मोकळेपणा संपून जातो आणि ती घरामध्ये,
लेटेस्ट फॅशनच्या ऑक्सिडाईज मंगळसूत्रांचे सुंदर डिझाईन्स, रोजच्या वापरासाठी असं एखादं तरी असावंच...
मुलांमध्ये, नवऱ्यामध्ये पुर्णपणे अडकून जाते. सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळताना दबून जाते. शिवाय बहुसंख्य महिला तर अशाही असतात की आपण घरातलं सगळं केलंच पाहिजे, आपण हे नाही करणार तर कोण करणार अशी त्यांची भावना असते. त्यामुळे घरातल्या कोणत्याच सदस्याकडून साधं थँक यू ची अपेक्षाही त्यांना नसते.
नवरात्रीसाठी उपवासाची भाजणी करायची? खमंग खुसखुशीत थालिपीठांसाठी घ्या १ किलो भाजणीचे अचूक प्रमाण
या सगळ्या जबाबदाऱ्या थोड्या कमी करून स्वत:साठी काही करण्याचा मोठा गिल्टही त्यांच्या मनात असतो. त्यामुळे बऱ्याच जणी इच्छा असूनही थोडाही वेळ स्वत:च्या आनंदासाठी, करिअरसाठी देऊ शकत नाहीत.
शिल्पा म्हणते तुमचं आयुष्य असं संपवू नका. घरातल्या जबाबदाऱ्या जरूर सांभाळा. त्या झिडकारून तुम्हाला तुमचा आनंद मिळवायचा असं कोणीही म्हणत नाही. पण कधी तरी स्वत:च्या मनाप्रमाणे जगा, तुमच्या आवडीप्रमाणे काही गोष्टी करा.. कुटूंबाचा आनंद महत्त्वाचा आहे, तसाच तुमचा आनंदही महत्त्वाचाच आहे.
लाकडाचे चमचे, पोळपाट, चॉपिंग बोर्ड काळे पडले? १ सोपा उपाय- १० मिनिटांत होतील नव्यासारखे स्वच्छ
आणि तो तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्हाला स्वत:विषयी प्रेम आणि आदर असेल. त्यामुळे प्रत्येक स्त्री कडे Self Love आणि Self Respect या दोन गोष्टी असायलाच पाहिजेत. तिने त्या जपल्या तरच दुसऱ्यांकडून तिला त्या मिळतील... शिल्पा म्हणते आहे त्याचा विचार खरोखरच प्रत्येकीने आपापल्या पातळीवर करायला हवा...