Lokmat Sakhi >Inspirational > ‘ही’ गोष्ट फक्त मनू भाकरच्या ‘त्या’ टॅटूची नाही, नैराश्याच्या खोल गर्तेतून उभं राहण्याची जिद्दही आहे!

‘ही’ गोष्ट फक्त मनू भाकरच्या ‘त्या’ टॅटूची नाही, नैराश्याच्या खोल गर्तेतून उभं राहण्याची जिद्दही आहे!

'This' thing is not just about Manu Bhakar's 'that' tattoo, it is also about the determination to stand up from the depths of depression! : मनू भाकरने केलेला ‘स्टिल आय राईज’ हा टॅटू चर्चेत आहे, पण गोष्ट एका टॅटूची थोडीच असते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2024 03:53 PM2024-07-29T15:53:15+5:302024-07-29T18:05:08+5:30

'This' thing is not just about Manu Bhakar's 'that' tattoo, it is also about the determination to stand up from the depths of depression! : मनू भाकरने केलेला ‘स्टिल आय राईज’ हा टॅटू चर्चेत आहे, पण गोष्ट एका टॅटूची थोडीच असते?

'This' thing is not just about Manu Bhakar's 'that' tattoo, it is also about the determination to stand up from the depths of depression! | ‘ही’ गोष्ट फक्त मनू भाकरच्या ‘त्या’ टॅटूची नाही, नैराश्याच्या खोल गर्तेतून उभं राहण्याची जिद्दही आहे!

‘ही’ गोष्ट फक्त मनू भाकरच्या ‘त्या’ टॅटूची नाही, नैराश्याच्या खोल गर्तेतून उभं राहण्याची जिद्दही आहे!

'रुक जाना नहीं तू कहीं हार के, काँटों पे चलके मिलेंगे साये बहार के..' हे गाणं उमेद देतं (Olympic 2024).लिम्पिक ब्रांझ मेडल विजेत्या मनू भाकरची गोष्ट तरी दुसरं काय सांगते? १८ व्या वर्षी एक मुलगी आपल्या खेळाच्या जोरावर ऑलिम्पिक पात्रता मिळवते (Manu Bhakar). टोक्योत पोहचते तिथं तिचं बंदूकच काम करत नाही. संधी हूकते. तिला वाटतं सोडून द्यावं आता हे सगळं.

पण ती सोडत नाही. ती ठरवते लढायचं. पुन्हा प्रयत्न करायचे. तिने तसे प्रयत्न केले आणि आज तिच्या हातात मेडल आहे, आज सारं जग तिचं कौतुक करतं आहे. पण मेहनतीचा चार वर्षांचा मोठा कालखंड, तेव्हा तिच्यासोबत कोण होतं? त्याकाळात ती स्वत:ला काय सांगत होती. त्याकाळाची ही गोष्ट, तिने स्वत:ला बजावलं, टोक्यो इज पास्ट, स्टिल आय राईज! टोक्यो भूतकाळ झाला, मी पुन्हा जिंकेल('This' thing is not just about Manu Bhakar's 'that' tattoo, it is also about the determination to stand up from the depths of depression!).

फिरुनी नवी जन्मेन मी म्हणणारी ही मनू भाकरची गोष्ट


मनू भाकरने केलेल्या टॅटूच्या कहाण्या सर्वत्र आज व्हायरल आहेत. तिनं मानेवर मागच्या बाजूला हा टॅटू केला आहे. कुणाला दिसणार नाही असा. पण स्वत:च्या मानेवर स्वत:च्याच अपेक्षांचं ओझं ठेवून मेहनत करायला भाग पाडणारा. तिनं स्टिल आय राईज असं टॅटू म्हणून गोंदवून घेतलं.

मासिक पाळी सतत अनियमित? ४ प्रकारची फळं नेहमी खा, मासिक पाळी नियमित यायला हवी तर..

मानेवर खडा ठेवल्यागत मेहनत केली. वडील सोबत होतो, प्रशिक्षकही. एक टप्पा असाही आला की मनूला वाटलं हे सोडून द्यावं. आपण परदेशी शिकायला जावं किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. तिचं आणि देशाचंही सुदैव की निराशेच्या गर्तेत तिनं शुटिंग सोडलं नाही. त्या मेहनतीच्या एकलकोंड्या काळात ती स्वत:ची बोलत राहिली.


सोबत होती एक कविता, मानवी हक्क कार्यकर्ती कवी माया अँजेलो यांची ती कविता. ती कविता अशी आहे

You may write me down in history

वाढीच्या वयात मुलं फिट व्हावी असं वाटत असेल तर खाऊ घाला ५ पदार्थ, आजीपणजीच्या काळातला सोपा उपाय

With your bitter, twisted lies,

You may trod me in the very dirt

But still, like dust, I'll rise.

स्टिल आय राइज या शब्दांची मनूलाही प्रेरणा दिली. आणि आता एक कांस्य पदक जिंकत ती नव्या सोनेरी स्वप्नाच्या वाटेवर निघाली आहे!

Web Title: 'This' thing is not just about Manu Bhakar's 'that' tattoo, it is also about the determination to stand up from the depths of depression!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.