Lokmat Sakhi >Inspirational > एक दोनदा नाही ४ वेळा छाया सिंह UPSC नापास झाल्या, पण मग त्यांनी ठरवलं.. घाबरले तर..

एक दोनदा नाही ४ वेळा छाया सिंह UPSC नापास झाल्या, पण मग त्यांनी ठरवलं.. घाबरले तर..

स्पर्धा परीक्षांमधल्या अपयशामुळे खचून जाऊन 'पुरे हा नाद' असा विचार करणाऱ्या उमेदवारांसाठी मध्य प्रदेश येथील रीवा जिल्ह्यातल्या छाया सिंह (Chhaya Singh) यांचं उदाहरण नक्कीच प्रेरणादायी ठरेल. छाया सिंह यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग 2021 च्या (UPSC 2021 Exam) परीक्षेत उत्तीर्ण होत 288 वा क्रमांक मिळवला. छाया सिंह यांची ही सक्सेस स्टोरी (success story of Chhaya Singh) गाजतेय ती त्यामागच्या अनेक अपयशांमुळे. या अपयशाचा त्यांनी धैर्यानं केलेल्या सामन्यामुळे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2022 01:52 PM2022-09-03T13:52:26+5:302022-09-03T14:01:31+5:30

स्पर्धा परीक्षांमधल्या अपयशामुळे खचून जाऊन 'पुरे हा नाद' असा विचार करणाऱ्या उमेदवारांसाठी मध्य प्रदेश येथील रीवा जिल्ह्यातल्या छाया सिंह (Chhaya Singh) यांचं उदाहरण नक्कीच प्रेरणादायी ठरेल. छाया सिंह यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग 2021 च्या (UPSC 2021 Exam) परीक्षेत उत्तीर्ण होत 288 वा क्रमांक मिळवला. छाया सिंह यांची ही सक्सेस स्टोरी (success story of Chhaya Singh) गाजतेय ती त्यामागच्या अनेक अपयशांमुळे. या अपयशाचा त्यांनी धैर्यानं केलेल्या सामन्यामुळे.

Success story of UPSC 2021 topper chhaya singh... She failed for 3 times but not give up her efforts. | एक दोनदा नाही ४ वेळा छाया सिंह UPSC नापास झाल्या, पण मग त्यांनी ठरवलं.. घाबरले तर..

एक दोनदा नाही ४ वेळा छाया सिंह UPSC नापास झाल्या, पण मग त्यांनी ठरवलं.. घाबरले तर..

Highlights युपीएससीच्या चौथ्या प्रयत्नात 288 क्रमांक मिळवलेल्या छाया सिंह यांची इंडियन डिफेंस अकाउंटस सर्व्हिस ( आयडीएएस) या पदासाठी निवड झाली आहे.एका टप्प्यावर छाया सिंह यांचंही मनोबल खचलं होतं पण प्रयत्न करण्याच्या जिद्दीमुळे अपयशाचाही त्यांनी धैर्यानं सामना केला. 

लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षा (UPSC Exam)  पास करुन आयएएस, आइपीएस, आइआरएस  अधिकारी बनण्याचं स्वप्न अनेक तरुण तरुणी बघतात. त्यासाठी जीवतोड मेहनत घेतात. पण या परीक्षांचं स्वरुपच इतकं अवघड असतं की वर्षानुवर्षांची तयारीही पुरी पडत नाही. अनेकजण अजून एक प्रयत्न म्हणत कित्येक वर्ष प्रयत्न करत राहातात तरी यश पदरात पडत नाही. तर काहीजण लागोपाठच्या अपयशानंतर निराश होवून स्पर्धां परीक्षांचा नाद सोडून करिअरसाठी दुसरी वाट निवडतात. हे वास्तव असलं तरी या वास्तवाचा दटून सामना करणारे आणि पुरुन उरणारे छाया सिंह (Chhaya Singh)  सारखे आदर्शही याच वास्तवाचा एक भाग आहेत. स्पर्धा परीक्षांमधल्या अपयशामुळे खचून जाऊन 'पुरे हा नाद' असा विचार करणाऱ्या उमेदवारांसाठी मध्य प्रदेश येथील रीवा जिल्ह्यातल्या छाया सिंह यांचं उदाहरण नक्कीच प्रेरणादायी ठरेल. छाया सिंह यांनी  केंद्रीय लोकसेवा आयोग 2021 च्या परीक्षेत उत्तीर्ण होत 288 वा क्रमांक मिळवला.  युपीएससीच्या चौथ्या प्रयत्नात 288 क्रमांक मिळवलेल्या छाया सिंह यांची  इंडियन डिफेंस अकाउंटस सर्व्हिस ( IDAS) या पदासाठी निवड झाली आहे.   छाया सिंह यांची ही सक्सेस स्टोरी (success story of Chhaya Singh)  गाजतेय ती त्यामागच्या अनेक अपयशांमुळे. या अपयशाचा त्यांनी धैर्यानं केलेल्या सामन्यामुळे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2021 च्या परीक्षेत यश मिळवणाऱ्या छाया सिंह यांना यापूर्वी अनेकदा अपयशाला सामोरं जावं लागलं. सुरुवातीच्या दोन प्रयत्नांमध्ये तर साध्या पूर्व परीक्षेचा टप्पाही त्यांना ओलांडता आला नव्हता. तिसऱ्या प्रयत्नात त्यांची  दिल्ली पोलिसाता असिस्टंट कमिशनर ऑफ पोलिस म्हणून निवड झाली होती.  लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या आधी  मध्यप्रदेश राज्य सेवा आयोगाच्या परीक्षेतही त्यांना अनेकवेळा अपयश आलं. सतत अपयशाचा सामना करताना छाया सिंह यांचंही मनोबल काही वेळापुरतं खचलं होतं. हे सर्व सोडून द्यावं असं त्यांनाही वाटलं होतं. पण त्यांच्यातली यशासाठी प्रयत्न करण्याची जिद्द  त्यांना अपयशातही खचून न जाण्याचं बळ देत होती. प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यश मिळेलच हे सूत्र मनाशी पक्कं केलेलं असल्यानं एकामागोमाग परीक्षांमध्ये अपयश येवूनही परीक्षेची तयारी करणं, त्यासाठी दिवसरात्र मेहनत घेणं त्यांनी सुरुच ठेवलं. छाया सिंह म्हणतात, 'अनेकवेळा अपयश आल्यानंतर मीही कंटाळले होते, वैतागले होते. वडील ऑफिसमध्ये गेल्यावर  आपल्याला हे कुठे असंं अडकवून ठेवलं म्हणून आपण आईशी  खूप भांडणही केलं.  पण नंतर असा वैताग करत राहाण्यापेक्षा प्रयत्न करत राहाण्याचा मार्ग मी स्वीकारला आणि त्याचाच उपयोग झाला!'

Image: Google

युपीएससीच्या परीक्षेची तयारी करताना  गुंजन सक्सेना या चित्रपटातल्या एका  वाक्यानं छाया सिंह यांना प्रयत्न करण्याची ताकद मिळाली होती. आपण जर कष्टाचा, मेहनतीचा हात सोडला नाही तर नशीबही आपला हात सोडत नाही. छाया सिंह म्हणतात युपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा क्रॅक करण्यासाठी 50 टक्के आपली मेहनत आणि 50 टक्के आपली झोकून देवून प्रयत्न करण्याची वृत्ती उपयोगी ठरते. त्यामुळे किती वेळा अपयश आलं हे महत्वाचं नसून या प्रत्येक अपयशात न खचता उभं राहाणं, आपले प्रयत्न सुरुच ठेवणं हे महत्वाचं असल्याचं छाया सिंह आपल्या अनुभवातून सांगतात. प्रयत्न प्रामाणिक असतील तर यशाचा तो टप्पा येतोच हेच छाया सिंह यांच्या उदाहरणातून शिकायला मिळतं. 

Web Title: Success story of UPSC 2021 topper chhaya singh... She failed for 3 times but not give up her efforts.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.