Lokmat Sakhi >Inspirational > ना बिलाचं टेंशन, ना एसीची गरज; शहरातली नोकरी सोडली अन् जोडप्यानं गावी बांधलं टुमदार घर

ना बिलाचं टेंशन, ना एसीची गरज; शहरातली नोकरी सोडली अन् जोडप्यानं गावी बांधलं टुमदार घर

Simple living simpler life nature eco friendly house village :त्याच्या घरात लिव्हिंग रूम, किचन, दोन बेडरूम आणि दोन बाथरूम आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 07:30 PM2022-08-21T19:30:41+5:302022-08-21T19:37:50+5:30

Simple living simpler life nature eco friendly house village :त्याच्या घरात लिव्हिंग रूम, किचन, दोन बेडरूम आणि दोन बाथरूम आहेत.

Simple living simpler life nature eco friendly house village | ना बिलाचं टेंशन, ना एसीची गरज; शहरातली नोकरी सोडली अन् जोडप्यानं गावी बांधलं टुमदार घर

ना बिलाचं टेंशन, ना एसीची गरज; शहरातली नोकरी सोडली अन् जोडप्यानं गावी बांधलं टुमदार घर

(Image Credit-Thebetterindia)

शहराच्या गडबडीच्या वातावरणात प्रत्येकजण शांतता शोधत असतो. पर्वतांच्या मधोमध किंवा हिरवळीच्या मधोमध तुमचे स्वतःचे घर असावे. निवृत्तीनंतर बहुतेक लोक हे स्वप्न पूर्ण करण्याचा विचार करतात. आज तुम्हाला अशा एका जोडप्याची ओळख करून देणार आहोत ज्यांनी महानगरातील धावपळीचे आणि धकाधकीचे जीवन सोडून निसर्गाच्या सानिध्यात आयुष्य सुरू केले आहे. (Simple living simpler life nature eco friendly house village)

ही कथा तामिळनाडूच्या नौशाद्या आणि सुधाकर या जोडप्याची आहे. मुंबईत वाढलेल्या आणि चेन्नई-बेंगळुरूसारख्या शहरात राहणाऱ्या सुधाकरने एक-दोन दिवसांत हा निर्णय घेतलेला नाही. उलट, खूप विचारमंथन आणि चाचण्यांनंतर, त्यांनी ठरवले की ते कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी आणि शहरी जीवन सोडून शांत आणि साधे जीवन जगायचे. यासाठी 2018 साली त्यांनी तामिळनाडूतील तिरुनेलवेली गावात साडे अकरा एकर जमीन खरेदी केली होती.

हे सुधाकरचे वडिलोपार्जित गाव आहे, परंतु ते याआधी येथे राहिला नव्हते. कारण ते मुंबईत जन्मले आणि वाढले. आता गेल्या तीन वर्षांपासून हे जोडपे गावात त्यांच्या शेताच्या मधोमध बांधलेल्या घरात राहत आहे. माती, बांबू, चुना अशा नैसर्गिक साधनांचा वापर करून त्यांनी स्वतःच्या शेतात घरेही बांधली आहेत. 'द बेटर इंडिया'शी बोलताना त्यांनी आपल्या संपूर्ण प्रवासाबद्दल सांगितले.

(Image Credit-Thebetterindia)

नौशाद्या आणि सुधाकर यांनी चांगल्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. काही वर्षे काम केल्यानंतर सुधाकर यांनी सामाजिक संस्थांमध्ये स्वयंसेवा करण्यास सुरुवात केली आणि नौशाद्या एका सामाजिक संस्थेशी जोडल्या गेल्या. काम करत असताना सुधाकर यांनाआपले जीवन  निसर्गाशी जोडण्याची आणि पर्यावरण समजून घेण्याची संधी मिळाली. वेगवेगळ्या ठिकाणी अनेक फार्म्ससोबतही त्यांनी स्वयंसेवाही केली. (Simple living simpler life nature eco friendly house village)

नौशाद्या यांनीही सुधाकरच्या स्वभावाला अनुकूल जीवनशैली मान्य केली. पण शहर सोडून गावात कायमचं साधं आयुष्य जगता येईल का, अशी शंका तिच्या मनात होती. त्यामुळे कोणताही निर्णय् घेण्यापूर्वी त्यावर ट्रायल करण्याचा विचार त्यांनी केला. त्यांनी नोकरी सोडली आणि काही काळ ऑरोव्हिलमध्ये वास्तव्य केले. त्यांनी सांगितले , “तिथे आम्ही तीन महिने अतिशय साधे जीवन जगलो आणि निसर्गाशी एकरूप होऊन स्वावलंबी जीवन कसे जगता येईल हे समजले. सुधाकर पूर्वी असेच जगले होते, पण ते माझ्यासाठी नवीन होते आणि मला त्याचा खूप आनंद झाला. या तीन महिन्यांत मी ठरवलं होतं की आपण हे करू शकतो.”

2018 मध्ये त्यांनी लग्न केले आणि तिरुनेलवेली येथे आले. त्यांनी प्रथम त्यांचे संपूर्ण लक्ष त्यांच्या शेतीकडे वळवले. वन्य प्राण्यांपासून ते पाळीव प्राण्यांपर्यंत त्यांनी शेती पुरक प्राणी पालन सुरू केले . तिथे नारळ आणि आंब्याची झाडं होती. याशिवाय गाई ठेवण्यासाठी विहीर व शेडही बांधण्यात आले होते. पण पूर्वी या जमिनीवर फक्त रासायनिक शेती केली जात होती आणि बराच काळ लोक फक्त गुरे चरण्यासाठी वापरत होते.

या जोडप्याने ठरवले की ते शेतातच घर बांधतील. तसेच घराचे बांधकाम शक्य तितके पर्यावरणपूरक ठेवायचे होते. त्यामुळे सुधाकरने थन्नल यांच्यासोबत तीन दिवसांची कार्यशाळाही केली. ही संस्था माती, बांबू या नैसर्गिक साधनांचा वापर करून घरे बांधण्याचे तंत्र लोकांना शिकवते. मात्र घराचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी चाचणीसाठी ड्राई टॉयलेट बांधण्याचा विचार केला. यासाठी त्यांनी आपल्या मित्रांना आणि परिचितांनाही सहकार्य करण्यास सांगितले. हे ड्राई टॉयलेट बांधण्यासाठी सुमारे दोन महिने लागले परंतु त्यानंतर त्यांना खात्री झाली की ते स्वतःचे मातीचे घर बांधू शकतात. त्यांचे घर 1000 स्क्वेअर फूट परिसरात बांधले आहे.

 रोज सकाळी चालायला जाऊनही वजन घटत नाही? ५ टिप्स लक्षात ठेवा, नेहमी फिट राहाल

त्याच्या घरात लिव्हिंग रूम, किचन, दोन बेडरूम आणि दोन बाथरूम आहेत. घरातील शौचालयेसुद्धा सामान्य आहेत, ज्यामध्ये पाण्याचा वापर केला जातो. पण त्यातून जे मलमूत्र बाहेर पडते, त्यासाठी सेप्टिक टँक बनवण्याऐवजी घराच्या मागील बाजूस प्रक्रिया केले जाते. जेणेकरून पाणी जमिनीत शोषले जाईल आणि उर्वरित कचऱ्याचे खतात रूपांतर होत राहील.

कुबट वास येऊ नये म्हणून  कपडे धुताना ५ वस्तू वापरा; कपड्यांना नेहमी येईल सुंगध

माती व्यतिरिक्त, चुना, लाकूड, मातीच्या फरशा, खिडक्या आणि दरवाजे इत्यादी इतर सर्व साधने स्थानिक भागातून आणली आहेत. त्यांनी अधिकाधिक पुनर्वापर केलेल्या गोष्टींचा वापर केला आहे. घरातील जवळजवळ सर्व खिडक्या आणि दरवाजे हे सेकंड हँड आहेत. त्याचप्रमाणे जुन्या काचेच्या बाटल्यांचा वापर करण्यात आला आहे. 

फ्लोअरिंगसाठी, त्यांनी चमातीच्या फरशा वापरल्या आहेत.  याशिवाय बाथरूममध्ये फरशा घालण्यासाठीही त्यांनी सिमेंटचा वापर केला आहे. त्यांनी सांगितले की, सुरुवातीपासूनच त्यांची योजना किमान सिमेंट वापरण्याची होती. जिथे सिमेंटशिवाय काम होणार नाही तिथेच सिमेंट वापरायचे, असे त्यांनी ठरवले होते. घराच्या भिंतींना प्लास्टर करण्यासाठीही त्यांनी निसर्गपूरक साधनांचा वापर केला आहे.

Web Title: Simple living simpler life nature eco friendly house village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.