Lokmat Sakhi >Inspirational > एमबीबीएस सोडून तिनं निवडलं शुटिंग, आईवडिल म्हणाले- जी ले अपनी जिंदगी! ऑलिम्पिक पदक हेच आता लक्ष्य...

एमबीबीएस सोडून तिनं निवडलं शुटिंग, आईवडिल म्हणाले- जी ले अपनी जिंदगी! ऑलिम्पिक पदक हेच आता लक्ष्य...

Sift Kaur is ready to make her dreams of Olympic glory a reality : सिफ्ट कौर समरा, (Sift Kaur Samra) वयाच्या नवव्या वर्षी तिच्या हातात रायफल आली आणि आता ती पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची दावेदारी सांगते आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2024 06:49 PM2024-07-13T18:49:54+5:302024-07-13T19:01:47+5:30

Sift Kaur is ready to make her dreams of Olympic glory a reality : सिफ्ट कौर समरा, (Sift Kaur Samra) वयाच्या नवव्या वर्षी तिच्या हातात रायफल आली आणि आता ती पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकाची दावेदारी सांगते आहे.

Sift Kaur Samra, Paris olympics 2024, shooting for a dream. know your olympic athletes | एमबीबीएस सोडून तिनं निवडलं शुटिंग, आईवडिल म्हणाले- जी ले अपनी जिंदगी! ऑलिम्पिक पदक हेच आता लक्ष्य...

एमबीबीएस सोडून तिनं निवडलं शुटिंग, आईवडिल म्हणाले- जी ले अपनी जिंदगी! ऑलिम्पिक पदक हेच आता लक्ष्य...

पॅरिस ऑलिम्पिक आठवडाभरावर येऊन ठेपले आहे.  प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते की देशासाठी ऑलिम्पिकमधील पदक मिळवायचे असते. त्यातलंच एक नाव म्हणजे शूटर असलेली (Sift Kaur Samra) सिफ्ट कौर समरा. महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत ती ऑलिम्पिक पदकावर आपली दावेदारी सांगते आहे. डॉक्टर होण्याचं लक्ष्य समोर दिसत असताना तिने खेळासाठी ते सोडलं आणि आपला सगळा फोकसवर शूटिंगवर कसा नेला याची ही गोष्ट(Sift Kaur is ready to make her dreams of Olympic glory a reality).

२३ वर्षीय सिफ्ट कौर समरा (India's brightest 'Shooting' Star — Sift Kaur Samra) ही पंजाबमधील फरीदकोटची. तिचे वडील पवनदीप सिंग शेतकरी आहेत. ती फरीदकोटच्या जीजीएस मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. शूटिंग आणि अभ्यास दोन्हीवर फोकस करणं तिला अवघड जात होतं. त्यामुळे सिफ्टने ठरवलं की वैद्यकीय शिक्षण सोडायचं आणि संपूर्ण लक्ष रायफल शूटिंगवर केंद्रित करायचं. तो निर्णय अर्थातच सोपा नव्हता, ना तिच्यासाठी ना तिच्या पालकांसाठी(Sift Kaur is ready to make her dreams of Olympic glory a reality).

एका मुलाखतीत सिफ्टने सांगितले की, ती रायफल शूटिंग सोडणार होती. एमबीबीएससाठी निवड झाल्यानंतर  शूटिंग सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, भोपाळमध्ये नॅशनल चॅम्पियनशिप होती, या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये खेळल्यानंतर रायफल शूटिंग सोडू असं ठरवलं होतं. परंतु या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मी राष्ट्रीय विक्रम केला आणि माझे आयुष्यच बदलले. तेव्हा मला वाटले की मी शूटिंग सोडू नये.

सिफ्ट कौर समरा हे नाव आज भारतीय नेमबाजी जगतात फारच गाजते आहे.  अचूकता, संयम आणि मानसिक स्थिरता गरजेची असणाऱ्या शुटिंग या खेळात सिफ्टने स्वतःला सिद्ध केले आहे. आशियाई स्पर्धेमध्ये (Asian Games) ५० मीटर रायफल शूटिंगच्या स्पर्धेत सिफ्ट कौर सामरानं भारताला (Sift Kaur Samra) सुवर्णपदक मिळवून दिले होते. भारताची नेमबाज सिफ्ट कौरने ५० मीटर रायफल इव्हेंटमध्ये भारत देशाला पाचवं गोल्ड मिळवून दिलं होत. ५० मीटर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकणाऱ्या सिफ्ट कौरने ४६९. ६ गुणांसह विश्वविक्रम केला होता. या विक्रमासह सिफ्टनं ४६२. ३ गुणांसह चीनच्या झांग क्विओंग्यूचा पराभव केला होता. अशा प्रकारे सिफ्टनं अगदी खूपच कमी फरकाने आशियाई खेळात भारताला सुवर्णपदक मिळवून दिल होत. सिफ्टनं भारतासाठी पाचवं आणि आशियाई स्पर्धेच्या चौथ्या दिवशी दुसरं सुवर्णपदक पटकावलं होत. 

ती रायफल शुटिंगसोबतच अभ्यासात देखील तितकीच हुशार आहे. वयाच्या १८ व्या वर्षी तिने NEET परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि ती डॉक्टर होण्याच्या मार्गावर होती. परंतु अनपेक्षितपणे ती या शूटिंगच्या क्षेत्रात आल्याचे ती सांगते. "माझ्या चुलत भावाने माझी नेमबाजीशी ओळख करून दिली. वयाच्या नवव्या वर्षी हातात रायफल आली आणि माझ्या आईबाबांच्या पाठिंब्यामुळे मी या खेळावर फोकस करु शकले!’ यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिला खूप मोठे यश मिळावे, कष्टाचे चीज व्हावे.

Web Title: Sift Kaur Samra, Paris olympics 2024, shooting for a dream. know your olympic athletes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.