Join us  

७ वर्षे हाऊसवाईफ होते, करिअर सुरु करताना वाटलं होतं, जमेल आपल्याला हे? रुपाली गांगुली सांगतेय, अनुपमाची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2022 12:55 PM

How Rupali Ganaguli starts her carrier: वाचा 'अनुपमा'च्या (Anupama) म्हणजेच अभिनेत्री रुपाली गांगुली हिच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातली ही गोष्ट... मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा करिअर सुरू करताना बघा नेमकी तिची अवस्था कशी होती.

ठळक मुद्देएवढ्या मोठ्या गॅपनंतर पुन्हा काम सुरू करणं तिच्यासाठीही साेपं नव्हतंच. पण बघा तिने नेमकं कसं जमवलं हे सगळं.. 

लग्न, मुलं या सगळ्या धावपळीत एक- दोन वर्षांचा ब्रेक झाला तरी अनेक जणी आज पुन्हा करिअर सुरू करताना घाबरून जातात. या ब्रेकमुळे आपण स्पर्धेतून बाहेर फेकले जाऊ की काय, अशी शंका अनेकींच्या मनात कित्येकदा डोकावून जाते. ब्रेकनंतर पुन्हा काम सुरू करताना अनेकजणी आत्मविश्वास हरवून बसतात. काम करण्याचा कॉन्फिडन्सच त्यांच्यात नसतो. पण थोडी हिंमत एकवटली तर पुन्हा एकदा जोमात करिअर सुरू होऊ शकतं, असं सांगतेय 'अनुपमा' फेम (Anupama)अभिनेत्री रुपाली गांगुली (actress Rupali Ganguli). तिनेही लग्न- बाळंतपण यासाठी तब्बल ७ वर्षांचा ब्रेक घेतला होता. एवढ्या मोठ्या गॅपनंतर पुन्हा काम सुरू करणं तिच्यासाठीही साेपं नव्हतंच. पण बघा तिने नेमकं कसं जमवलं हे सगळं.. 

 

The Better India यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये रुपाली सांगतेय की तिचं करिअर ऐन जोमात असतानाच तिचं लग्न झालं. त्यामुळे करिअरमध्ये एक ब्रेक आला होता. काही वैद्यकीय कारणांमुळे ती आई होऊ शकणार नाही, असं तिला सांगण्यात आलं होतं. पण लग्नानंतर काही वर्षांतच तिला दिवस गेले आणि तिला मुलगा झाला. हे खरोखरच तिच्यासाठी आणि तिच्या परिवारासाठी एक आश्चर्य होतं. त्यामुळे मुलाचं संगोपन, त्याच्या प्रत्येक लहान- सहान गोष्टीतला आनंद हे तिच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं हाेतं. या सगळ्यात ६ वर्षे निघून गेली आणि त्यानंतर तिच्यासमोर 'अनुपमा'चं प्रपोजल आलं.

 

तिने ते स्विकारलं तर खरं, पण मनातून प्रचंड धास्तावलेली होती. ७ वर्षांत वजनही खूप वाढलं होतं. त्यामुळे प्रेक्षक या रुपात तिला स्विकारतील का, किंवा ती स्वत:ला अशा रुपात स्क्रिनवर पाहू शकेल का, याविषयी तिच्या मनात हजारो शंका होत्या. शिवाय एवढ्या मोठ्या गॅपमुळे आत्मविश्वासही कमी झालेला होता. पण 'अनुपमा'ला मिळालेलं घवघवीत यश मला माझा गेलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवून देणारं ठरलं असं रुपाली सांगतेय. 

 

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीसोशल व्हायरल