Join us  

तैवानची ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेती म्हणते, ‘दंगल’ हा तर माझ्या आयुष्याचा सिनेमा, कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2024 3:56 PM

Taiwan Olympic legend says Aamir Khan’s Dangal has ‘uncanny resemblance’ with her life: ‘My father was hard taskmaster, just like him in film’ : 'माझे वडील त्यांच्यासारखेच स्ट्रीक्ट टास्कमास्टर होते'

तैवानला सर्वात पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या खेळाडूला आपल्या आमीर खानचा (Aamir Khan) सिनेमा ‘दंगल’ (Dangal 2016) अतिशय भावला आहे..कारण ती म्हणते की हा तर माझ्या आयुष्याचाच सिनेमा आहे (Olympic). मी ज्या प्रकारे ऑलिम्पिक सुवर्णपदकापर्यंत (Gold Medal) पोहोचले तो सर्व प्रवास हुबेहुब ‘दंगल’ सिनेमासारखाच आहे.

कुस्तीपटू फोगाट बहिणी आणि त्यांचे वडिल महावीरसिंग फोगाट यांची मेहनत, धडपड आणि संघर्षाचे चित्रण केलेला ‘दंगल’ सिनेमा २०१६ मध्ये आला होता आणि त्याच्यात आपल्या आयुष्याचं प्रतिबिंब पाहणाऱ्या या खेळाडूने २००४ च्या ऑलिम्पिकमध्ये तायक्वोंदोचे सुवर्णपदक जिंकले होते. ४९ किलो गटात ऑलिम्पिक विजेती ठरलेल्या या तैवानी महिला खेळाडूचे नाव आहे चेन शी-सीन!(Taiwan Olympic legend says Aamir Khan’s Dangal has ‘uncanny resemblance’ with her life: ‘My father was hard taskmaster, just like him in film’).

चेन हिने ‘दंगल’ सिनेमा चिनी भाषेतील सबटायटल्ससह बघितला आणि तिला आपल्या जीवनप्रवासावर तर हा सिनेमा बनवलेला नाही ना असे वाटून गेले. ‘दंगल’ हा आजसुध्दा चीनमध्ये सर्वाधिक पाहिला गेलेला व सर्वाधिक कमाई केलेला भारतीय सिनेमा आहे.

मासिक पाळी सतत अनियमित? ४ प्रकारची फळं नेहमी खा, मासिक पाळी नियमित यायला हवी तर..

तर दंगलशी चेन शी-सीन हिचे काय व कसे साम्य आहे ते बघुयात...

दंगल सिनेमात आमीर खान याने महावीरसिंग फोगाट या कर्तव्यकठोर पित्याची भूमिका साकारली आहे. हा तो पिता आहे ज्याला आपल्या मुलींना नामवंत आणि यशस्वी पहिलवान बनवायचे आहे. ह्या महावीर सिंग फोगाट यांच्याप्रमाणेच चेन शी-सीनचे वडिलसुध्दा अतिशय कडक होते. कदाचित ते फोगाट यांच्यापेक्षाही कठोर असावेत असे ती सांगते.

चेनचे वडील तायक्वोंदो प्रशिक्षण केंद्र चालवायचे.  त्यांनीच तिला वयाच्या पाचव्या वर्षापासून मार्शल आर्टचे धडे द्यायला सुरुवात केली. ते ज्या पध्दतीने मेहनत करुन घेत होते ते पाहून चेन शी-सीन चक्क घरुन पळूनसुध्दा गेली होती पण काही दिवसांनी ती घरी परतली आणि वडिलांच्या मार्गदर्शनात तिने पुढे तायक्वोंदोतील ऑलिम्पिक सुवर्णपदकापर्यंत झेप घेतली. तैवानचे ते ऑलिम्पिकमधील पहिले सुवर्णपदक होते.

फक्त वयाच्या १४ व्या वर्षी ऑलिम्पिक पर्यंत पोहचली भारताची धिनिधी, पोहण्यात तरबेज मुलीची वाचा जिद्द

अशाप्रकारे चेन शी-सीन हिचा प्रवास हा आपल्या बबिता व विनेश या फोगाट बहिणींसारखाच राहिला आहे म्हणून तिला ‘दंगल’ या सिनेमात आपल्या आयुष्याचे प्रतिबिंब दिसले.

टॅग्स :पॅरिस ऑलिम्पिक २०२४आमिर खानप्रेरणादायक गोष्टी