Lokmat Sakhi >Inspirational > 'हे' स्किल्स नाहीत म्हणून कमी पडताय!- नायकाच्या फाल्गुनी नायर सांगतात, महिलांनी यशस्वी होण्याचा महामंत्र

'हे' स्किल्स नाहीत म्हणून कमी पडताय!- नायकाच्या फाल्गुनी नायर सांगतात, महिलांनी यशस्वी होण्याचा महामंत्र

वयाच्या पन्नाशीत बिझनेस सुरु केल्यानंतर मिळवले अचंबित करणारे यश...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2021 01:24 PM2021-12-18T13:24:24+5:302021-12-18T13:43:29+5:30

वयाच्या पन्नाशीत बिझनेस सुरु केल्यानंतर मिळवले अचंबित करणारे यश...

'These' are lacking because they don't have skills! - Falguni Nair, the protagonist | 'हे' स्किल्स नाहीत म्हणून कमी पडताय!- नायकाच्या फाल्गुनी नायर सांगतात, महिलांनी यशस्वी होण्याचा महामंत्र

'हे' स्किल्स नाहीत म्हणून कमी पडताय!- नायकाच्या फाल्गुनी नायर सांगतात, महिलांनी यशस्वी होण्याचा महामंत्र

Highlightsमल्टीटास्कींग असणे काळाची गरज आहे, उद्योगात यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही त्यासाठी हे प्रयत्न करायला हवेत नायकाचा आयपीओ शेअर बाजारात येताच फाल्गुनी यांची संपत्ती ६.५ अब्ज डॉलरवर पोहोचली.

आपण वापरत असलेल्या ब्यूटी प्रॉड्क्टस नायकाच्या मालक फाल्गुनी नायर यांच्या कंपनीचा आयपीओ शेअर काही महिन्यांपूर्वी बाजारात आला. यामुळे फाल्गुनी देशातील सर्वात श्रीमंत महिला म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. सेल्फ मेड वूमन अशी त्यांनी स्वत:ची बनवलेली ओळख महिलांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका उद्योग परिषदेत उद्योगात येणाऱ्या महिलांसाठी काही गोष्टी आवर्जून सांगितल्या. कोणताही उद्योग करत असताना तुमच्याकडे वेगवेगळया गोष्टींमधले एक्सपर्टाइज असले तर तुमचा सध्याच्या घडीला निभाव लागणे शक्य आहे. त्यासाठी तुम्हाला मार्केटींग, टेक्नॉलॉजी, ऑपरेशन्स अशा गोष्टी यायला हव्यात. नायकाची स्थापना करताना आपण यादृष्टीने विचार केला आणि गोष्टी शिकत गेलो असेही त्या महिलांना सांगतात. तुम्ही मल्टीटास्कींग असणे काळाची गरज आहे, उद्योगात यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही त्यासाठी हे प्रयत्न करायला हवेत असेही फाल्गुनी आपल्या भाषणात म्हणतात.

नायकाचे १.५ कोटी रजिस्टर्ड युजर्स आहेत तर महिन्याला नायकाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉडक्टससाठी १५ लाख ऑर्डर्स येतात. नायका शेअर बाजारात लिस्ट होताच कंपनीचं बाजार भांडवल १ लाख कोटींच्या पुढे गेलं. इन्व्हेस्टमेंट बँकिंगचा अनुभव असलेल्या फाल्गुनी नायर यांनी २०१२ मध्ये नायकाची सुरुवात केली. ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत नायकाचं ऍप ५.५८ कोटी लोकांनी डाऊनलोड केलं. "महिलांनी त्यांच्या जीवनातील वेगळेपण स्वत: वर येऊ देणे आवश्यक आहे. मला आशा आहे की माझ्यासारख्या आणखी स्त्रिया स्वतःसाठी स्वप्न पाहण्याचे धाडस करतील." असं त्यांनी याआधी एका मुलाखतीत सांगितले होते.  नायकाचा आयपीओ शेअर बाजारात येताच फाल्गुनी यांची संपत्ती ६.५ अब्ज डॉलरवर पोहोचली. यामुळे फाल्गुनी देशातील सर्वात श्रीमंत  महिला ठरल्या. फाल्गुनी यांनी IIM अहमदाबाद इथून बिझनेसचं शिक्षण घेतलं. 20 वर्ष बँकींग क्षेत्रात केलेली नोकरी सोडून त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केली होती. त्या एका गुजराती कुटुंबात जन्मल्या-वाढलेल्या आहेत, तसेच त्यांच्या वडिलांचाही व्यवसाय असल्याने व्यवसायाचे बाळकडू लहानपणापासूनच त्यांना मिळाले आहे. 

फाल्गुनी म्हणतात, “मिलेनियल्सना अपिल करेल अशा कंपनीची मी स्थापना केली. मी ज्या वातावरणात काम करत होते, त्यापेक्षा नव्याने सुरु केलेला व्यवसाय माझ्यासाठी खूप नवीन होता. एकीकडे ग्राहकवर्ग आणि दुसरीकडे मला ज्या लोकांसबोत काम करायचे आहे ते लोक यांच्याशी जमवून घेताना मला अनेक नवीन गोष्टी आत्मसात कराव्या लागल्या. महिलांनी त्यांची शक्तीस्थाने ओळखून त्यांचे सुरुवातीचे दिवस आठवून आपल्या ध्येयामध्ये स्वत:ला बुडवून घेतले पाहीजे. महिलांनी आपले नेटवर्क वाढवून रिलेशनशिप डेव्हलप करायला हव्यात. तसेच आपला ब्रँड कसा तयार करायचा, वेगवेगळी डिल्स आणि निगोसिएशन्स कशी करायची हे महिलांनी शिकून घ्यायला हवे. या सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने केल्या तर त्या व्यवसायात यशस्वी होऊ शकतील.” 

 

Web Title: 'These' are lacking because they don't have skills! - Falguni Nair, the protagonist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.