स्मृती इराणी. केंद्रीय मंत्री आहेत. आज त्यांचा वाढदिवस. एकेकाळी त्या मॉडेल, अभिनेत्री होत्या. आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी मॉडेलिंगपासून केली. १९९७ साली फेमिना मिस इंडियामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेतली त्यांची ‘तुलसी’ आजही सर्वांना आठवते. अनेक भाषांवर प्रभूत्व आणि उत्तम वक्तृत्व ही त्यांची बलस्थानं आहेत(Smriti Irani birthday: Actress turned politician turns 47 today).
स्मृती मूळच्या नवी दिल्लीच्या. बारावीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी स्कूल ऑफ ओपन लर्निंग दिल्ली विद्यापीठातून त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली. पुढे त्यांनी झुबीन इराणी यांच्याशी लग्न केले. त्यांना झोहर इराणी, जोश इराणी आणि चॅनेल इराणी अशी तीन मुले आहेत.
स्मृती इराणी यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक संकटांना तोंड दिले. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती विशेष बरी नव्हती. त्यांच्या वडिलांची कुरिअर कंपनी होती. त्यामुळे त्यांना महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता आले नाही. यानंतर स्मृती इराणी यांनी मॅकडोनाल्डमध्ये काम केले. यासह त्या सौंदर्य उत्पादनांचे मार्केटिंगही करायचे. यादरम्यान, त्यांना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेण्याचा सल्ला मिळाला. मॉडेलिंगसाठी त्यांना त्यांच्या वडिलांकडून साफ नकार मिळाला. मात्र, तरीही त्या मॉडेलिंगमधील करियरच्या शोधात मुंबई पोहचल्या.
मॉडेलिंग करण्यासाठी स्मृती यांना त्यांच्या वडिलांकडून नकार मिळाला. मात्र, त्यांच्या पाठीशी त्यांची आई खंबीरपणे उभी होती. त्यांच्या आईने पैशांची व्यवस्था करून, स्मृती यांना मिस इंडियामध्ये सहभाग घेण्यासाठी मुंबईत पाठवले. स्मृती इराणीने मिस इंडियामध्ये भाग घेतला, व अंतिम फेरी गाठली. पण टॉप-८ मधून बाहेर पडल्या. त्यानंतर मिक्का सिंगचा म्युझिक अल्बम ‘सावन मे लगी आग’च्या ‘बोलियां’ या गाण्यात, त्यांना काम करण्याची संधी मिळाली.
फक्त माणूस म्हणून मानानं जगू द्या! ब्यूटी पार्लर सुरु करणाऱ्या ट्रान्सजेंडरची इमोशनल गोष्ट
काही दिवस त्यांना काम मिळत नव्हते. त्यांनी जिद्द सोडली नाही,त्यांनी फ्लाइट अटेंडंटच्या नोकरीसाठी अर्ज केला होता, पण तो ही नाकारण्यात आला होता. त्या काळी स्मृती इराणींना अनेक नकारांचा सामना करावा लागला.
स्मृती इराणी यांचे नशीब खरंतर एकता कपूरमुळे चमकले. 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या टीव्ही शोमधील तुलसीचे पात्र घराघरात पोहचले. फारच कमी लोकांना माहीत असेल, या मालिकेसाठी सुरुवातीला स्मृती इराणी यांना रिजेक्ट करण्यात आले होते. पण त्यानंतर त्यांनाच या मालिकेमध्ये मुख्य पात्र मिळाले. हळूहळू स्मृती आणि एकता कपूर यांच्यामध्ये घट्ट मैत्री झाली, व ती मैत्री आजतागायत कायम आहे.