मुलगी शिकली प्रगती झाली असं म्हटलं जातं. परंतु, आजही काही ठिकाणी मुलगी जन्मला आली तर तिची अवहेलना केली जाते.(Gopika Govind tribal air hostess) ती जन्माला आल्यापासून ते शिक्षण-लग्न अशा अनेक गोष्टींमुळे आई-वडिलांच्या जीवाला घोर लागतो. परंतु, हीच मुलगी जेव्हा आई-वडिलांचे नाव मोठ्या अभिमानाने जगभरात पसरवते तेव्हा कौतुकही तितकंच केलं जातं. (First Adivasi air hostess Kerala)
आपल्यापैकी अनेकजण बालवयापासून स्वप्न पाहात असतात.(Inspirational story Adivasi girl) वय वाढले की, या स्वप्नांमध्ये देखील बदल होत जातो. असेच एक स्वप्न वयाच्या १२ व्या वर्षी पाहिले ते गोपिका गोविंदने. घराच्या छतावरुन आभाळात भरारी घेणाऱ्या विमानाला पाहिलं आणि आपण देखील त्यात कधीतरी बसू असे मनाशी निश्चित केलं. (Kerala tribal girl becomes air hostess) विमानाचा आवाज आला की, आजूबाजूची सगळी मुले त्याच्या मागे धावताना दिसली पण गोपिकाच्या मनाने आणि डोळ्यांत आपल्या स्वप्नाविषयी एक वेगळीच चमक पाहायला मिळाली. (First tribal woman air hostess India)
७ लेकी म्हणजे शाप, लोकांनी हिणवले त्याला; आज तोच बाप ताठ मानेने सांगतोय...
केरळच्या अलाकोड येथील एसटी कॉलनी वाकुन कुडी येथे गोपिकाचा जन्म झाला. ती केरळमधील करीम बाला या अनुसुचित जमातीतील गरीब कुटुंबातील मुलगी. गोपिकाला लहानपणी अनेक समस्यांचा सामना करावा लागला. घरची परिस्थिती हालाखिची होती. आई-वडिल रोजंदारीवर काम करत. तिला इतर आदिवासी मुलींप्रमाणे आर्थिक- सामाजिक आव्हानांचा सामना करावा लागला होता. असे असले तरी गोपिकाने स्वप्न पाहाणे थांबवले नाही.
गोपिकाला घराच्या छतावरुन जाणाऱ्या विमानाला पाहिले की, कुतुहल वाटायचे. इथं काम कसे होतं असेल, या ठिकाणी जाण्यासाठी काय करावं लागेल. असे एक नी अनेक प्रश्न तिच्या मनात घोळत घालत. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने प्रयत्न करायला सुरुवात केली. परंतु, स्वप्न पूर्ण करताना तिला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.
तिला एअर होस्टेस बनायचे होते परंतु, कोर्सची फी महाग होती. एअर हॉस्टेस बनण्याचा हा खर्च कुटुंबाला परवडणारा नव्हता. आपले स्वप्न अपूर्ण राहाते की, काय अशी खंत तिला वारंवार वाटत होती. अशातच सरकारच्या अनुसुचित जमातीच्या मुलींना शिक्षणात अनुदान मिळणार याबाबत तिला कळाले. त्यानंतर तिने IATA कस्टमर सर्व्हिस केअरमध्ये डिप्लोमा केला. त्यानंतर तिने वायनाडच्या ड्रीम स्काय एव्हिएशन ट्रेनिंग अॅकॅडमीत प्रवेश घेतला. या कोर्समधून सरकाकडून तिला लाख रुपयांची मदत मिळाली अन् गोपिकाचे आयुष्य पूर्ण बदलले. सरकारच्या मदतीने केरळमधील आदिवासातील समाजातील गोपिकाचे स्वप्न अखेर १२ वर्षानंतर पूर्ण झाले. एअर होस्टेस बनून तिने आपल्या कुटुंबासोबत समाजाचे देखील नाव मोठे केले. तिचं यश फक्त वैयक्तिक नसून अनेक मुलींसाठी प्रेरणादायी आहे. असं म्हटंल जातं की, इच्छा असते तिथे मार्ग आपल्याला नक्की मिळतो.