Lokmat Sakhi >Inspirational > स्मिता गोंदकरची हिमालयात थरारक बाइक राइड! अशी राइड करायची तर फिटनेससाठी तिने काय केलं?

स्मिता गोंदकरची हिमालयात थरारक बाइक राइड! अशी राइड करायची तर फिटनेससाठी तिने काय केलं?

मराठमोळी अभिनेत्री स्मिता गोंदकरला बाइक राईड जबरदस्त आवडते. स्मिताने नुकतेच हिमालयात जाऊन बाइक रायडिंग केले असून त्याचे अनेक थरारक फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 03:30 PM2021-10-21T15:30:34+5:302021-10-21T15:31:19+5:30

मराठमोळी अभिनेत्री स्मिता गोंदकरला बाइक राईड जबरदस्त आवडते. स्मिताने नुकतेच हिमालयात जाऊन बाइक रायडिंग केले असून त्याचे अनेक थरारक फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. 

Smita Gondkar's thrilling bike ride in the Himalayas! What did she do for fitness if she wanted to ride like that? | स्मिता गोंदकरची हिमालयात थरारक बाइक राइड! अशी राइड करायची तर फिटनेससाठी तिने काय केलं?

स्मिता गोंदकरची हिमालयात थरारक बाइक राइड! अशी राइड करायची तर फिटनेससाठी तिने काय केलं?

स्मिता गोंदकर म्हणजे मराठीतली एक स्टनिंग, बोल्ड अभिनेत्री. 'पप्पी दे, पप्पी दे, पारूला.....' या भन्नाट गाण्यामुळे स्मिता प्रचंड गाजली होती. पण त्यापेक्षाही जास्त लोकप्रियता तिने बिगबॉसमध्ये सहभागी होऊन मिळवली होती. मागच्या वर्षीच्या बिगबाॅस सिझनमध्ये सहभागी झालेली स्मिता तिचे एक वेगळे फॅन सर्कल निर्माण करू शकली. बिग बॉसच्या त्या सिझनमध्ये शेवटच्या मोजक्या काही स्पर्धकांपैकी स्मिता एक होती. तिचा शांतपणा आणि प्रत्येक गोष्टीला संयमाने तोंड देण्याची तिची सवय त्यावेळी खूपच लोकप्रिय झाली होती. 

 

शांत, संयमी आणि तेवढ्या बोल्ड असणाऱ्या स्मिताला बाइक राईड, कार राईड यासारख्या साहसी खेळांची प्रचंड आवड आहे. ती हे सगळे साहसी खेळ नियमितपणे करत असून नुकतीच तिने हिमालयात जाऊन बाईक राईड केली आहे. एरवी स्मिताची अंगकाठी पाहून ती बाइकचे एवढे वजन कशी काय पेलवत असेल, असा प्रश्न सहज कोणालाही पडू शकतो. पण हिच तर तिची खासियत आहे. तिचे बाइक आणि कार राईडिंग कौशल्य जबरदस्त असून हिमालयात केलेल्या तिच्या बाइक राईडचे फोटो आणि व्हिडियो तर कमालीचे थरारक झाले आहेत. 

 

स्मिता सोशल मिडियावर प्रचंड ॲक्टीव्ह असते. ती नेहमीच तिचे फोटो, व्हिडियो सोशल मिडियावर शेअर करत असते. दोन दिवसांपूर्वी स्मिताने तिचे हिमालयातील बाइक राईडचे फोटो आणि काही व्हिडियो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हिमालयात बाइक राईड करणं ही अजिबातच चेष्टेची गोष्ट नाही. यासाठी तुमचा फिटनेस जबरदस्त असला पाहिजे. असा फिटनेस स्मिताने मिळवला आहे. बाइक राईडचे काही फोटो शेअर करताना स्मिताने एक पोस्टही शेअर केली आहे. ती म्हणते की, हिमालयातली बाइक राईड ही जगातली अशी एकमेव राईड आहे, जी समुद्रसपाटीपासून १२ हजार ते १५ हजार फुटांवर आयोजित केली जाते. जिथे केवळ १७ ते १८ टक्के ऑक्सिजन असतो आणि तिथले तापमान तर -१ ते -४ डिग्री सेल्सियस असते. अशा खडतर वातावरणामुळे हिमालयातली ही बाइक रॅली जगातील तिसरी सगळ्यात अवघड बाइक रॅली मानण्यात येते. 

 

कशी होती स्मिताची बाइक रॅली?
स्मिताची बाइक रॅली मनालीपासून सुरु झाली. यानंतर ती हाम्पता पास, ग्रम्फू, चाट्रु, कुनझून पास, लोसार, काझा, स्पिटी व्हॅली असा तब्बल ३७१ किमीचा प्रवास करून सोलांग व्हॅली येथे आली. कधी अतिशय तिव्र उतार तर कधी तेवढेच अवघड चढ, वातावरणात सातत्याने होणारे बदल, धुळ, दगड, खडक, नद्या, वाळू आणि गोठवून टाकणारे हवामान आणि कमी होत जाणारी ऑक्सिजनची पातळी अशा अनेक कठीण प्रसंगांवर मात करत स्मिताने तिची बाइक राईड पुर्ण केली आहे. ही रॅली अतिशय आव्हानात्मक आणि माझ्या कन्फर्ट झोनमधून मला पुर्णपणे बाहेर काढणारी होती. पण मला नेहमीच माझ्या मर्यादा तपासून घ्यायला आवडते, म्हणूनच मी ही बाइक राईड अतिशय उत्साहात आणि मोठ्या हिमतीने पुर्ण केली, असंही स्मिता सांगते. 

 

कार रेसिंगचीही स्मिता शौकिन
स्मिताला कार रेसिंगदेखील खूप जास्त आवडते. ती म्हणते हे सगळे खेळ करताना खूप जपून रहावे लागते. थोडी जरी गडबड झाली तरी ती महागाड पडू शकते. २०१९ साली झालेल्या फॉर्म्युला ४ रेसिंगमध्येही स्मिता सहभागी झाली होती. स्मिता म्हणते बाइक राईड, कार रेसिंग या सगळ्या टेक्निकल गोष्टी असून त्या मला कमालीच्या आवडतात. स्मिताच्या कुटूंबातील अनेक मंडळींना कार रेसिंग, बाइक रेसिंग, सायकल राईड अशा गोष्टींची आवड आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पाहूनच स्मितालाही या साहसी खेळांमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला. स्मिताने आजवर अनेक वेळा रेसिंग केलं असून अनेक स्पर्धांमध्ये ती फास्टेस्ट वुमन या बक्षिसाची मानकरीही ठरली आहे.  

 

अशी राइड करायची तर फिटनेससाठी काय करावं?
- आजकाल हिमालयातल्या बाइक राईडची प्रचंड क्रेझ आहे. यामध्ये महिलांचे प्रमाण देखील दिवसेंदिवस लक्षणीय वाढते आहे.
- पण अशा प्रकारची बाइक राईड करायची असेल तर तुमचा फिटनेस मात्र जबरदस्त असायला हवा.
- हिमालयात बाइक राईड करणे ही अजिबातच हलक्यात घ्यायची गोष्ट नाही. त्यामुळे तुम्ही ड्रायव्हिंगमध्ये एक्सपर्ट असायलाच हवे, हा या राईडमध्ये सहभागी होण्याचा पहिला अलिखित नियम आहे.


- कमी ऑक्सिजनमध्ये तुम्हाला अनेक वेळा ड्राईव्ह करावं लागतं. त्यामुळे तुम्ही प्राणायाम किंवा अन्य व्यायाम करून श्वसन संस्थेला बळकटी दिली पाहिजे.
- राईडचं प्लॅनिंग ज्या वर्षीचं असेल, त्याच्या किमान एक वर्ष आधीपासून अतिशय काटेकोरपणे, नियमितपणे हार्डकोअर व्यायाम करण्यावर भर दिला पाहिजे.
- बाइक राईड करण्यापूर्वी काही महिने आधीपासूनच दर महिन्याला हेल्थ चेकअप करून घ्यावं.

 

Web Title: Smita Gondkar's thrilling bike ride in the Himalayas! What did she do for fitness if she wanted to ride like that?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.