Join us  

युक्रेन-रशिया युद्धात ठार झालेली ब्राझिलीयन मॉडेल थलिता डो वले नक्की कोण? ती युक्रेनला का गेली होती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2022 1:51 PM

Thalita do valle : Ukraine Russia War : थलिता ब्राझिलची, पण लढायला युक्रेनला गेली आणि तिथंच तिला वीरमरण आलं

ठळक मुद्देलोकांचे प्राण वाचविण्याच्या कामात सहभागी झाल्यामुळे आमच्यासाठी ती हिरो आहे अशी भावना तिच्या भावाने व्यक्त केली.थलिता ज्या बंकरमध्ये होती त्या बंकरमध्ये तिच्या गटातील ती एकमेव जिवंत राहीलेली महिला होती.

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धाविषयी आपल्याला माहितच आहे. युक्रेन ताब्यात घेण्यासाठी रशियाने केलेला हल्ला आणि त्यामध्ये हजारो जणांचा जीव गेला आहे. यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच लष्करातील जवानांचाही समावेश आहे. मृत्यूचे चक्र अद्यापही सुरूच असून यामध्ये नुकताच ब्राझिलची माजी मॉडेल असलेली थालिता डो वले (Thalita do valle) हिचा मृत्यू झाला. युक्रेमच्या सैन्यात सहभागी झालेली थलिता रशियाच्या हवाई हल्ल्यात ठार झाली. ती ३९ वर्षांची होती.  युक्रेनमध्ये मॉडेल्स तरुणींनी शस्त्र हातात घेत युद्धात सहभागी होत असल्याच्या बातम्या आपण गेल्या काही काळात वाचल्या. थलिता युद्धाचं डॉक्युमेण्टशनही युक्रेनमध्ये करत होती. (Ukraine Russia War)

(Image : Google)

कोण आहे थलिता डो वले ?

थलिता ही ब्राझीलची. मॉडेलिंगमध्ये करिअर केल्यानंतर तिने कायद्याचे शिक्षण घेतले होते. काही खासगी संघटनांबरोबर प्राणी बचावाच्या आंदोलनातही ती सहभागी होत असे. ब्राझीलच्या सैन्यात सामील झालेली थलिता याआधीही ती इराकमध्ये इसिस या दहशतवादी संघटनेविरोधात लढण्यासाठी गेली होती. थलिता शार्प शूटर म्हणून प्रसिद्ध होती. सैन्यातील आपले अनुभव पुस्तकरुपात आणण्यासाठी ती ब्राझीलमधील सैनिकांसोबत काम करत होती. नुकतीच तिने युक्रेनच्या युद्धावर युट्यूबवर एक डॉक्युमेंट्रीही केली होती. 

‘तान्हं बाळ घरी एकटं ठेवून मी..’- सैन्यात सेवा ते ब्यूटी कॉण्टेस्ट; प्रीती शेरावत यांची जिद्द

कशी झाली युक्रेनच्या सैन्यात सहभागी?

युक्रेनमध्ये युद्धात सहभागी होण्यासाठी आवश्यक असलेले प्रगत लष्करी प्रशिक्षण थलिताने घेतले होते. त्यानंतर ३ आठवड्यांपूर्वीच युक्रेनच्या युद्धात सहभागी होण्यासाठी आली होती. थलिताला खार्किव याठिकाणी कामगिरीसाठी पाठवण्यात आले होते. खार्किव हे युक्रेनमधील एक मोठे शहर असून ते रशियाच्या सीमेजवळ आहे. मात्र आता युद्धात थलिताचा मृत्यू झाल्याचे समजते. याआधी या युद्धीत ब्राझीलमधील पूर्व सैनिक असलेल्या ४० वर्षीय डगलस बुरिगो यांचाही मृत्यू झाला होता. ३ आठवडे सैन्यात तिनं उत्तम कामगिरी केली मात्र युद्धात ती कामी आली.

(Image : Google)

डोक्याला डोकं चिकटलेल्या जुळ्या बहिणी बारावी पास, दोघींच्या एका डोक्याची आणि कष्टांची कमाल...

ती हिरो आहे..

युक्रेनमध्ये रशियाकडून सातत्याने क्षेपणास्त्र हल्ले करण्यात येत होते. थलिता ज्या बंकरमध्ये होती त्या बंकरमध्ये तिच्या गटातील ती एकमेव जिवंत राहीलेली महिला होती. काही कारणाने ती बंकरमधून बाहेर येऊ शकली नाही आणि तिच्या बंकरवर क्षेपणास्त्र हल्ला झाला. बंकरला आग लागल्याने त्यातून बाहेर येऊ न शकल्याने थलिताचा गुदमरुन मृत्यू झाला. परिवाराशी ती एक आठवड्यापूर्वी बोलली असल्याचे तिचा भाऊ रोड्रिगो यांनी सांगितले. अनेक लोकांचे प्राण वाचविण्याच्या कामात सहभागी झाल्यामुळे आमच्यासाठी ती हिरो आहे अशी भावना तिच्या भावाने व्यक्त केली.

टॅग्स :प्रेरणादायक गोष्टीरशियायुक्रेन आणि रशियायुद्ध