Join us  

निवृत्तीनंतर सुरु केला सुकवलेल्या फळांचा बिझनेस, वयाच्या ६७ व्या वर्षी आजी बनल्या बिझनेस वुमन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 3:27 PM

Solar dryer machine to run a fruit processing business : नैसर्गीक बदलांमुळे बरीच फळं खराब झाल्यानं त्यांना योग्य किंमत मिळत नाही.

(Image Credit- The Better India)

आपण स्वत:चा  व्यवसाय करावा त्यातून भरपूर पैसे कमवावेत, आपलं नाव मोठं व्हावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. महाराष्ट्रातील डहाणू येथिल रहिवासी असलेल्या लतिका पाटील यांचे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून चिकूची शेती करत आहेत. त्यांच्या शेतातले चिकू आजूबाजूच्या शहरातही जातात. नैसर्गीक बदलांमुळे बरीच फळं खराब झाल्यानं त्यांना योग्य किंमत मिळत नाही. (Solar dryer machine to run a fruit processing business by latika patil)

लतिका यांचे पती अच्यूत पाटील यांनी २० वर्षांपूर्वी चिकू उन्हात वाळवून सुकवून त्याचं प्रोसेसिंग सुरू केलं होतं. त्यावेळी लतिका शाळेत शिक्षिका होत्या.  द बेटर इंडियाशी बोलताना लतिका यांनी सांगितलं की, ''मला नेहमीच शेती करण्यात रस होता. २०१५ ला  निवृत्त झाल्यानंतर  मी शेती करायला सुरुवात केली. चिकूवर वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. वेगवेगळ्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये भाग घेतला आणि नवीन आयडीयाजवर काम केलं.  त्यानंतर प्रोसेसिंगवर अधिक लक्ष  केंद्रीत केलं. प्रोसेसिंगला खूप वेळ आणि मेहनत लागायची. पण यामुळे पीक वाया जाण्यापासून वाचवता येत होतं.''

सोलार ड्रायरचा वापर करून बिझनेस यशस्वी केला

२० वर्षांपासून चिकूचं प्रोसेसिंग करून उत्पादनं बनवली जायची. पण गुणवत्तेच्यबाबतीत फारसा चांगला रिजल्ट दिसत नव्हता. जवळपास ६ वर्षांपूर्वी त्यांच्या मुलगा निनाद यानं लतिका यांना सोलार ड्रायर मशिनबद्दल सांगितलं  होतं.  लतिका सांगतात,  “जेव्हा माझ्या मुलाने सोलर ड्रायर मशीनबद्दल सांगितले तेव्हा मला ते खूप फायदेशीर वाटले, मी त्याला सोलर ड्रायर मशीन घेण्यास सांगितले. पहिल्या मशिनसोबत काम करताना आम्हाला इतका चांगला रिजल्ट मिळाला की हळूहळू आम्ही आणखी मशीन्स विकत घेऊ लागलो.”

आज त्यांच्याकडे 20 सोलर ड्रायर मशीन आहेत. एका मशीनची किंमत 40 हजार रुपये आहे. आजूबाजूच्या अनेक शेतकऱ्यांनाही त्यांनी हे यंत्र दिले आहे. यासोबतच महिलांना प्रशिक्षणही दिले जात आहे. आता गावातील इतर अनेक शेतकरीही त्यांच्या शेतात चिकू सुकवून लतिका यांना इतर पदार्थ बनवण्यासाठी देतात. 

या सोलर ड्रायर मशिनमध्ये चिकू, कांदा, केळी यासह इतर अनेक पिके सुकवता येतात. त्यात वाळलेल्या भाज्या आणि फळांचा रंग, चव दीर्घकाळ चांगली राहते, असे लतिका यांनी सांगितले.  निनाद 'ऑरा ग्रीन'चे सर्व मार्केटिंग पाहतो. ते आपली उत्पादने देशभरात ऑनलाइन पोहोचवत आहे. यासोबतच त्यांचा डहाणूमध्ये 'ऑरा ग्रीन' कॅफे देखील आहे, जिथून लोक त्यांची उत्पादने खरेदी करू शकतात.

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीव्यवसाय