महिला गाड्या चालवतात, विमान चालवतात, ट्रेन चालवतात यात काही नवीन नाही. त्यामुळे महिलांनी मेट्रो चालवली तरी तसं काही खरंतर नवीन नाही इतकी त्यांनी त्यांची गुणवत्ता सिध्द केली आहे. पण मेट्रो आपल्याकडे नवी नवी आली आहे. तिचं आकर्षण सर्वांना आहे. मुंबई मेट्रोच्या काही स्थानकात सर्व जबाबदारी महिला कर्मचारी उत्तम सांभाळतात आणि त्यांच्या बदलत्या कामाची ही गोष्ट आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि महामुंबई मेट्रो रेल ऑपरेशन कॉर्पोरेशन (MMMOCL) यांनी दिलेल्या संधीचं अर्थातच त्या चिज करत आहेत.
कर्ली टेल्सने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील आकुर्ली व एक्सर या दोन मेट्रो स्थानकांवर संपूर्णपणे महिलांचे व्यवस्थान असल्याचे पाहायला मिळत आहे. आकुर्ली व एक्सर या दोन्ही मेट्रो स्थानकांतील व्यवस्थापन एकूण ७६ महिला कर्मचाऱ्यांच्या टीमद्वारे केले जाते. मेट्रो मार्ग २A वरील आकुर्ली स्टेशन आणि मेट्रो मार्ग सात वरील एक्सर स्टेशनचे व्यवस्थापन महिला करत आहेत(These Two Metro Stations Are Being Managed By All-Women Staff).
20% of the Mumbai Metro rail staff are women, doing skilled work that ensures the safety and comfort of 8 million commuters every day.
— Asian Development Bank (@ADB_HQ) February 13, 2023
ADB is committed to supporting gender equality in our projects: https://t.co/nqMKs1Se43pic.twitter.com/tpUBO4dbK9
मेट्रोच्या कार्यान्वयासाठी सुमारे २७% म्हणजेच ९५८ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असून ते देखभाल आणि दुरुस्ती, एच.आर, वित्त आणि प्रशासन या विभागात कार्यरत आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही मेट्रो स्थानकावरील सर्व महिला कर्मचारी तीन शिफ्टमध्ये कार्यरत असणार असून यामध्ये स्टेशन कंट्रोलर, ओव्हर एक्साईज आणि तिकीट विक्री अधिकारी, शिफ्ट पर्यवेक्षक, ग्राहक सेवा अधिकारी मेट्रो प्रवाशांना मदत करणार आहेत तर सुरक्षा आणि सफाई कर्मचारी मेट्रो स्टेशन वरील सुरक्षितता पाहणार आहेत.
Journey with ease! #Akurli
— Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@MMMOCL_Official) February 22, 2023
Take a metro to reach these destinations hassle-free!
#metro#MumbaiMetro#MumbaiInMinutespic.twitter.com/0YrDQDXLop
हा उपक्रम सुरू करण्यामागे महिला सक्षमीकरण नेमका हाच विचार आहे. मेट्रो मधील महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण तर करण्यात येणार आहेच. महिला कर्मचारी आणि प्रवासी पूरक अशा अनेक सोयीही इथे पहायला मिळतात. प्रत्यक्षात होणारे हे बदल अर्थातच महिलांचाच नाही तर सर्व समाजाचाच आत्मविश्वास वाढवणारे आहे.