Lokmat Sakhi >Inspirational > हार मानेल ती सुष्मिता कसली? हार्ट अटॅक आला, ऑपरेशन झाले पण ती कामाला लागली आणि...

हार मानेल ती सुष्मिता कसली? हार्ट अटॅक आला, ऑपरेशन झाले पण ती कामाला लागली आणि...

Sushmita Sen walks ramp at Lakme Fashion Week after recovering from heart attack : शस्त्रक्रियेनंतर सुष्मिता पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांना लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवर दिसली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2023 06:47 PM2023-03-11T18:47:58+5:302023-03-11T18:51:15+5:30

Sushmita Sen walks ramp at Lakme Fashion Week after recovering from heart attack : शस्त्रक्रियेनंतर सुष्मिता पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांना लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवर दिसली.

Sushmita Sen walks ramp at Lakme Fashion Week after recovering from heart attack | हार मानेल ती सुष्मिता कसली? हार्ट अटॅक आला, ऑपरेशन झाले पण ती कामाला लागली आणि...

हार मानेल ती सुष्मिता कसली? हार्ट अटॅक आला, ऑपरेशन झाले पण ती कामाला लागली आणि...

सुष्मिता सेन कायम फिट राहणारी, आपल्या डाएट आणि एक्सरसाइजबद्दल काटेकोर असणारी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे. सुष्मिताने नुकताच २ मार्च २०२३ रोजी सोशल मीडिया पोस्ट करत तिला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती दिली होती. यावेळी तिने वडिलांसोबतचा एक फोटो शेअर करत वेगवेगळ्या भावना व्यक्त करणारी सोशल मीडिया पोस्ट लिहिली होती. या पोस्टमधून सुष्मिताने महिलांनी विशेषत: त्यांच्या हृदयाच्या आरोग्यावर आवर्जून लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला होता.

४७ वर्षीय सुष्मिता सेन तिच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेते. ती जिममध्ये जाते, योगा करते. ती तिच्या फिटनेसशी संबंधित व्हिडिओ शेअर करत असते. अशा स्थितीत सुद्धा तिला हृदयविकाराचा झटका कसा आला असा प्रश्न तिच्या चाहत्या वर्गांला पडला आहे. परंतु आता ती ठीक असल्याचे कळताच सर्व चाहत्यांचे टेन्शन दूर झाले आहे. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे सुष्मिताने सांगितले. तिच्या मुख्य धमनीत ९५ % ब्लॉकेज होते. पण हे संकट आता दूर होऊन धोका टळला असल्याची अपडेटही तिने इंस्टाग्राम अकाऊंटवर दिली आणि प्राण वाचवल्याबद्दल सर्व डॉक्टरांचे आभार मानले. सुष्मिताने तिच्या पोस्टमध्ये पुढे सांगितले होते की, हृदयविकाराचा झटका आल्याने तिला अँन्जोप्लास्टी (Angioplasty) करावी लागली आणि नसांमध्ये स्टेंट लावण्यात आले. एवढे होऊनसुद्धा हार मानेल ती सुष्मिता कसली...(Sushmita Sen walks ramp at Lakme Fashion Week after recovering from heart attack).


सुष्मिताचे रॅम्प वॉक करत दणक्यात कम बॅक... 
 
आज (शनिवारी) लॅक्मे फॅशन वीकच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर सुष्मिताचा दणक्यात कम बॅक करतानाच व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये, सुष्मिता सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर अनुश्री रेड्डीसाठी रॅम्पवर चालताना दिसत आहे. फॅशन डिझायनर अनुश्री रेड्डी यांच्या सुंदर पारंपरिक नवीन कलेक्शनमधून एक सुंदर लेहेंगा परिधान करुन शोस्टॉपर म्हणून सुष्मिताने रॅम्प वॉक केला.

हृदयविकाराच्या झटक्यानंतर यशस्वी शस्त्रक्रिया करुन सुष्मिता परत एकदा जोमाने आपल्या कामाला लागली आहे. शस्त्रक्रियेनंतर सुष्मिता पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांना लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवर दिसली. आज, 'लॅक्मे फॅशन वीक'च्या तिसर्‍या दिवशी, मुंबईतील बीकेसीमध्ये सुरू असलेल्या 'लॅक्मे फॅशन वीक'मध्ये सुष्मिताने रॅम्प वॉक केला. सुष्मिताने आपल्या रॅम्प वॉकसाठी फॅशन डिझायनर अनुश्री रेड्डी यांनी डिजाईन केलेला पिवळ्या रंगांचा लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्याला मॅच होईल असा मिनिमल मेकअप लूक व डिजायनार नेकलेस गळ्यात घालून तिने आपला लूक पूर्ण केला होता. या पिवळ्या रंगांच्या लेहेंग्यात सुष्मिता अधिकच सुंदर दिसत होती.  


चाहत्यांकडून व नेटकऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव....    

सुष्मिताचा व्हिडीओ नेटकऱ्यांनी व चाहत्यांनी बघितल्यानंतर तिची प्रशंसा करून तिच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने तिचे कौतुक करत तिची प्रशंसा केली आहे. "तिच्यावर देवाची कृपा आहे... ती तिच्या जीवनातला सगळ्यात मोठा उत्सव साजरा करत आहे" अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर दुसऱ्या युजरने " ती देवी आहे... तिच्यात शक्ती आहे... शब्द अपुरे पडतील" अशी कमेंट करत तिच्या कमबॅकचे स्वागत केले आहे. " ही महिला आणि तिच्या आसपासचा ऑरा...फक्त अविश्वसनीय." असं म्हणत तिच्या आजारपणाशी लढण्याचे कौतुक केले आहे.

Web Title: Sushmita Sen walks ramp at Lakme Fashion Week after recovering from heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.